Riteish Deshmukh Open Up Struggle Of Being CM Son In Lock Upp 2 ; Riteish Deshmukh : हा काय बाबा मुख्यमंत्र्यांचा मुलगा, याला सगळंच आयतं मिळणार!, करिअरच्या सुरुवातीला रितेश देशमुखवर टोमण्यांचा मारा, भावुक आठवण
Riteish Deshmukh Open Up Struggle Of Being CM Son In Lock Upp 2 ; Riteish Deshmukh : हा काय बाबा मुख्यमंत्र्यांचा मुलगा, याला सगळंच आयतं मिळणार!, करिअरच्या सुरुवातीला रितेश देशमुखवर टोमण्यांचा मारा, भावुक आठवण
Riteish Deshmukh Emotional Memory : अभिनेता रितेश देशमुखने लॉक अप 2 या त्याच्या नव्या शोमध्ये मुख्यमंत्र्यांचा मुलगा म्हणून त्याला कसे टोमणे मारले गेले याबद्दल सांगितले.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मराठमोळा अभिनेता रितेश देशमुखने स्वतःच्या कर्तृत्वाच्या आणि मेहनतीच्या जोरावर चित्रपटसृष्टीत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्याने कॉमेडी ते ॲक्शन अशा विविध प्रकारच्या चित्रपटांमध्ये अनेक प्रकारच्या भूमिका आतापर्यंत साकारल्या आहेत. सध्या रितेश देशमुख नेटफ्लिक्सवरील ‘लॉक अप’ 2 या शो चे सूत्रसंचालन करत आहे. नुकत्याच झालेल्या एका एपिसोडमध्ये रितेशने त्याच्याबाबतच्या लोकांच्या एका समजुतीवर भाष्य केले. ती म्हणजे, त्याला केवळ मुख्यमंत्र्यांचा मुलगा असल्यामुळेच काम मिळते असे लोकांना वाटायचे. ही ‘ओळख’ किंवा शिक्का पुसून टाकण्यासाठी आपल्याला बराच काळ संघर्ष करावा लागला, याची कबुली त्याने या शोमध्ये दिली.
रितेश देशमुखचे सांगितल्या मनातल्या भावना
रितेश देशमुख सध्या ‘लॉक अप’ या रिअॅलिटी शोचे सूत्रसंचालन करत आहे. शोमधील एका टास्कपूर्वी स्पर्धक योगेश रावत याच्याशी संवाद साधताना, रितेशने आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या दिवसांच्या आठवणींना उजाळा दिला. आपल्यावर लागलेल्या त्या विशिष्ट शिक्क्याबद्दल मनमोकळेपणाने भाष्य केले. शोमध्ये योगेश रावत याला ‘चीटर’ असे संबोधले गेले होते.
रितेश पुढे म्हणाला, “आज, 23 वर्षे आणि 60 चित्रपटांनंतर, ती ओळख, तो शिक्का पुसून टाकून मी तुमच्यासमोर उभा आहे. काही ठराविक शिक्के किंवा इमेज मोडीत काढण्यासाठी वेळ आणि कठोर परिश्रमांची गरज असते; पण एकदा का तुम्ही ठाम निश्चय केला, की ते अखेरीस मोडून निघतातच.”
रितेश देशमुखने बॉलीवूड आणि मराठी चित्रपटसृष्टी अशा दोन्ही क्षेत्रांत स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्याने 2003 मध्ये ‘तुझे मेरी कसम’ या चित्रपटाद्वारे आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात केली. तेव्हा त्याचे वडील दिवंगत विलासराव देशमुख हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होते. त्यामुळे त्याला इंडस्ट्रीत स्वत:ची स्वतंत्र ओळख निर्माण करण्यात मेहनत घ्यावी लागली होती.
हिंदी चित्रपटसृष्टीत ‘हाऊसफुल’ , ‘धमाल’ ‘हे बेबी’ आणि ‘मस्ती’ यांसारख्या चित्रपट सीरिजच्या माध्यमातून रितेशने आपली विशेष छाप पाडली. एक व्हिलनमध्ये त्याने साकारलेला खलनायकही खूप गाजला. 2013 मध्ये त्याने ‘मुंबई फिल्म कंपनी’ नावाची स्वतःची चित्रपट निर्मिती संस्था सुरू केली. मराठी चित्रपटसृष्टीतही त्याने ‘बालक-पालक’ या सिनेमाद्वारे निर्माता म्हणून नवीन सुरुवात केली आणि ‘लय भारी’ या सिनेमातून मराठीत पदार्पण केले. हा सिनेमा प्रचंड गाजला होता.
रितेश देशमुखचा अलीकडील चित्रपट ‘राजा शिवाजी’ हा बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला. या सिनेमाने मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये नवा रेकॉर्ड बनवला. 1 मे 2026 रोजी रिलीज झालेल्या या मराठी सिनेमात अनेक बॉलिवूड कलाकारही होते या सिनेमाचे लेखन दिग्दर्शन रितेश देशमुखनेच केले होते. तर निर्माती त्याची पत्नी जिनेलिया देखमुख होती. याशिवाय रितेश मराठी बिग बॉस या शोचे सूत्रसंचानल देखील करत आहे.
