Headlines

Ran Away to Marry Now Living Under a Leaking Roof Couples Reality Goes Viral | प्रेमासाठी आई-वडिलांना सोडलं, घरातून पळाल्यावर मिळाला रिअ‍ॅलिटी चेक, गरीब मुलामुळे मोडक्या झोपडीत करतेय संसार, तरुणीचा व्हिडीओ व्हायरल


Relationship Reality and Financial Struggles: प्रेम करणं सोपं असतं, पण जेव्हा जबाबदाऱ्या अंगावर येतात, तेव्हा प्रेमाचा खरा कस लागतो. अशाच एका तरुणीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. ती एका मोडकळीस आलेल्या झोपडीत संसार करत आहे. घरातून पळून जाऊन लग्न केल्यानंतरचं वास्तव तिनं या व्हिडिओमधून दाखवलं आहे.

Love Marriage
(फोटो सौजन्य – @RealNainaSingh/x.com)
प्रेमात सर्वकाही माफ असतं, असं म्हणतात. पण नुसतं प्रेम करून भागत नाही; पोट भरण्यासाठी पैसेही लागतात, हेही तितकंच खरं आहे. याच वास्तवाचा अनुभव आलेल्या एका तरुणीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. प्रेमाच्या भरात या तरुणीनं आई-वडिलांच्या विरोधात जाऊन लग्न केलं. मात्र, आता ती एका व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या घराची परिस्थिती दाखवत आहे. कच्चं छप्पर, अपूर्ण भिंती आणि अत्यंत साधं राहणीमान अशा परिस्थितीत ती दिवस काढत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेक नेटकरी तिच्यावर टीका करत आहेत. तसेच, “पालकांचं ऐकलं असतं तर ही वेळ आली नसती,” असे उपरोधिक टोलेही मारले जात आहेत.

काय म्हणाली तरुणी?

हा व्हिडिओ @RealNainaSingh या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये झळकणारी तरुणी प्रेमविवाहानंतरचं वास्तव मांडताना दिसते. तिच्या घराचं छप्पर गळतं, भिंतींना प्लास्टर केलेलं नाही. घरात ना फर्निचर आहे, ना बसण्यासाठी सोफा. धान्य ठेवण्यासाठी ते प्लास्टिकच्या ड्रमचा वापर करतात. तर स्वयंपाकघराच्या नावाखाली फक्त एक छोटीशी चूल आहे. तरुणी सांगते की, घरातून पळून जाऊन लग्न करण्याचा निर्णय जितका रोमँटिक वाटतो, तितकंच त्यानंतरचं आयुष्य कठीण असतं. मात्र, व्हिडिओच्या शेवटी ती म्हणते, “आमच्याकडे सोयी-सुविधा नसल्या तरी आम्ही आनंदी आहोत. रडत बसण्यापेक्षा संकटांवर मात करण्याचा प्रयत्न करत आहोत.”

नेटकरी काय म्हणताहेत?

हा व्हिडिओ आतापर्यंत ६ लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. अनेकांनी या व्हिडिओवर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी या परिस्थितीला प्रेमाची खरी परीक्षा म्हटलं आहे, तर काहींनी तरुणीला पालकांकडे परत जाण्याचा सल्ला दिला आहे. मात्र, या प्रकरणातून एक गोष्ट स्पष्ट होते की, आयुष्य जगण्यासाठी केवळ प्रेम पुरेसं नसतं; आर्थिक स्थैर्यही तितकंच महत्त्वाचं असतं. त्याचबरोबर नवरा-बायकोनं एकमेकांना खंबीर साथ दिली, तर आर्थिक संकटावरही मात करता येऊ शकते. असो, या प्रकरणाबद्दल तुमचं मत काय? तुमच्या प्रतिक्रिया नक्की द्या.

