Raj Kundra : राज कुंद्रानं पत्नी शिल्पा शेट्टीसाठी ‘राजस्थान रॉयल्स’ हा आयपीएल संघ विकत घेतलेला. त्याबद्दल त्यानं नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – २००९ मध्ये शिल्पा शेट्टी आणि तिचा पती, उद्योगपती राज कुंद्रा यांनी आयपीएल क्रिकेट संघ, राजस्थान रॉयल्समध्ये गुंतवणूक केली होती. यानंतर अनेकांनी हा संघ विकत घेतला. मात्र, राज कुंद्रा वादात सापडला. त्याच्यावर मॅच-फिक्सिंग आणि सट्टेबाजीचे आरोप झाले आणि त्यानंतर त्यानं क्रिकेटमधून माघार घेतली. आता, नुकत्याच एका मुलाखतीत राज कुंद्रानं खुलासा केला आहे की, त्यानं ८१.९ कोटी रुपयांचा हा करार केवळ आपली पत्नी शिल्पा शेट्टीसाठीच केला होता.
एसएमटीव्ही (SMTV) या यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत राज कुंद्राने सांगितलं की, त्यानं हा क्रिकेट संघ पत्नीसाठी व्हॅलेंटाईन डेचं गिफ्ट म्हणून विकत घेतला होता. राज कुंद्रा म्हणाला, ‘मी राजस्थान रॉयल्स हा संघ शिल्पाला व्हॅलेंटाईन डेचं गिफ्ट म्हणून विकत घेतला होता. मला शिल्पा शेट्टीची ब्रँड व्हॅल्यू माहित होती आणि मी गुंतवणूक करत होतो. मी तेव्हाच माझा हिस्सा विकत घेतला होता, पण हे प्रकरण अजूनही सुरू आहे.’
या आयपीएल संघानं राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांना बरीच प्रसिद्धी मिळवून दिली, पण नंतर तो वादात सापडला. २०१३ मध्ये, आयपीएल दरम्यान सट्टेबाजी केल्याचा आरोप त्याच्यावर झाला. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचलं. न्यायमूर्ती लोढा समितीच्या तपासाच्या आधारे, २०१५ मध्ये क्रिकेटशी संबंधित कुठल्याही कार्यक्रमाला जाण्याची बंदी घालण्यात आली. संघावरही दोन वर्षांसाठी बंदी घालण्यात आली. Shivani Rangole : ‘हिंदू की मुस्लीम, कोणत्या पक्षाला पाठिंबा देताय, हे सांगण्याची वेळ नाही’ NEET पेपरफुटीबद्दल शिवानी रांगोळे स्पष्टच बोलली दरम्यान, राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी यांच्याबद्दल सांगायचं तर राज आणि शिल्पा यांचं लग्न २२ नोव्हेंबर २००९ रोजी झालं. त्यांचा लग्नसोहळा खंडाळा येथे पार पडला असून आता या जोडप्याला एक मुलगा आणि एक मुलगी आहे.
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा