Headlines

Raj Kiran : 32 वर्षांपासून गायब आहे बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता, पत्नीनंही केलं दुसरं लग्न, महेश भट्ट म्हणालेले, ‘तो मनोरुग्ण होता’


Bollywood Actor Raj Kiran : बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता राज किरण अनेक वर्षांपासून गायब असून त्याच्या कुटुंबीयांनी त्याला शोधण्याचा प्रयत्न केला. पण, अभिनेता कुठेच सापडला नाही. जुन्या मुलाखतीमध्ये महेश भट्ट यांनी राज किरणबद्दल भाष्य केलेलं.

Actor Raj Kiran Unknown Facts
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – ‘कर्ज’ आणि ‘अर्थ’ सारख्या चित्रपटांमध्ये दिसलेले राज किरण ७० च्या दशकातील सुप्रसिद्ध कलाकारांपैकी एक होते आणि त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले. पण गेल्या तीन दशकांपासून ते बेपत्ता आहेत. राज किरण कुठे आहेत, त्यांची प्रकृती कशी आहे, किंवा ते जिवंत आहेत की नाही, याबद्दल कोणतीही माहिती उपलब्ध नाही. त्यांच्या कुटुंबीयांनी सुरुवातीला हे रहस्य बराच काळ लपवून ठेवलं होतं, पण नंतर त्यांनी यामागचं कारण उघड केलं. कुटुंबीयांनी सांगितलं की, त्यांनी अनेक वर्षे त्यांचा शोध घेतला, पण त्यांचा कोणताही मागमूस लागला नाही. १९९४ नंतर राज किरण दिसले नाहीत. पण, २०११ मध्ये ते एका मनोरुग्णालयात असल्याच्या बातम्या समोर आल्या. राज किरण बेपत्ता होऊन ३२ वर्षे झाली आहेत, पण आज त्यांच्या कुटुंबाची काय परिस्थिती आहे? त्यांची पत्नी आणि मुले काय करत आहेत याबद्दल जाणून घेऊया.

राज किरण डिप्रेशनचा सामना करत होते

राज किरण डिप्रेशनमध्ये होते आणि मानसिक आजारानं त्रस्त होते असं म्हटलंं जातं. त्यांच्या मुलीनेही याला दुजोरा दिला आहे. अभिनेत्याच्या मुलीनं मिड डेला सांगितलं की, तिचे वडील राज किरण, काही प्रमाणात मानसिक आजाराने ग्रस्त होते आणि कुटुंब त्यांच्यावर उपचार करत होते. आई आणि काकांनी त्यांना शोधण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण त्यातून काहीही निष्पन्न झालं नाही. त्यांना शोधण्यासाठी खाजगी गुप्तहेरांनाही नियुक्त करण्यात आलं होतं. राज किरण यांच्या मुलीने सांगितलं की, अभिनेता न्यूयॉर्कमधून अचानक गायब झाला होता. ते कुठे जात आहेत किंवा कुठे आहेत, हे त्यांनी घरातील कोणालाही सांगितलं नव्हतं. त्यानंतर कुटुंबानं न्यूयॉर्क पोलिसांची मदत घेतली.
Maharashtra TimesIsha Keskar : ‘आजूबाजूला घटस्फोट, पालक दुखावतात, मला ते करायचं नाही’, ईशा केसकरनं सांगितलं लिव्ह-इनमध्ये राहण्याचं कारण
राज किरण यांना ऋषिका महतानी आणि मन्नत महतानी या दोन मुली आहेत. दोघीही आपापल्या आयुष्यात आणि करिअरमध्ये यशस्वी आहेत. ऋषिका एक ज्वेलरी डिझायनर आणि ब्लॉगर आहे. ती इन्स्टाग्रामवर सक्रिय आहे आणि उत्तम दर्जाचे दागिने तयार करते. ऋषिकाचं लग्न रवी शाह नावाच्या ज्वेलरी डिझायनरशी झालं आहे.

