Ramdas kadam acquitted after 20 years case filed in karnataka due to belgaum speech; बाळासाहेबांचा आदेश, कर्नाटकात झंझावाती भाषण अन् गंभीर गुन्हा दाखल; रामदास कदमांची २० वर्षानंतर मुक्त
Ramdas kadam acquitted after 20 years case filed in karnataka due to belgaum speech; बाळासाहेबांचा आदेश, कर्नाटकात झंझावाती भाषण अन् गंभीर गुन्हा दाखल; रामदास कदमांची २० वर्षानंतर मुक्त
प्रसाद रानडे, रत्नागिरी: बेळगांव, धारवाड, निपाणी, बिदरीसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे, या मागणीसाठी २००६ साली शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी रामदास कदम यांना बेळगावमध्ये पाठवले होते. त्यावेळी बेळगांव खानापूर येथे प्रचंड मोठी जाहीर सभा झाली होती. त्याआधी बेळगांव येथील मराठी महापौरांच्या तोंडाला काळे फासण्याचे कामही काही कन्नड गुंडांनी केले होते. या धर्तीवर शिवसेनाप्रमुखांच्या आदेशानुसार बेळगांव येथे जाऊन रामदास कदम, नितीन बानगुडे पाटील यांनी सभा घेतली होती. यावेळी रामदास कदम आणि नितीन बानगुडे पाटील यांनी कर्नाटक शासनावर भाषणातून हल्लाबोल केला होता. प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी त्यांच्यावर खानापूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सलग २० वर्षे चाललेल्या या खटल्याचा निकाल लागला असून सुनावणी पूर्ण झाल्यावर ११ ऑगस्ट रोजी खानापूर न्यायालयाकडून पुराव्यांअभावी त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
महाराष्ट्र एकीकरण समितीने खानापूर येथे २००६ साली सीमा प्रश्नासंदर्भात मेळावा घेतला होता. यावेळी महाराष्ट्रातील नेते या मेळाव्याला उपस्थित होते. मेळाव्यात रामदास कदम आणि नितीन बानगुडे पाटील यांनी कर्नाटक शासनावर भाषणातून हल्लाबोल केला होता. प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी त्यांच्यावर खानापूर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. भारतीय दंडसंहिता कलम १५३ आणि १५३/ए अन्वये हा गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याची सुनावणी पूर्ण होऊन खानापूर न्यायालयाने रामदास कदम आणि नितीन बानगुडे पाटील यांची मंगळवारी निर्दोष मुक्तता केली आहे. वकील शामसुंदर पत्तार, हेमराज बेंच्चन्नावर यांनी त्यांच्या वतीने काम पाहिले.
दरम्यान, रामदास कदम आणि नितीन बानगुडे पाटील हे आधी सुनावणीला हजर राहिले नाहीत. त्यामुळे खानापूर न्यायालयाने या दोघांवर अटक वॉरंट जारी केले होते. यावेळी समिती कार्यकर्ते यशवंत बिरजे आणि महादेव घाडी हे कोर्टात जामीन राहिले होते. त्यानंतर खानापूर न्यायालयाने रू. १० लाख रूपयांच्या जामीनावर रामदास कदम यांना सोडले होते. आता या दोन्ही नेत्यांची पुराव्याअभावी मुक्तता करण्यात आली आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा