Ratnagiri Vashishthi River Gujarat 40 Year Old Amit Shah Ends his Life; गुजरातच्या युवकाचा कोकणच्या तरुणीशी प्रेमविवाह, नदीत सापडला अमित शहाचा देह; वाशिष्ठी नदीत काय घडलं?
Ratnagiri Vashishthi River Gujarat 40 Year Old Amit Shah Ends his Life; गुजरातच्या युवकाचा कोकणच्या तरुणीशी प्रेमविवाह, नदीत सापडला अमित शहाचा देह; वाशिष्ठी नदीत काय घडलं?
Ratnagiri Vashishthi Young Man Ended his Life : रत्नागिरी जिल्ह्यातील वाशिष्ठी नदीत एका 40 वर्षीय युवकाने आपलं आयुष्य संपवलं. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
वाशिष्ठी नदी अमित शहा यांची आत्महत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
रत्नागिरी : राज्यात आत्महत्या करण्याचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशीच एक दुर्दैवी घटना रत्नागिरी जिल्ह्यात चिपळूण येथे वाशिष्ठी नदी परिसरात घडली आहे. मुंबई येथे वास्तव्यास असलेल्या एका 40 वर्षीय युवकाने चिपळूणमध्ये आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना काल गुरुवारी रोजी सकाळी समोर आली आहे. चिपळूण येथील गांधारेश्वर पुलावरून नदीत उडी घेऊन या युवकाने आत्महत्या केली आहे. अमित शहा असं या तरुणाचं नाव आहे. गांधारेश्वर पुलावरून वाशिष्ठी नदीत उडी घेतली या घटनेनंतर सुरू करण्यात आलेल्या शोधमोहीमेदरम्यान आज सकाळी त्यांचा मृतदेह फरशी तिठा पुलाजवळ आढळून आला. या घटनेमुळे चिपळूणसह त्यांच्या नातेवाईकांमध्ये शोककळा पसरली असून, आत्महत्येमागील कारणांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
चिपळूण पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमित शहा हे मूळचे गुजरात राज्यातील रहिवासी होते. गेल्या अनेक वर्षांपासून ते मुंबई येथे वास्तव्यास होते. सुमारे 12 वर्षांपूर्वी त्यांनी चिपळूण तालुक्यातील वैजी गावातील एका युवतीशी प्रेमविवाह केला होता. विवाहानंतर ते मुंबईत स्थायिक झाले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून ते मानसिक तणावाखाली होते का, अथवा अन्य कोणत्या कारणामुळे त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. Siya Goyal Mom Dad : आम्ही म्हटलेलं सिया 19 वर्षांचीच, इतक्यात लग्न नको, पण ‘ते’ मागे लागले; बाबांचा वेगळाच दावा; तिची 10 वेळा पसंती विचारलेली! 21 जून रविवारी रोजी अमित शहा रेल्वेने चिपळूण येथे आले होते. चिपळूणमध्ये आल्यानंतर त्यांनी काही नातेवाईक आणि परिचितांची भेट घेतली होती का? याचाही तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, काल गुरुवारी रोजी त्यांनी चिपळूण शहरालगत असलेल्या गांधारेश्वर पुलावरून वाशिष्ठी नदीत उडी घेतल्याची माहिती समोर आली. पुलाजवळील काही नागरिकांकडून संशयास्पद हालचाली पाहिल्याचंही सांगितलं जात आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांना सतर्क करण्यात आलं आणि शोधमोहीम सुरू करण्यात आली.
आज सकाळी मृतदेह आढळला
वाशिष्ठी नदीच्या पात्रात शोधकार्य सुरू असतानाच आज सकाळी चिपळूण शहरातील पेठमाप परिसरातील फरशी तिठा पुलाजवळ एका व्यक्तीचा मृतदेह पाण्यावर तरंगताना स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आला. नागरिकांनी तत्काळ याची माहिती चिपळूण पोलिसांना दिली. माहिती मिळताच पोलीस आणि संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. नदीतून मृतदेह बाहेर काढण्यात आला आणि ओळख पटविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यानंतर तो मृतदेह अमित शहा यांचाच असल्याचं निष्पन्न झालं. Crime News: ‘गे’ डेटिंग ॲपवरून मैत्री, भेटायला बोलावलं अन् नंतर तरुणासोबत भयंकर प्रकार; सीसीटीव्ही फुटेजमधून बिंग फुटलं! घटनेनंतर पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला. पुढील वैद्यकीय आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी मृतदेह कामथे उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे नेमकं कारण आणि इतर बाबी अधिक स्पष्ट होण्याची शक्यता आहे. सध्या चिपळूण पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत असून, मृताच्या कुटुंबीयांशी आणि संबंधित व्यक्तींशी संपर्क करून घ्यायची माहिती घेऊन तपास सुरू आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा