यवतमाळ: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सहा खासदारांनी बंडखोरी करत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश केल्यावर उद्धव ठाकरे यांनी बंडखोर खासदारांच्या मतदारसंघात आपली बाजू मांडण्यासाठी शनिवारपासून दौरा सुरू केला आहे. यवतमाळ-वाशीम मतदारसंघाचे शिवसेनेत गेलेले खासदार संजय देशमुख यांच्या मतदारसंघात यवतमाळ व वाशीम येथे उद्धव ठाकरे यांनी सभा घेतल्या आणि देशमुख यांच्यावर निशाणा साधला. तसंच उद्धव ठाकरे यांनी संजय देशमुख यांचा व्हिडिओ उपस्थितांना माइकवरून ऐकवला. त्यात देशमुख एका टीव्ही चॅनलला मुलाखत देताना आईच्या आठवणीने भावनाप्रधान झाल्याचे त्यांच्या बोलताना दिसत होते. आपल्या आईला दिलेल्या शब्दावर ते आमच्याकडे आले. आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला पण त्यांनी शिवसेनेला नाही तर त्यांच्या आईलाही धोका दिल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. ठाकरे यांच्या या टीकेला आता संजय देशमुख यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
“उद्धव ठाकरे यांनी सभेत ऐकवलेला व्हिडिओ माझाच आहे. मात्र त्यांनी तो व्हिडिओ अर्धवट दाखवला असून चुकीच्या पद्धतीने मांडला आहे. मागच्या वेळी ठाकरे यांच्या पक्षातून सगळे लोक निघून गेल्यानंतर आपण या पक्षात प्रवेश करावा, यासाठी जिल्ह्यातील काही लोकांनी माझ्याशी चर्चा केली होती. तसंच नंतर माझी उद्धव ठाकरे यांच्यासोबतही चर्चा झाली होती. आपण एखाद्या नव्या पक्षात प्रवेश करणार असू तर कुटुंबातील लोकांशी चर्चा करतो. त्याप्रमाणे मी माझ्या आईशी चर्चा करत ठाकरेंच्या पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढावी का, असं आईला विचारलं होतं. त्यावर आईने हो म्हटल्यावर मी निवडणूक लढवली. पण त्यात कुठेही शपथ घेण्याचा विषय नव्हता,” असं म्हणत संजय देशमुख यांनी उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर देत आपली बाजू मांडली आहे.
दरम्यान, “सतत टीका केल्यामुळेच ठाकरे यांच्या पक्षाची ही अवस्था झाली आहे. ते खाली ग्राऊंडवर उतरून काम करत नाही. मी खासदार झाल्यानंतर वेळोवेळी शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर आवाज उठवला आहे. संसदेतील माझी भाषणे सगळीकडे उपलब्ध आहेत,” असंही संजय देशमुख म्हणाले.
उद्धव ठाकरे नक्की काय म्हणाले होते?
“शिवसेनेबरोबर यापूर्वी गद्दारी करणारे बुजगावणे तुमच्यासमोर उभे केले. तुम्ही बाळासाहेबांचा चेहरा व माझा शब्द यावर विश्वास ठेऊन त्याला निवडून आणले; पण तो गद्दार निघाला. तुम्ही त्याला मतदान करताना बोटाला काळी शाई लावली. त्याने मात्र गद्दारी करून तुमच्या विश्वासाला काळिमा फासला. त्याने केलेल्या गद्दारीबद्दल तुम्हाला जाब विचारण्याचा अधिकार आहे,” असा हल्लाबोल उद्धव ठाकरेंनी केला.
यवतमाळ येथील सभेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘हा गद्दारांच्या कळपात जाऊन बसला. काही वर्षांपूर्वी मिंधे यांनी बंडखोरी करून शिवसेनेचे ४० आमदार फोडले होते. त्या वेळी विदर्भात पोळ्यात बैलांच्या पाठीवर आमदारांच्या गद्दारीबद्दल ‘५० खोके एकदम ओके’ असे लिहिले होते. आमदारांचा भाव ५० खोके, तर खासदारचा किती असेल. आता हा धंदा झाला आहे. शेतकऱ्यांना त्यांच्या मालाचा हमी भाव मिळत नाही; पण निवडून यायचे व आपला हमी भाव वाढवायचा हा काही जणांचा धंदा झाला आहे. आज गद्दार विकासनिधीची भाषा करीत आहेत; पण विदर्भात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, संत गाडगेबाबा यांनी अनेक कामे केली. त्यांना विकासनिधीची अडचण आली नाही. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांनी कधीही विकासनिधी नाही म्हणून सत्तारूढ काँग्रेसमध्ये जाण्याचा विचार केला नाही,’ असं उद्धव ठाकरे म्हणाले.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा