Headlines

Samsung Galaxy M47 5G भारतात लॉन्च, 6000mAh बॅटरीसह 50MP कॅमेरा । Maharashtra Times


नवीन Samsung Galaxy M47 5G स्मार्टफोन अधिकृतपणे लॉन्च झाला आहे. या नवीन सॅमसंग फोनमध्ये 6000mAh ची बॅटरी, 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि वेगवान स्नॅपड्रॅगन प्रोसेसर देण्यात आला आहे. विशेष म्हणजे, कंपनी या बजेट फोनसोबत 6 वर्षांचे OS आणि सिक्युरिटी अपडेट्स देणार आहे, ज्यामुळे ग्राहकांना प्रदीर्घ काळ अगदी सुरक्षित आणि नवीन सॉफ्टवेअरचा अनुभव घेता येणार आहे.

सॅमसंगने भारतीय बाजारात ग्राहकांसाठी Samsung Galaxy M47 5G स्मार्टफोन लाँच केला आहे. मिड-रेंज सेगमेंटमध्ये लाँच करण्यात आलेल्या सॅमसंगच्या या नव्या स्मार्टफोनमुळे 25,000 रुपयांपर्यंतच्या बजेटमध्ये येणाऱ्या स्मार्टफोन्सना जोरदार टक्कर मिळणार आहे.

Samsung Galaxy M47 5G च्या फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर कंपनीला सॅमसंग M47 5G सोबत 6 वर्षांचे सिक्युरिटी अपडेट दिले जातील, तसेच तुम्हाला 6 OS अपग्रेड देखील मिळतील. सॅमसंगच्या अधिकृत साइटशिवाय तुम्ही हा 5G स्मार्टफोन ॲमेझॉनवरून खरेदी करू शकता. खास फीचर्सबद्दल बोलायचे झाले तर या डिव्हाइसमध्ये बायपास चार्जिंग, टॅप अँड पे फीचर, 4x स्क्रॅच रेझिस्टन्स, क्विक शेअर, एआय व्हॉइस ट्रान्सक्रिप्शन यासारखे खास फीचर्स देण्यात आले आहेत.

Samsung Galaxy M47 5G फीचर्स

  • डिस्प्ले: फोनमध्ये 6.7-इंच फुल एचडी प्लस रिझोल्यूशनसह फ्लॅट सुपर AMOLED डिस्प्ले आहे, हा हँडसेट 120Hz रिफ्रेश रेट आणि प्रोटेक्शनसाठी कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस वापरतो.
  • चिपसेट: स्पीड आणि मल्टीटास्किंगसाठी स्नॅपड्रॅगन 6 जेन 3 प्रोसेसर, ग्राफिक्ससाठी एड्रेनो 710 जीपीयू.
  • कॅमेरा: मागील बाजूस 50 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा सेन्सर आहे, तर 5-मेगापिक्सलचा अल्ट्रा-वाइड आणि 2-मेगापिक्सलचा मॅक्रो कॅमेरा आहे. सेल्फीसाठी 12 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा सेन्सर देखील असेल.
  • OS: हा नवीनतम फोन अँड्रॉइड 16 वर आधारित सॅमसंग वन UI 8.5 वर कार्य करतो.
  • बॅटरी: सॅमसंगचा नवीन फोन 45 वॉट फास्ट चार्ज सपोर्ट आणि 6000mAh बॅटरीसह पॅक केलेला आहे.

Samsung Galaxy M47 5G ची भारतातील किंमत

कूपन ऑफरनंतर सॅमसंगच्या या नव्या स्मार्टफोनची किंमत 22999 रुपयांपासून सुरू होते. Samsung Galaxy M47 5G रिलीज तारखेबद्दल बोलायचे झाले तर, या फोनची विक्री 4 जुलैपासून सुरू होईल, या दिवसापासून ॲमेझॉनवर प्राइम मेंबर्ससाठी ॲमेझॉन प्राइम सेलही सुरू होणार आहे.

Samsung Galaxy M47 5G हा फोन तुम्हाला रॉग रेड आणि ब्लेझ ब्लू रंगात मिळेल. या प्राइस रेंजमध्ये हा मिड-रेंज फोन Vivo T5x 5G, OPPO K14 5G आणि REDMI Note 15 5G सारख्या मॉडेल्सना कडवी टक्कर देईल.

शुभम कुलकर्णी

लेखकाबद्दलशुभम कुलकर्णीशुभम कुलकर्णी जवळपास 6 वर्षांपासून मराठी माध्यमांमध्ये काम करतोय. आकाशवाणी (छत्रपती संभाजीनगर) पासून माध्यम क्षेत्रात कामाला सुरुवात केली. एका मुखपत्रासह मुंबईतील नामांकित मराठी वृत्तवाहिन्यांमध्ये ‘बुलेटिन प्रोड्यूसर’ म्हणून जबाबदारी सांभाळली. शुभमला राजधानी दिल्लीतही बातमीवर संस्कार करण्याची संधी मिळाली. राजकारण, व्यापार-उद्योग, क्रीडा, तंत्रज्ञान, ऑटो या विषयावर लिहायला त्याला आवडतं. निसर्गाच्या सानिध्यात बसायला, फावल्या वेळेत चित्रपट, वेब सिरीज पाहाण्याचा शुभमचा छंद आहे.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत