Headlines

Ratnagiri BJP leader Pramod Jathar Birthday Wish post for Shiv Sena leader Rajan Salvi;शिंदेसेनेच्या साळवींच्या वाढदिवसापूर्वीच भाजप नेत्याची कौतुकाची पोस्ट, कोकणात चर्चांना उधाण, ‘शत-प्रतिशत’चा नारा चर्चेत


Maharashtra Politics : एकनाथ शिंदे यांचे शिलेदार असलेले माजी आमदार राजन साळवी यांना शुभेच्छा देणारी सोशल मीडियावर पोस्ट भाजप आमदार प्रमोद जठार यांनी केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या

Pramod Jathar Rajan Salvi Maharashtra Times
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
प्रसाद रानडे, रत्नागिरी : विधान परिषदेवरील कोकणातील भाजप आमदार प्रमोद जठार यांनी शिंदेंच्या शिवसेनेचे नेते राजन साळवी यांचे कौतुक केले. साळवी पुन्हा एकदा आमदार-खासदार होतील असे सूचक वक्तव्य केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. जठारांच्या वक्तव्याने साळवी पुन्हा पक्षांतर करुन भाजपचा झेंडा हाती धरणार का, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

जठारांच्या साळवींना शुभेच्छा

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिलेदार असलेले माजी आमदार राजन साळवी यांना शुभेच्छा देणारी सोशल मीडियावर पोस्ट भाजप आमदार प्रमोद जठार यांनी केल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरु झाल्या आहेत. प्रमोद जठार यांनी कोकणात शत प्रतिशत भाजपचा नारा देत पक्ष संघटनेचे काम करत भाजपा वाढवणे हेच आपलं ध्येय असल्याचे असल्याचे विधान यापूर्वीही केले होते. त्यामुळे जठार यांच्या या विधानाचे अनेक अर्थ काढले जात आहेत.

VIDEO | नागपुरातून मुख्यमंत्र्यांचं शेतकऱ्यांबाबत मोठं वक्तव्य

साळवींचं भरभरुन कौतुक

प्रमोद जठार व माजी आमदार राजन साळवी हे दोघेही पूर्वी एकाच वेळेला निवडून गेलेले सहकारी मित्र आहेत. आम्ही दोघेही एकत्र विधानसभा निवडणुकीत निवडून आलो आणि आमदार म्हणून काम करण्याची संधी मिळाली. राजन साळवी यांनी सलग तीन वेळा आमदार म्हणून जनतेची सेवा केली. त्यांच्या कार्यपद्धतीतील सर्वात मोठा गुण म्हणजे जनतेशी असलेला अखंड संपर्क. रात्री १२ वाजेपर्यंत मतदारसंघात फिरून नागरिकांच्या सुख-दुःखात सहभागी होणे, कोणाचे लग्न असो, साखरपुडा, बारसे असो किंवा इतर कोणताही कौटुंबिक कार्यक्रमात ते आवर्जून उपस्थित राहत असत. आज आमदार नसतानाही त्यांनी जनतेशी असलेला संवाद आणि संपर्क तितक्याच आत्मीयतेने कायम ठेवला आहे. जनतेचा विश्वास आणि प्रेम हेच त्यांच्या राजकीय प्रवासाचे खरे बळ आहे, असे जठार म्हणतात.
Maharashtra TimesMumbai Crime : आई फोन का नाही उचलत! लेकीची चिंता वाढली, नातेवाईकांनी पवार कुटुंबाचं दार तोडलं, घरात भयंकर दृश्य, २३ वर्षांचा शेजारी अटक

‘पुन्हा आमदार-खासदार होतील’

मला पूर्ण विश्वास आहे की, त्यांच्या सातत्यपूर्ण जनसंपर्कामुळे आणि लोकाभिमुख कार्यामुळे येणाऱ्या काळात ते निश्चितच पुन्हा आमदार किंवा खासदार म्हणून जनतेचे नेतृत्व करतील अशा स्वरूपाची कौतुक करणारी पोस्ट जठार यांनी आपल्या फेसबुक पेजवर केली असून या दोघांच्या भेटीचे फोटोही त्यांनी शेअर केले आहेत.
Maharashtra TimesSiya Goyal : केतन आपल्याला वरुन पाहतोय, खंबीर राहा; सियाचा ‘सासऱ्यांना’ धीर, जेलमध्ये जाण्याची पूर्वतयारी, सर्च हिस्ट्रीत भांडाफोड

वाढदिवसापूर्वीच शुभेच्छांची पोस्ट

माजी आमदार राजन साळवी यांच्याकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धाराशिव जिल्ह्याची संघटनात्मक पातळीवर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. काही महिन्यांपूर्वी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणुकीत साळवी यांच्या नेतृत्वाखाली चांगलं यश आलं. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर माजी आमदार राजन साळवी हे धाराशिवमध्ये व्यस्त राहिल्याने कोकणात फारसे दिसत नाहीत. ही सगळी पार्श्वभूमी असताना आता अशातच राजन साळवी यांचा 9 जुलै रोजी वाढदिवस आहे. प्रमोद जठार यांनी चार दिवस आधीच ही पोस्ट लिहून साळवी यांच्या कामाचे कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत त्यामुळे विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.

या सगळ्या पार्श्वभूमी वरती माजी आमदार राजन साळवी यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

अनिश बेंद्रे

लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.

पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.

अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.

शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.आणखी वाचा