Headlines

Russian Oil Imports; अमेरिकेची 100 टक्के टॅरिफची तयारी तरी, भारतीय बंदरांवर रशियन जहाजांची गर्दी! मित्र ठरला संकटमोचक


Russian Oil Imports: रशियन तेलाच्या खरेदीवरून भारतावर अमेरिकेच्या 100 टक्के टॅरिफची टांगती तलवार आहे, पण महासत्तेच्या संभाव्य कारवाईला न जुमानता भारताने रशियाकडून गेल्या काही महिन्यांमध्ये रशियन तेलाची आयात सुरूच ठेवली असून ट्रम्प प्रशासनाने निर्बंध शिथिल करण्यास नकार दिला असूनही जुलै महिन्यात भारताची रशियाकडून होणारी कच्च्या तेलाची आयात विक्रमी उच्चांकाजवळ राहिल्याचं समोर आलं आहे.

पश्चिम आशियात अमेरिका-इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर रशिया भारतासाठी कच्च्या तेलाचा एक प्रमुख पुरवठादार बनला आहे. तसेच, युएई आणि सौदी अरेबिया यासारख्या मध्य पूर्वेकडील काही देश होर्मुझची सामुद्रधुनीतून होणारी वाहतूक ठप्प असतानाही पर्यायी मार्गांद्वारे पुरवठ्यात लवचिकता दाखवत आहेत.

Maharashtra TimesGold Rate Today: सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचा भाव वधारलेलाच, चांदीचा आलेख चढा; ‘वॉर कनेक्शन’ की आणखी काही? दरवाढीचे कारण काय?

भारताला क्रूडचा पुरवठा करणारे देश

केप्लर या जागतिक रिअल-टाइम डेटा आणि विश्लेषण प्रदात्याच्या माहितीनुसार आतापर्यंत जुलै महिन्यात भारताने रशियाकडून दररोज सरासरी सुमारे 24.5 लाख बॅरल कच्च्या तेलाची आयात केली, तर जून महिन्यात दररोज 26.4 लाख बॅरलच्या जवळपास होती. अशाप्रकारे, रशिया भारताला क्रूडचा पुरवठा करणारा आघाडीवर राहिला तर, युएई दुसऱ्या स्थानावर असून जुलै महिन्यात आतापर्यंत सरासरी दररोज 6,17,000 बॅरल पुरवठा केला आहे.

त्यानंतर सौदी अरेबिया तिसरा सर्वात मोठा पुरवठादार राहिला असून जुलैच्या पहिल्या काही आठवड्यांत भारताची होणारी सरासरी आयात दररोज 5,86,000 बॅरलवर पोहोचली.

Maharashtra TimesLTCG Tax Removal Explained: लाँग टर्म भांडवली नफा करात दिलासा नाही! शेअर बाजाराचा ‘व्हिलन’ LTCG कर काढून टाकल्यास तुमचा किती फायदा?

रशियाची भारताला कच्च्या तेलाचा पुरवठा

पश्चिम आशियात तब्बल चार महिन्यांपासून संघर्ष सुरू असून या काळात रशियाने सुमारे 30 कोटी बॅरल क्रूडची निर्यात करून भारताचा सर्वात मोठा कच्च्या तेलाचा पुरवठादार म्हणून आपले स्थान अधिक मजबूत केले.

मध्यपूर्वेतून होणाऱ्या तेलाच्या पुरवठ्यात अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे व्यत्यय आला असताना पर्यायी सागरी मार्गांद्वारे मध्य-पूर्वेतून मिळणाऱ्या तेलाचा भारताच्या आयातीत मोठा वाटा राहिला आहे. मार्च महिन्यापासून UAE आणि सौदी अरेबिया देशाचे अनुक्रमे दुसरे आणि तिसरे सर्वात मोठे पुरवठादार ठरले तर, या काळात व्हेनेझुएलानेही आपली उपस्थिती वाढवली असून आता भारताच्या 5 तेलाच्या पुरवठादारांपैकी बनला.

फेब्रुवारी 2022 पूर्वी भारताच्या क्रूडच्या आयातीमध्ये रशियन तेलाचा वाटा जेमतेम 2% होता, जो 2023 ते 2025 दरम्यान देशातील कच्च्या तेलाचा सर्वात मोठा स्रोत बनला आणि एकूण आयातीतील वाटा जवळपास एक तृतीयांश होता. यामध्ये 15 ते 30 डॉलर प्रति बॅरल इतक्या सर्वाधिक सवलतींचा आधार मिळाला.

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत