Rickshaw driver in navi mumbai goes viral for refusing to speak marathi action from rto underway; जा..मराठी नाही बोलणार! नवी मुंबईतील मुजोर रिक्षाचालकाचा व्हिडिओ व्हायरल, RTO कडून शोध घेण्यास सुरुवात
Rickshaw driver in navi mumbai goes viral for refusing to speak marathi action from rto underway; जा..मराठी नाही बोलणार! नवी मुंबईतील मुजोर रिक्षाचालकाचा व्हिडिओ व्हायरल, RTO कडून शोध घेण्यास सुरुवात
म. टा. वृत्तसेवा, नवी मुंबई: ‘मराठी बोलणार नाही, पैसेही कमावणार,’ असे वक्तव्य करत परिवहन विभागालाच आव्हान देणाऱ्या एका उद्दाम रिक्षाचालकाचा व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. या व्हिडिओची दखल घेत आरटीओने संबंधित रिक्षाचालकाचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. व्हिडीओमध्ये संबंधित रिक्षाचालक मराठीत संवाद साधण्यास नकार देताना दिसत आहे. तसेच रिक्षा व्यवसायातून पैसे कमावणार असल्याचे सांगत त्याने थेट परिवहनमंत्र्यांनाच आव्हान दिल्याचे व्हिडिओतून समोर येत आहे. त्यामुळे या प्रकाराची शहरात चर्चा सुरू झाली आहे.
हा व्हिडीओ नेमका कुठे आणि कधी चित्रित करण्यात आला, संबंधित रिक्षा कोणाच्या नावावर आहे, तसेच चालकाकडे आवश्यक कागदपत्रे आहेत का, याची माहिती आरटीओकडून घेतली जात आहे. व्हिडिओच्या आधारे रिक्षाचालकाची ओळख पटविण्याचे काम सुरू असल्याची माहिती वाशीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी दत्तात्रय सांगोलकर यांनी दिली.
“रिक्षा चालवणार, पैसे कमावणार, पण मराठीत नाही बोलणार,” असं या व्हायरल व्हिडिओत रिक्षाचालकाने म्हटल्याचं समोर आलं आहे. याबाबत आता आरटीओकडून काय कारवाई केली जाते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मराठी प्रशिक्षणाची मुदत संपली
महाराष्ट्रात रिक्षाचालकांना मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक असल्याचे परिवहन विभागाने स्पष्ट केले होते. त्यानुसार मराठी भाषा शिकण्यासाठी रिक्षाचालकांना मुदत देण्यात आली होती. ही मुदत १५ ऑगस्ट रोजी संपली. या पार्श्वभूमीवर शहरात तसेच आरटीओ कार्यालयांतर्गत वाहनचालक प्रशिक्षण केंद्रांमध्ये अनेक रिक्षाचालकांना मराठी भाषा शिकविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. अनेकांनी हे प्रशिक्षण पूर्ण केले असल्याचे सांगण्यात येते.
व्हायरल व्हिडिओतील व्यक्तीचे नाव संजय दुबे असल्याचे सांगितले जात असून, तो स्वतःला भारतीय हिंदी भाषिक विकास सेना पार्टीचा अध्यक्ष सांगत असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, याबाबत अधिकृत पडताळणी सुरू आहे. व्हिडिओतील वक्तव्य, संबंधित चालकाची कागदपत्रे यांची तपासणी करून आरटीओकडून पुढील कारवाई केली जाणार का, याकडे लक्ष लागले आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा