Sangli Jat Taluka Karajagi Abusing Minor Girl Accused Pandurang Kalli Sentenced to Death; अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत संपवलं, बॉडी लोखंडी पोत्यात लपवली; आरोपीला मृत्यूदंड, सांगली प्रकरणात ऐतिहासिक निर्णय
Sangli Jat Taluka Karajagi Abusing Minor Girl Accused Pandurang Kalli Sentenced to Death; अल्पवयीन मुलीवर अत्याचार करत संपवलं, बॉडी लोखंडी पोत्यात लपवली; आरोपीला मृत्यूदंड, सांगली प्रकरणात ऐतिहासिक निर्णय
Sangli Karajagi Abused Case Accused Sentenced to Death : अवघ्या दीड वर्षांमध्ये जलदगती न्यायालयात सुनावणी पूर्ण होऊन फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेली ही राज्यातील दुसरी मोठी घटना ठरली आहे.
सांगली करजगी अत्याचार प्रकरण आरोपीला फाशी(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
स्वप्नील एरंडोलीकर, सांगली : संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या जत तालुक्यातील करजगी येथील चार वर्षीय चिमुकलीवरील बलात्कार आणि निर्घृण खूनप्रकरणी सांगली जिल्हा व सत्र न्यायालयानं ऐतिहासिक निकाल दिला आहे. न्यायालयानं आरोपी पांडुरंग कळळी याला फाशीची (मृत्यूदंड) शिक्षा सुनावत हा गुन्हा ‘रेअरेस्ट ऑफ द रेअर’ स्वरूपातील असल्याचं नमूद केलं. या निर्णयामुळे पीडित कुटुंबाला न्याय मिळाल्याची भावना व्यक्त होत असून, जिल्ह्यासह राज्यभरातून न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलं जात आहे.
नेमकं काय घडलं होतं?
जत तालुक्यातील करजगी येथे घडलेल्या या अमानुष घटनेनं राज्यभर संतापाची लाट उसळली होती. चार वर्षीय निरागस बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. त्यानंतर आरोपीने मृतदेह पोत्यात भरून लोखंडी पेटीत लपवत पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न केला होता. या घटनेमुळे समाजमन हादरलं होतं. प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन तत्कालीन पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी तपासाची जबाबदारी जतचे तत्कालीन उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्याकडे सोपवली. त्यांच्या नेतृत्वाखाली उमदी पोलिसांनी वैज्ञानिक आणि परिस्थितीजन्य पुरावे गोळा करत आरोपीला अटक केली. अवघ्या 13 दिवसांत दोषारोपपत्र दाखल करून तपास पूर्ण करण्यात आला. या वेगवान तपासाची राज्यभर दखल घेण्यात आली होती. Weather Forecast: पुणे शहरासह जिल्ह्यात मुसळधार पावसाने पाण्याची चिंता मिटली; पुढील दोन दिवस कसे असणार हवामान? IMD चा ताजा अंदाज सरकार पक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील प्रमोद भोकरे यांनी न्यायालयात भक्कम युक्तिवाद केला. परिस्थितीजन्य पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि वैज्ञानिक पुराव्यांच्या आधारे आरोपीविरुद्धचा गुन्हा सिद्ध करण्यात सरकार पक्षाला यश आलं. त्यानंतर न्यायालयानं हा गुन्हा ‘रेअरेस्ट ऑफ द रेअर’ मानत आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली. या निकालानंतर महिलांवरील आणि बालकांवरील अत्याचारांविरोधात कठोर संदेश गेल्याची प्रतिक्रिया विविध स्तरांतून व्यक्त होत आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे अशा गंभीर गुन्ह्यांबाबत कायद्याचा धाक अधिक बळकट होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सुधीर लाटवडे हे मिरजेतील महावितरणच्या सब स्टेशनमध्ये ऑपरेटर म्हणून काम करीत होते. तर याच ठिकाणी खासगी कंपनीचा एक वॉचमन देखील काम करीत होता. वॉचमन सब स्टेशनमध्ये रोज त्याची दुचाकी चार्जिंग करीत असल्याने सुधीर लाटवडे यांनी वॉचमनच्या सुपरवायजरकडे त्याची तक्रार केली होती. यातून दोघांमध्ये जोरदार वादावादीचा प्रकार घडला होता. त्यानंतर संबंधित वॉचमनची सबस्टेशनमधून बदली करण्यात आली होती. तर त्या ठिकाणी दुसरा वॉचमन नियुक्त करण्यात आला होता.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा