महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
Plastic Currency Note Cost: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आता अधिक टिकाऊ आणि वॉटर-प्रूफ प्लास्टिक नोटांची चाचणी सुरू करणार आहे. या प्लास्टिक नोटांच्या छपाईचा खर्च सध्याच्या कागदी नोटांपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे, मग आरबीआय रिझर्व्ह बँक या नोटा का जारी करणार आहे? प्लास्टिक चाळणी नोटांच्या छपाईसाठी किती खर्च येईल? जाणून घेऊ

प्लास्टिकच्या चलनी नोटा का आणतेय सरकार?
या तंत्रज्ञानामुळे चलनी नोटांचे आयुष्य वाढेल आणि बनावट चलनाला पूर्णपणे आळा बसेल, असे सरकार आणि रिझर्व्ह बँकेचे मत आहे. सुरुवातीच्या टप्प्यात या प्लास्टिक नोटांची यशाची चाचणी घेतल्यानंतरच देशभरात मोठ्या प्रमाणावर लागू केले जाईल, ज्यासाठी जागतिक निविदा आधीच जारी केल्या गेल्या आहेत. पण तुम्हाला माहित्येय का की या प्लास्टिक नोटांच्या छपाईसाठी आतापेक्षा जास्त खर्च होऊ शकतो.
प्लास्टिक नोटांच्या छपाईसाठी किती खर्च येणार?
प्लास्टिक नोटांच्या छपाईचा खर्च सुरुवातीला थोडा महाग वाटतो. सध्या प्लास्टिक किंवा पॉलिमर शीटवर नोटांच्या छपाईचा खर्च सामान्य कागदी नोटा छापण्यासाठी लागणाऱ्या खर्चापेक्षा लक्षणीयरीत्या जास्त आहे. उदाहणार्थ आरबीआयला सध्या 10 रुपयाची कागदी नोट छापण्यासाठी अंदाजे 1.01 रुपये खर्च होतो पण, प्रगत सुरक्षा वैशिष्ट्ये आणि विशेष पॉलिमर शीटसह प्लास्टिकवर छापण्यासाठी सुरुवातीचा छपाईचा खर्च वाढतो, आणि 10 रुपयाची पॉलिमर नोट छापण्यासाठी 2 ते 6 खर्च येऊ शकतो.
प्लास्टिकच्या नोटा फायदेशीर कशा?
सुरुवातीला छपाईचा खर्च जास्त होऊनही प्लास्टिक नोटा दीर्घकाळात भारतीय अर्थव्यवस्था आणि रिझर्व्ह बँकेसाठी खूप फायदेशीर ठरतील. सामान्य कागदी नोटा धूळ आणि घाणीमुळे खूप लवकर फाटतात किंवा खराब होतात, परिणामी रिझर्व्ह बँकेला त्या वारंवार बदलाव्या लागतात. याउलट या नवीन पॉलिमर नोटा कागदी नोटांपेक्षा किमान 3 ते 4 पट जास्त काळ टिकतील. पाणी, घाम, तेल आणि धुळीचा या नोटांवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही, ज्यामुळे जास्त काळ टिकतील.
प्लॅस्टिकच्या नोटा कागदी चलनापेक्षा वेगळ्या कशा?
सध्याच्या चलनी नोटा कापसाचे मिश्रण असलेल्या कागदापासून बनवल्या आहेत तरीही प्लास्टिकच्या नोटा पातळ आणि लवचिक पदार्थापासून बनवल्या जातील. पण प्लास्टिकच्या नोटा असूनही त्या क्रेडिट किंवा डेबिट कार्डांइतक्या कडक नसतील आणि सहजपणे फोल्ड करून पाकीट किंवा वॉलेटमध्ये ठेवता येतील. कागदी नोटांप्रमाणेच या पॉलिमर नोटा वापरता येतील.
कोणत्या 60 देशांमध्ये प्लास्टिक नोटांचा ट्रेंड
आतापर्यंत जवळपास 60 देशांमध्ये प्लास्टिक नोटा वापरल्या जातात. सर्वप्रथम ऑस्ट्रेलियाने या प्लास्टिक नोटांचा ट्रेंड सुरू केलेला तर सध्या कॅनडा, सिंगापूर, मलेशिया, थायलंड, इंडोनेशिया आणि रोमानियामध्ये देखील पॉलिमर चलनाचा वापर केला जातो. ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि ब्रिटन यासारख्या देशांनी पॉलिमर चलने पूर्णपणे स्वीकारली, तर इतर अनेक देशांमध्ये अंशतः वापर केला जातो.
जुन्या नोटा बंद होणार का?
सध्याच्या कागदी चलनाच्या छपाईचा खर्च जास्त आहेच पण, या नोटा फारकाळ टिकातही नाही. याउलट प्लास्टिकच्या नोटा सहज फाटत नाही किंवा खराब होत नाही, म्हणजे प्लास्टिकच्या नोटा कागदी नोटांपेक्षा जास्त काळ टिकतात आणि अधिक स्वच्छ राहतात. या नोटेमध्ये ट्रान्सपरंट विंडो, मायक्रो-ऑप्टिक होलोग्राम आणि एका विशेष प्रकारच्या शाईसह वर्धित सुरक्षा वैशिष्ट्ये देखील जेणेकरून या नोटांची नक्कल करणे शक्य होणार नाही.
