Salman Yusuf Khan : ‘ABCD’ फेम सलमान युसुफ खानचा अपघात झाला असून त्यानं हेल्थ अपडेट शेअर केली आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – ‘एबीसीडी’ फेम कोरिओग्राफर आणि अभिनेता सलमान युसूफ खाननं नुकताच त्याच्या हाताच्या शस्त्रक्रियेनंतर हॉस्पिटलमधील स्वतःचे फोटो शेअर केले असून अभिनेत्याचे चाहते चिंतेत पडले होते. नेमकं काय घडलेलं? याबद्दल अभिनेत्यानं सांगितलं आहे.
गच्चीवरून पडल्यामुळे अपघात झाला
सलमान युसूफ खाननं ‘हिंदुस्तान टाइम्स’सोबत साधलेल्या संवादात सांगितलं की, हा अपघात चित्रपटाचं शूटिंग किंवा डान्सच्या तालमीदरम्यान नाही, तर कुटुंबासोबत वेळ घालवत असताना झाला. अभिनेता म्हणाला, ‘आजकालची मुलं गॅजेट्समध्ये खूप व्यग्र असतात, म्हणून मी माझ्या १० वर्षांच्या मुलाला पतंग कशी उडवायची हे शिकवण्याचा निर्णय घेतला. आम्ही गच्चीवर होतो. त्याला शिकवल्यानंतर, मी पतंग अधिक उंच उडवण्याचा प्रयत्न केला. तेव्हा माझा पाय घसरला, मी जवळपास १३ फूट उंचीवरून खाली पडलो आणि माझा हात मोडला.’
माझ्या नवऱ्याची बायकोतील अभिजीतच्या भूमिकेमुळे टोमणे, Sukhada Khandkekar ने उलगडले धमाल किस्से
सलमान युसूफ खाननं इन्स्टाग्रामवर हॉस्पिटलमधील फोटो शेअर केले आणि चाहत्यांच्या मिळालेल्या प्रेमाबद्दल व आशीर्वादाबद्दल आपल्या आभार मानले. अभिनेता म्हणाला, ‘सर्वांचं प्रेम आणि प्रार्थना माझ्यापर्यंत पोहोचलं आहे. लोक माझी इतकी काळजी करतात हे पाहून मी खूप भावूक आणि कृतज्ञ आहे. मी एक दशकाहून अधिक काळ इंडस्ट्रीत आहे, पण आजही लोकांकडून इतकं प्रेम मिळाल्यानं मी भावूक झालो आहे.’
कोण आहे सलमान युसूफ खान ?
सलमान युसूफ खान एक नृत्यदिग्दर्शक, डान्सर आणि अभिनेता आहे. अभिनेता २००९ मध्ये ‘डान्स इंडिया डान्स’ या टीव्ही डान्स रिॲलिटी शोचा विजेता देखील होता. त्यानं अनेक मोठे स्टेज शो, म्युझिक व्हिडिओ आणि बॉलिवूड चित्रपटांमध्ये नृत्यदिग्दर्शक आणि कलाकार म्हणून काम केलं आहे. सलमाननं ‘एबीसीडी’ आणि ‘एबीसीडी २’ सारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारली आहे.
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा