Headlines

Ramayana Trailer Out Ranbir Kapoor Stuns as Lord Ram Fans Call It a Visual Spectacle | भव्य व्हिज्युअल्स, दमदार स्टारकास्ट! ‘रामायण’च्या ट्रेलरनं जिंकली प्रेक्षकांची मनं, पाहा प्रेक्षकांनी दिलेल्या भन्नाट रिअ‍ॅक्शन


Ramayana Trailer: रामायण चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. भव्य व्हिज्युअल्स, दमदार कलाकार, जागतिक दर्जाचं संगीत आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे हा चित्रपट २०२६ मधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या चित्रपटांपैकी एक ठरण्याची चिन्हे दिसत आहेत.

Ramayana Movie
(फोटो सौजन्य – @iktaraax, @PermeshwarNathJ/x.com)
बहुप्रतिक्षित ‘रामायण’ चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. हा चित्रपट प्रभू श्रीराम यांच्या जीवनावर आधारित आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ट्रेलरमध्ये भव्य व्हिज्युअल्स, आधुनिक व्हीएफएक्स, दमदार युद्धदृश्ये आणि राम-रावण संघर्षाची प्रभावी झलक पाहायला मिळते. अवघ्या तासाभरात या ट्रेलरला युट्युबवर ३ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. यावरून या चित्रपटाची क्रेझ किती मोठी आहे, याची कल्पना येते. चला तर मग, ट्रेलर पाहिल्यानंतर प्रेक्षकांनी सोशल मीडियावर दिलेल्या काही निवडक प्रतिक्रिया जाणून घेऊया.

या चित्रपटाचं दिग्दर्शन नितेश तिवारी यांनी केलं आहे. ते गेली अनेक वर्षे या चित्रपटाच्या निर्मितीवर काम करत आहेत.

या चित्रपटात बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर प्रभू श्रीराम यांची मुख्य भूमिका साकारणार आहे. तर दाक्षिणात्य अभिनेत्री साई पल्लवी सीतेची भूमिका साकारताना दिसणार आहे.

रामायणातील मुख्य खलनायक रावण ही व्यक्तिरेखा दाक्षिणात्य सुपरस्टार यश साकारताना दिसणार आहे.

चित्रपटाची निर्मिती अत्यंत भव्य प्रमाणात करण्यात आली असून, आधुनिक व्हीएफएक्स आणि हॉलिवूड दर्जाच्या तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.

चित्रपटाचे संगीत ऑस्कर विजेते ए. आर. रेहमान आणि हॉलिवूडमधील दिग्गज संगीतकार हॅन्स झिमर यांनी एकत्रितपणे तयार केलं आहे.

हॅन्स झिमर यांनी आपल्या कारकिर्दीत पायरेट्स ऑफ द कॅरिबियन, द लायन किंग, इंटरस्टेलर, इन्सेप्शन, ग्लॅडिएटर यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांसाठी संगीत तयार केलं आहे.

हा चित्रपट दोन भागांमध्ये प्रदर्शित होणार असून, पहिला भाग दिवाळी २०२६ मध्ये प्रदर्शित होणार आहे.

मंदार गुरव

लेखकाबद्दलमंदार गुरवमंदार गुरव हे गेल्या १० वर्षांपासून डिजिटल पत्रकारीता या क्षेत्रात काम करत आहेत. ते महाराष्ट्र टाइम्समध्ये गेल्या ५ वर्षांपासून व्हायरल सेक्शनमध्ये कार्यरत आहेत. सोशल मीडियावर व्हायरल होणारे व्हिडीओ, मीम्स आणि चर्चेत असलेल्या घडामोडी वेळेवर आणि जबाबदारीनं वाचकांपर्यंत पोहोचवणं, हे त्यांचं मुख्य काम आहे. सोबतच खेळ आणि गुन्हेगारी विश्वातील व्हायरल गोष्टींवरही ते सातत्यानं काम करतात. डिजिटल माध्यमं ही अत्यंत वेगानं माहिती देण्यासाठी ओळखली जातात. पण या वेगातही माहिती खरी आहे का? याची खात्री करून घेत आणि पत्रकारितेचा विश्वास जपत, मंदार आपलं काम चोख बजावत आहेत.

डिजिटल पत्रकारितेच्या या प्रवासात मंदार गुरव यांनी आतापर्यंत १० हजारांहून अधिक लेख लिहिले आहेत. वाचकांना जलद, स्पष्ट आणि विश्वासार्ह माहिती मिळावी, यासाठी ते नेहमी प्रयत्न करतात. व्हायरल न्यूज, क्रीडा बातम्या, मनोरंजन क्षेत्रातील घडामोडी तसंच संशोधनावर आधारित विशेष लेख लिहिताना विषय साध्या आणि अत्यंत सोप्या भाषेत मांडणं हे त्यांच्या लिखाणाचं वैशिष्ट्य आहे.

महाराष्ट्र टाईम्स पूर्वी मंदार गुरव यांनी लोकसत्ता ऑनलाईनमध्ये ५ वर्षे मनोरंजन आणि स्पोर्ट्स विभागासाठी लेखन केलं आहे. याच काळात लोकसत्ता वर्तमानपत्रामध्ये हॉलिवूडच्या टेकडीवरून हा कॉलम सुद्धा त्यांनी ३ वर्षे सातत्याने लिहिला. या कॉलममधून हॉलिवूडमधील घडामोडी, आंतरराष्ट्रीय मनोरंजन बातम्या, चित्रपटांचे रिव्ह्यू तसेच सायन्स फिक्शन चित्रपटांमधील रंजक आणि मजेशीर माहिती त्यांनी वाचकांसमोर मांडली. तसंच लोकसत्ता डिजिटल अड्डामध्ये अनेक मराठी आणि हिंदी कलाकारांच्या मुलाखतींमध्ये सहभागी होत, मनोरंजन क्षेत्राचा अनुभव अधिक वाढवला.

क्रीडा पत्रकारितेच्या क्षेत्रातही मंदार यांचा अनुभव खुप चांगला आहे. त्यांनी क्रिकेट वर्ल्ड कप, IPL आणि २०२० टोकियो ऑलिम्पिक यांसारख्या लोकप्रिय स्पर्धांचे कव्हरेज केले आहे. खेळाडूंची कामगिरी, संघांची तयारी आणि स्पर्धांमागील महत्त्वाच्या घडामोडी वाचकांना सोप्या भाषेत समजावून सांगणे, हे त्यांच्या लेखनाचं वैशिष्ट्य आहे.

राजकीय घडामोडींच्या कव्हरेजमध्येही मंदार गुरव यांनी मुंबई महानगरपालिका निवडणूक २०१७, लोकसभा निवडणूक २०१९ आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ यांचे सविस्तर वृत्तांकन केले आहे. निवडणुकांशी संबंधित बातम्या, महत्त्वाचे मुद्दे आणि निकाल समतोल आणि तथ्यांच्या आधारावर मांडण्याचा अनुभव त्यांना आहे.

शिक्षणाच्या बाबतीत सांगायचं झालं तर मंदार गुरव यांनी साठ्ये कॉलेज, मुंबई विद्यापीठ येथून बॅचलर इन मास मीडिया ही पदवी घेतली आहे. शिक्षणातून मिळालेलं ज्ञान आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव एकत्र वापरून, वाचकांना उपयुक्त आणि दर्जेदार माहिती देणं, हा मंदार गुरव यांचा मुख्य हेतू आहे.आणखी वाचा