Headlines

Reserve Bank Of India New Rule For Fixed Deposit Interest Rate ; एफडी धारकांसाठी आनंदाची बातमी! आता दररोज कळणार परताव्याचा आकडा; RBI चा नवा नियम, जाणून घ्या


भारतीय रिझर्व्ह बँकेने फिक्स्ड डिपोजिट दरासंबंधित महत्वाचा निर्णय जाहीर केला आहे. देशातील सगळ्याच बँकांना आता एफडीसाठी आरबीआईच्या नव्या नियमांचे पालन करावे लागणार आहे. हे नवे नियम 1 ऑक्टोबर 2026 पासून लागू होणार आहेत. मुळात, नव्या नियमानुसार सामान्य एफडीच्या दरांमध्ये फारसा बदल होणार नाही. परंतु, गुंतवणूक करू पाहणाऱ्या मंडळींना एफडी करण्यासाठी बँकेची निवड करणे सोपे होणार आहे.

सामान्य एफडी Vs बल्क एफडी

एका विशिष्ट ठराविक काळासाठी तसेच या काळात व्याज मिळवण्यासाठी बँकेत जमा केलेली रक्कम म्हणजे एफडी. प्रत्येक बँकेचे एफडी व्याजदर वेगवेगळे आहेत. आरबीआईने बँकेला त्यांचा स्वतंत्र व्याजदर ठरवण्याची मुभा दिली आहे. 3 कोटी रक्कमेच्या आत असणारी एफडी सामान्य प्रकारात मोडते तर 3 कोटी किंवा त्याहून जास्त रक्कमेची एफडी बल्क प्रकारात मोडते.

आरबीआईचे नवे नियम कोणते?

  • प्रत्येक बँकेला त्यांचे एफडी Rates बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर दाखवावे लागणार आहेत.
  • बल्क एफडीसाठीचे दर बँकेने दररोज दहा वाजेपर्यंत अपडेट करणे बंधनकारक आहे.
  • आता बँकेला प्रत्येक शाखेत एकच व्याजदर ठेवणे बंधनकारक आहे. जर बँक सारखीच आहे, करण्यात आलेली एफडी सारखीच आहे तसेच एफडी घेण्याचा दिवसही सारखाच असेल तर लागू दरही सारखाच असेल.
  • बल्क एफडीसाठी दर बदलू शकतो.

सामान्य एफडीसाठी नियम किती फायद्याचे?

सामान्य एफडीमध्ये गुंतवणूक करू पाहणाऱ्या मंडळींना नव्या नियमांमुळे एफडी घेण्यापूर्वी बँकेचे दर तपासता येणार आहेत. तसेच इतर बँकांशी तुलना करता येणार आहे.

बल्क एफडीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या मंडळींना या नियमांचा फायदा काय?

जर एखादी कंपनी 3 कोटींच्या वर एफडीत गुंतवणूक करत असेल तर त्यांना दररोज सकाळी 10 वाजेपर्यंत बँकेच्या दरासंबंधित अपडेट मिळणार आहे. आधीच रेट माहिती पडल्यामुळे गुंतवणूकदारांची निर्णयक्षमता सुधारणार आहे. तसेच पारदर्शकता वाढेल.

एकंदरीत, नव्या नियमांनुसार बँकेला दर अधिक स्पष्टपणे दाखवावे लागणार आहे. तसेच गुंतवणूक करू पाहणाऱ्या मंडळींना बँकेचे दर तपासणे अधिक सोपे होईल, जेणेकरून विविध बँकांच्या चालू एफडी दरांचा अभ्यास करून त्यांना त्यांच्यासाठी योग्य असणाऱ्या एफडीमध्ये गुंतवणूक करता येईल.

Maharashtra Timesडॉलर घसरला, भारतीय चलनाला बळकटी, शेअर मार्केटही सुसाट; आता पुढे काय?बँक एफडीचा व्याजदर कसा ठरवतो?

भारतीय रिझर्व्ह बँकेने देशातील बँकांना एफडीचा व्याजदर स्वतः ठरवण्याची मुभा दिली आहे. एखादी बँक व्याजदर ठरवताना विविध घटक लक्षात घेते. RBI रेपो रेट, बँकेला असणारी पैशांची गरज, एफडीची रक्कम आणि कालावधी या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन एफडीचा व्याजदर ठरवला जातो. जर बँकेला पैशांची गरज असेल तर गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी एफडीवरील व्याजदर वाढवण्यात येतो. जर बँकेकडे मुबलक पैसे असतील तर पैशांची फार गरज नसल्याने बँक व्याजदर कमी ठेवणे पसंत करते.

दिवेश चव्हाण

लेखकाबद्दलदिवेश चव्हाणदिवेश दिनेश चव्हाण हे मराठी पत्रकार असून ते सध्या महाराष्ट्र टाइम्स येथे कंटेंट रायटर म्हणून कार्यरत आहेत. ऑगस्ट 2026 पासून ते महाराष्ट्र टाइम्स येथे अर्थ, पर्सनल फायनान्स आणि देश-विदेशातील बातम्यांसंबंधित लेखन करत आहेत. शेअर बाजारातील घडामोडी, बँकिंग, नवे आर्थिक धोरण आणि तांत्रिक नियम अतिशय सोप्या भाषेत आणि सविस्तर पद्धतीने समजावून सांगणे हे त्यांचे वैशिष्ट्य आहे.

यापूर्वी ते नवराष्ट्र या मराठी वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून काम करत होते. या काळात त्यांनी अर्थ, व्यवसाय, करिअर आणि नोकरीसह विविध क्षेत्रातील घडामोडींचे वार्तांकन केले आहे. यासोबतच काल्पनिक कथा लेखन आणि एखाद्या कथेचे स्वारस्यपूर्ण विश्लेषण करण्यातही ते पटाईत आहेत.

त्यांचे शिक्षण ठाणे येथील जोशी बेडेकर महाविद्यालयात झाले. याच ठिकाणी त्यांनी पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केले. त्यांच्याकडे मास्टर ऑफ आर्ट्स इन मल्टीमीडिया अँड मास कम्युनिकेशन ही पदव्युत्तर पदवी आहे. विविध विषयांवर अचूक आणि विश्वासार्ह बातम्या पुरवणे हा त्यांच्या लेखन, पत्रकारितेच्या माध्यमातून वाचकांना दर्जेदार माहिती देऊन त्यांना जागतिक घडामोडींविषयी जागरुक ठेवणे हा त्यांचा हेतु आहे.
जोशी बेडेकर महाविद्यालयात शिक्षण घेत असताना महाविद्यालयीन वार्षिक अंक Rta मध्ये इंग्रजी रिपोर्टींग विभागाचे हेड म्हणून त्यांनी कारोभार सांभाळला आहे.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत