Headlines

Sangli Krishna River Crocodile Attacks 61 Year Old Man while Swimming; नदीत पोहताना भेदरले, आरडाओरड केल्यावर नागरिकांची धाव; कृष्णा नदीत वृद्धावर मगरीचा जीवघेणा हल्ला


Sangli Crocodile Attacks Man : सांगलीतील कृष्णा नदीमध्ये पोहायला गेलेल्या एका व्यक्तीवर एका मगरीने हल्ला केला आहे. त्यात हा व्यक्ती जखमी झाला आहे.

Sangli Marathi News
कृष्णा नदी व्यक्तीवर मगरीचा हल्ला(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
सांगली : सांगलीच्या कृष्णा नदीमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या व्यक्तीवर मगरीने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. जालिंदर शामराव साळुंखे (वय 61) हे मगरीच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले आहेत. साळुंखे नेहमीप्रमाणे शहरातील माई घाट येथे कृष्णा नदीत पोहत असताना मगरीने त्यांच्यावर हल्ला केला, मगरीच्या हल्ल्यानंतर भेदरलेल्या साळुंखेंनी आरडाओरडा सुरू केल्यानंतर आसपासच्या नागरिकांनी नदी धाव घेत मगरीच्या तावडीतून सुटका केली आहे. त्यामुळे साळुंखे हे बालंबाल बचावले आहेत.

प्रशासनाकडून महत्त्वाचं आवाहन

घटनेनंतर जखमी झालेल्या साळुंखे यांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. मात्र, या घटनेनं शहरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून नदीकाठी पोहण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांनी खबर द्यावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. दरम्यान, राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसानं हजेरी लावली. तर काही ठिकाणी पावसाची प्रतिक्षा केली जात आहे. जोरदार पावसामुळे शहरातील अनेक भाग जलमय झाले. काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता असून राज्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. अनेक ठिकाणी नदी नाल्यांना पूर आलेला पाहायला मिळाला. सांगलीत देखील मुसळधार पाऊस पडलेला आहे. या मुसळधार पावसामुळे सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झालेली पाहायला मिळत आहे.
Maharashtra TimesPune News : लग्नाची हळद उतरली नाही, नियतीने दिला आयुष्याला थांबा, मोशी दुर्घटनेत महेश यांचा करुण अंत; पत्नीच्या डोळ्यांतील अश्रू सर्वकाही सांगून गेले

झोपेत पती बेशुद्ध झाल्याचं म्हणाली, पण…

सांगलीत झोपेत असताना एक व्यक्ती बेशुद्ध झाला. तो शुद्धीवर येत नसल्याने त्याच्या पत्नीने नातेवाईकांना बोलावलं. त्यांच्या मदतीने त्या व्यक्तीला रुग्णालयात आणलं. पण रुग्णालयात डॉक्टरांनी उपचार केल्यानंतर त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घोषणा डॉक्टरांनी केली. या घटनेनंतर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पण पोलिसांना या प्रकरणात संशय आला आणि या मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट आला. पोलिसांनी या प्रकरणी तपास केला असता, संबंधित व्यक्तीला त्याच्या पत्नीने आपल्या प्रियकराच्या मदतीने संपवल्याचं स्पष्ट झालं. संबंधित प्रकार पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर पोलीसही चक्रावले.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा