Headlines

Sangli News | आटपाडीत पैशांवरून राडा; दोघा भावांना लाथाबुक्क्यांसह रॉडने मारहाण


आटपाडी : पैशांच्यादेवाण घेवाणीवरून लिंगीबरे (ता. आटपाडी) येथे दोघा भावांना लोखंडी रॉड व लाथाबुक्क्यांनी मारहाणीची – घटना घडली. याप्रकरणी चौघांबर आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल – करण्यात आला.या मारहाणीत भाऊसाहेब महादेव कांबळे व सचिन महादेव कांबळे – हे दोघे भाऊ जखमी झाले. राहुल – देवकुळे, मारुती देवकुळे (दोघे – रा. पळशी ता. माण जि. सातारा), – सर्जेराव यशवंत लोखंडे, काजल सचिन कांबळे (रा. (रा. लिंगीबरे ता. आटपाडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

सचिन कांबळे याने नातेवाईक मारुती देवकुळे (रा. पळशी, ता. माण) यांना काही पैसे दिले होते. सचिन हे पैसे परत मागत होते. मात्र, देवकुळे पैसे देण्यास टाळाटाळ करीत असल्याने त्यांच्यात वाद झाला. या वादातून सचिन यांना मारहाण करण्यात आली.या मारहाणीबाबत भाऊसाहेब कांबळे हा भाऊ सचिन यांच्याकडे चौकशी करण्यासाठी घरी गेले. त्यावेळी त्यांच्यावरही लोखंडी रॉ हुने हल्ला करण्यात आला. आणि पुन्हा सचिन आणि भाऊसाहेब या भावंडांना मारहाण करण्यात आली. या घटनेतील जखमींवर रूग्णालयात उपचार करण्यात आले. या मारहाण प्रकरणात सचिनची पत्नी काजल हिच्यासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणाचा अधिक तपास आटपाडी पोलीस करीत आहेत.



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत