मुंबई– राज्यासह पुण्यात मुसळधार पाऊसाने कहर केला होता, त्याचा परिणाम रेल्वे वाहतूकीवर झाल्याचे पाहायला मिळाले..अनेक ठिकाणी दरड कोसळ्याचा घटना घडल्याचे समोर आल्या होत्या . मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर देखील याला अपवाद राहीला नाही.. मुंबई-पुणे रेल्वे मार्गावर नुकताच दोन दिवसापुर्वी दरड कोसळला यामुळे मुंबई-पुणे रेल्वे मार्ग बंद झाला होता त्याचवेळी एक्सप्रेस वे सुद्धा पाण्याने भरुन गेला होता. एक्सप्रेस वे ला नदीच स्वरुप आलं होतं. म्हणून एक्सप्रेसवे सुद्धा वाहतूक मंदावलेली.
याच दरम्यान काही हजार कोटी रुपये खर्चून बांधलेला मिसिंग लिंकचा काही भाग कोसळला. या घटनेमुळे विरोधकांनी सत्ताधारांना धारेवर धरले होते.. … हजारों कोटी खर्च करुनही मिसिंग लिंक कसा कोसळु शकतो असा सवाले देखील करण्यात आला होता.. यावर मुख्यमंत्री देवेंन्द्र फडवणीस यांनी यात राजकारण करु नये अशी प्रतीक्रीया दिली होती.. यावर आता राज ठाकरे यांनी देवेंन्द्र फडवणीस यांच्यावर सडकुन टीका केली..
काय म्हणाले राज ठाकरे ?
“मिसिंग लिंकवर खांब कोसळला. पाणी येतंय. म्हणे त्याचं राजकारण करू नका. अरे वा. त्याच्यावर बोललं तर राजकारण. इतके दिवस तुम्ही काय करत होता. दुसऱ्यांचं सरकार असताना तुम्ही काय करत होता. त्यावेळी आंदोलन झाली ते राजकारण नव्हतं” अशा शब्दात राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना सुनावलं.
पुढे ठाकरे म्हणाले.. “स्वत:च्या अंगाशी आल्यावर ते राजकारण. असं कसं होईल. काय म्हणतात म्हणे, एकवेळ मला बोला. पण महाराष्ट्राचा अपमान मी सहन करणार नाही. वा रे वा. लोकं त्या मिसिंग लिंकवर बोलतायत. महाराष्ट्राचा कुठे अपमान होतोय, पण सर्व घेऊन जायचं. केंद्र सरकारची सवय लागली. केंद्राच्या कोणत्या गोष्टीबद्दल बोललं तर तुम्ही देशद्रोही” अशा शब्दात राज ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. ‘मिसिंग लिंकवरुन मुख्यमंत्री विधानसभेत बोलतात बघून घेईन, अरे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री आहेस ना तू’ अशा एकेरी शब्दात राज ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना सुनावले आहे..