मंदार गुरव

लेखकाबद्दलमंदार गुरवमंदार गुरव हे गेल्या १० वर्षांपासून डिजिटल पत्रकारीता या क्षेत्रात काम करत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्समध्ये गेल्या ५ वर्षांपासून व्हायरल सेक्शनमध्ये कार्यरत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ, मीम्स आणि चर्चेत असलेल्या घडामोडी वेळेवर आणि जबाबदारीनं वाचकांपर्यंत पोहोचवणं, हे त्यांचं मुख्य काम आहे. सोबतच खेळ आणि गुन्हेगारी विश्वातील व्हायरल गोष्टींवरही ते सातत्यानं काम करतात. डिजिटल माध्यमं ही अत्यंत वेगानं माहिती देण्यासाठी ओळखली जातात. पण या वेगातही माहिती खरी आहे का? याची खात्री करून घेत आणि पत्रकारितेचा विश्वास जपत, मंदार आपलं काम चोख बजावत आहेत.

डिजिटल पत्रकारितेच्या या प्रवासात मंदार गुरव यांनी आतापर्यंत १० हजारांहून अधिक लेख लिहिले आहेत. वाचकांना जलद, स्पष्ट आणि विश्वासार्ह माहिती मिळावी, यासाठी ते नेहमी प्रयत्न करतात. व्हायरल न्यूज, क्रीडा बातम्या, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी तसंच संशोधनावर आधारित विशेष लेख लिहिताना विषय साध्या आणि अत्यंत सोप्या भाषेत मांडणं हे त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य आहे.

महाराष्ट्र टाईम्स पूर्वी मंदार गुरव यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये ५ वर्षे मनोरंजन आणि स्पोर्ट्स विभागासाठी लेखन केलं आहे. याच काळात लोकसत्ता वर्तमानपत्रामध्ये हॉलिवूडच्या टेकडीवरून हा कॉलम सुद्धा त्यांनी ३ वर्षे सातत्याने लिहिला. या कॉलममधून हॉलिवूडमधील घडामोडी, आंतरराष्ट्रीय मनोरंजन बातम्या, चित्रपटांचे रिव्ह्यू तसेच सायन्स फिक्शन चित्रपटांमधील रंजक आणि मजेशीर माहिती त्यांनी वाचकांसमोर मांडली. तसंच लोकसत्ता डिजिटल अड्डामध्ये अनेक मराठी आणि हिंदी कलाकारांच्या मुलाखतींमध्ये सहभागी होत, मनोरंजन क्षेत्राचा अनुभव अधिक वाढवला.

क्रीडा पत्रकारितेच्या क्षेत्रातही मंदार यांचा अनुभव खुप चांगला आहे. त्यांनी क्रिकेट वर्ल्ड कप, IPL आणि २०२० टोकियो ऑलिम्पिक यांसारख्या लोकप्रिय स्पर्धांचे कव्हरेज केले आहे. खेळाडूंची कामगिरी, संघांची तयारी आणि स्पर्धांमागील महत्त्वाच्या घडामोडी वाचकांना सोप्या भाषेत समजावून सांगणे, हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.

राजकीय घडामोडींच्या कव्हरेजमध्येही मंदार गुरव यांनी मुंबई महानगरपालिका निवडणूक २०१७, लोकसभा निवडणूक २०१९ आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ यांचे सविस्तर वृत्तांकन केले आहे. निवडणुकांशी संबंधित बातम्या, महत्त्वाचे मुद्दे आणि निकाल समतोल आणि तथ्यांच्या आधारावर मांडण्याचा अनुभव त्यांना आहे.

शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मंदार गुरव यांनी साठ्ये कॉलेज, मुंबई विद्यापीठ येथून बॅचलर इन मास मीडिया ही पदवी घेतली आहे. शिक्षणातून मिळालेलं ज्ञान आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव एकत्र वापरून, वाचकांना उपयुक्त आणि दर्जेदार माहिती देणं, हा मंदार गुरव यांचा मुख्य हेतू आहे.आणखी वाचा