लेखकाबद्दलआकांक्षा तळेकरआकांक्षा तळेकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टन्ट या पदावर कार्यरत आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये मटा ऑनलाइनमध्ये काम करण्यास सुरूवात केली. तेव्हापासून मनोरंजन, फिल्म इंडस्ट्री विषयक बातम्या लिहिण्यात हातखंडा आहे. तसेच कलाकारांच्या मुलाखती घेणे, वेगवेगळ्या इव्हेंटला उपस्थित राहून तेथील महत्वाच्या बातम्या करणे, सेट व्हिजिट देऊन त्यावर आर्टिकल बनवण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
आकांक्षा तळेकर यांचा पत्रकारितेच्या अनुभवाची सुरुवात सामना या वृत्तपत्रापासून झाली. तिथे इंटर्नशीप करताना बातम्यांचा पाया काय असतो इथपासून ते अचूक बातम्यांची निवड कशी करावी या गोष्टी शिकून घेतल्या. त्यानंतर लोकशाही वाहिनीवर दुसरी इंटर्नशीप केली आणि मग तिथेच 6 महिने टिकर ऑपरेटर म्हणून काम केले. यावेळी ब्रेकिंग न्यूज करताना प्रेक्षकांना वाचण्यासाठी कोणते शब्द महत्वाचे असतात, किंवा पत्रकारितेमधले शब्द आणि सामान्य आयुष्यातले शब्द यांच्यातील तफावत शिकता आली. लोकशाही वृत्तवाहिनीमध्ये व्हायरल शोसाठी स्क्रिप्ट लिखाणही केले आहे. हे करत असताना विविध व्हायरल व्हिडिओंपाठी नेमकं सत्य काय हे शोधण्याची सवय लागली. त्यामुळे एखादी बातमी करताना त्याचा ठोस पाठपुरावा करावा हे शिकण्यात आले.
लोकशाहीनंतर मुक्तपीठ या वेबपोर्टलसाठी काही काळ काम केले. तिथे व्हिडिओ बनवणे, कॅमेऱ्यासमोर वृत्तवाचन करणे आदी काम केली. या सर्व गोष्टी करत असताना मेघा मराठी या मनोरंजन विषयक वेबपोर्टलसाठी रोज आर्टिकल लिहिण्याचे काम सुरू होते. त्यामध्ये बॉलिवूड किंवा मराठी इंडस्ट्रीमध्ये लेटेस्ट घडणाऱ्या घडामोडी आर्टिकल स्वरुपात दिल्या.
करोनाच्या काळात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या व्हॅक्सिन सेंटरमध्ये डेटा ऑपरेटर म्हणून दीड वर्ष कार्य केले. त्यावेळी सर्वसामान्य व्यक्ती, त्यांचे स्वभाव आणि अडीअडचणी जवळून जाणता आल्या. हे काम करत असताना विविध राजकिय पक्षांसंबंधित लोकांशी सतत संपर्क होत होत्या. त्यामुळे राजकारणात काय चालू असते याची थोडीफार जाण झाली ज्याचा उपयोग पुढे पत्रकारितेमद्ये झाला.
त्यानंतर हेमा मालिनी संपादक असलेल्या मेरी सहेली या मासिकाची मराठी आवृत्ती माझी सहेली मध्ये 3 वर्षे काम केले आहे. माझी सहेलीमध्ये मनोरंजन विषय कोलम लिहिणे तसेच पॉडकास्टमध्ये वेगवेगळ्या विषयांचे संशोधन करणे, मुलाखतींसाठी प्रश्न तयार करण्याचे काम केले. सध्या महाराष्ट्रा टाइम्स ऑनलाइनध्ये मनोरंजन सिनेसृष्टीविषय बातम्या करणे, गाजलेल्या मालिकांचे अपडेट्स देणे, कलाकारांच्या महत्वाच्या सोशल मीडियावर पोस्टबाबत बातमी तयार करुन ती वाचकांपर्यंत पोहचवण्याचे काम करत आहेत. तसेच मालिका किंवा सिनेमांच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये जाऊन कलाकारांच्या मुलाखती घेण्याचा अनुभव आहे. मनोरंजन विषयाशिवाय क्राइम आणि व्हायरल व्हिडिओवरुन बातम्या करण्याचीही आवड आहे.
शैक्षणिक माहिती
आकांक्षा तळेकर यांनी पार्ले टिळक विद्यालयातून शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर साठ्ये महाविद्यालयात विज्ञान शाखेतून 12 वी दिली. पुढे साठ्ये महाविद्यालयातच BMM हा स्पेशल कोर्स केला आणि त्यात पत्रकारितेची पदवी मिळवली.… आणखी वाचा