Headlines

Rajiv Kapoor : ‘कपूर’ घराण्यातील अभिनेता, अपयशाचं खापर वडिलांवर फोडलं, लग्नाच्या 2 वर्षात काडीमोड अन् दारूच्या आहारी; वयाच्या 58व्या वर्षी मृत्यू


Rajiv Kapoor : राज कपूर यांचा मुलगा राजीव कपूर यांना प्रोफेशनल आयुष्यातसुद्धा संघर्ष करावा लागला. तसेच वैयक्तिक आयुष्यातही त्यांनी त्रास सहन केला.

Rajiv Kapoor Unknown Facts
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – हिंदी चित्रपटसृष्टीतील कपूर कुटुंबाचं नाव आजही मोठ्या आदरानं घेतलं जाते. या कुटुंबातील अनेक कलाकारांनी बॉलिवूडमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. मात्र, या घराण्यातील प्रत्येक कलाकाराला अपेक्षित यश मिळालंच असं नाही. राज कपूर यांचा धाकटा मुलगा राजीव कपूर यांचं करिअरही याच कारणामुळे चर्चेत राहिलं.

राजीव कपूर यांनी १९८३ मध्ये ‘एक जान हैं हम’ या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा यशस्वी ठरला नाही. त्यानंतर वडील राज कपूर यांनी त्यांना आपल्या ‘राम तेरी गंगा मैली’ या चित्रपटातून मोठी संधी दिली. १९८५ मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट यशस्वी झाला. ‘राम तेरी गंगा मैली’मध्ये राजीव कपूर मुख्य भूमिकेत होते, तर या सिनेमात मंदाकिनी यांनी त्यांच्यासोबत काम केलेलं. चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आणि हा सिनेमा त्या काळातील मोठ्या हिट चित्रपटांपैकी एक ठरला. मात्र, या यशाचं श्रेय मंदाकिनी यांच्या भूमिकेला मिळालं. त्यामुळे राजीव कपूर नाराज झाले. आपली भूमिकेची आणि अभिनयाची दखल घेतली गेली नाही, अशी भावना त्यांच्या मनात निर्माण झाली आणि याच कारणावरून त्यांचे वडील राज कपूर यांच्याशी मतभेद झाले.

Ayush Bhide Interview : कानफटात मारावीशी वाटते, आयुष भिडेला निगेटिव्ह रोलमुळे भन्नाट कमेंट्स

वडिलांवरच फोडलं अपयशाचं खापर?

राजीव कपूर यांना आपल्या अभिनय कारकिर्दीकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र, ‘राम तेरी गंगा मैली’सारखा मोठा चित्रपट मिळूनही त्यांना अपेक्षित स्टारडम मिळालं नाही. त्यानंतर त्यांनी ‘अंगारे’, ‘हम तो चले परदेस’, ‘लव्हर बॉय’ यांसह अनेक चित्रपटांमध्ये काम केलं, परंतु त्यांच्या करिअरला वेग मिळाला नाही. राजीव आपल्या करिअरच्या अपयशासाठी वडिलांना जबाबदार मानत होते. ‘राम तेरी गंगा मैली’नंतर दोघांमध्ये निर्माण झालेले मतभेद पुढेही कायम राहिले. राज कपूर यांनी त्यानंतर राजीव यांना आपल्या एकाही चित्रपटात प्रमुख भूमिका दिली नाही. यामुळे दोघांमध्ये दुरावा निर्माण झाला.

Maharashtra TimesRenuka Daftardar : ‘शास्त्र असतं ते…’ फेम रेणुका दफ्तरदार पुन्हा झळकणार मोठ्या पडद्यावर, हास्यजत्रा फेम अभिनेताही सोबतीला, प्रेक्षक उत्सुक
१९८८ मध्ये राज कपूर यांचं निधन झालं. वडिलांशी असलेल्या नाराजीमुळे राजीव कपूर त्यांच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहिले नव्हते. अभिनयात अपेक्षित यश न मिळाल्यानंतर राजीव कपूर यांनी पुढे निर्मिती आणि दिग्दर्शनाकडे वळण्याचा प्रयत्न केला. १९९६ मध्ये त्यांनी ‘प्रेम ग्रंथ’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं. या चित्रपटात त्यांचे भाऊ ऋषी कपूर आणि माधुरी दीक्षित मुख्य भूमिकेत होते. त्यानंतर त्यांनी सिनेमाची निर्मितीही केली.

Maharashtra TimesKriti Sanon : ‘स्त्रियांनी काय घालावं हे सांगणं कधी थांबवणार? संस्कृतीचा आदर तिच्या मनात असतो’, कंगनाच्या टीकेवर क्रितीचं सडेतोड उत्तर

अभिनेत्याला लागलं दारूचं व्यसन

राजीव कपूर यांना त्यांच्या प्रोफेशनल आयुष्यातच चढ-उतारांचाच सामना करावा लागला नाही, तर त्यांचे पत्नीसोबतचे संबंधही चांगले नव्हते होते. २००१ मध्ये, या अभिनेत्यानं आर्किटेक्ट आरती सभरवाल यांच्याशी लग्न केलं, परंतु २००३ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. पत्नीपासून विभक्त झाल्यानंतर, त्यांनी पुण्यात एक बंगला विकत घेतला आणि एकटे राहू लागले. राजीव यांना दारूचं व्यसन लागलं आणि दारूच्या व्यसनामुळे त्यांच्या आयुष्यात अनेक अडचणी निर्माण झाल्या. मात्र, नंतर ते त्यांचे भाऊ रणधीर कपूर यांच्या चेंबूर येथील घरी राहायला गेले. एकाकीपणामुळे त्रस्त होऊन, ९ फेब्रुवारी २०२१ रोजी मुंबईत हृदयविकाराच्या झटक्यानं राजीव कपूर यांचं निधन झालं.

तेजश्री कुलये

लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.

तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.

तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.

पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.आणखी वाचा