Raj Kiran

दुसऱ्या मुलीचं लग्न, पत्नीचाही पुनर्विवाह

राज किरण यांची दुसरी मुलगी, मन्नतचं २०२० मध्ये लग्न झालं आणि ती आनंदी जीवन जगत आहे. त्यांची पत्नी, रूपा महतानीनंही अभिनेत्याची काही वर्षे वाट पाहिल्यानंतर पुनर्विवाह केला. आता तिचं नाव रूपा मसरुवाला आहे.

राज किरण यांचं करिअर

राज किरण यांच्या करिअरबद्दल बोलायचं झाल्यास, त्यांनी १९७५ मध्ये ‘कागझ की नाव’ या चित्रपटातून अभिनयात पदार्पण केलं. पण, ‘कर्ज’ या चित्रपटात ऋषी कपूर यांच्यासोबत काम केल्यानंतर त्यांना लोकप्रियता मिळाली. याच चित्रपटावर काम करत असताना ऋषी कपूर आणि राज किरण यांची मैत्री झाली. राज किरण यांनी दोन दशके अनेक चित्रपटांमध्ये काम केले आणि प्रसिद्धी मिळवली. १९९० च्या दशकात राज किरण यांना चित्रपटांच्या कमी ऑफर्स येऊ लागल्या.

Girish Pardeshi | गिरीश परदेशी दहा वर्ष कुठे गायब होता? ‘या सुखांनो या’च्या हिरोशी गप्पा

चित्रपट दिग्दर्शक महेश भट्ट यांनी २०११ मधील एका मुलाखतीत दावा केला होता की, त्यांनी राज किरण यांना मुंबईतील मसिना रुग्णालयात पाहिलं होतं. राज किरण आणि महेश भट्ट यांनी ‘अर्थ’ चित्रपटात एकत्र काम केलं होतं आणि ते चांगले मित्र होते. रेडिफला दिलेल्या एका मुलाखतीत महेश भट्ट यांनी दावा केला की, अनेक वर्षांनंतर त्यांची राज किरण यांच्याशी मुंबईतील मसिना रुग्णालयात भेट झाली, तिथं राज किरण मानसिक आजारावर उपचार घेत होते. महेश भट्ट म्हणाले की, ‘अनेक वर्षांपूर्वी, राज मसिना रुग्णालयाच्या मानसोपचार विभागात होता, तेव्हा तो मला माहीत असलेला राज किरण नव्हता. तो डिप्रेशनमध्ये होता. त्याला बोलायला खूप त्रास व्हायचा.’
Maharashtra TimesUjjwal Nikam : ‘अलका याग्निक आणि अनुराधा पौडवाल यांच्यातील वादसुद्धा त्यांच्या मृत्यूचं कारण’, गुलशन कुमार मृत्यूप्रकरणी काय म्हणाले उज्ज्वल निकम?
महेश भट्ट यांनी पुढे सांगितलं की, ‘त्यानंतर, जेव्हा राज किरण रुग्णालयातून परत आला, तेव्हा त्यानं माझ्याशी संपर्क साधला. आम्ही त्याला काही काम आणि वेगवेगळ्या भूमिका देण्याचा प्रयत्न केला, पण एकदा का कोणी मानसिक आजारी असल्याची बातमी पसरली की, कोणालाही त्यांच्या आसपास राहायला आवडत नाही. त्यानंतर, तो त्याच्या भावाला भेटायला अमेरिकेला गेला, तिथं त्याच्या भावानं त्याला व्यवसाय सुरू करण्यास मदत केली. मला वाटतं की, तिथे त्याची प्रगती चांगली होत होती.’
Maharashtra TimesMaharashtrachi Hasyajatra : लॉर्ड शार्दुल ठाकूरला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ची भुरळ, क्रिकेटरनं केलं समीर चौघुलेंचं कौतुक
जेव्हा महेश भट्ट यांना विचारण्यात आलं की, त्यांनी राज किरणशी पुन्हा संपर्क साधण्याचा प्रयत्न का केला नाही, तेव्हा ते म्हणाले, ‘तुम्ही मानसिक आजाराने ग्रस्त असलेल्या लोकांना परत आणू शकत नाही, कारण ते अनेकदा तुमच्या मैत्रीला गैरवर्तन किंवा छळ समजतात. मी परवीन बाबीच्या बाबतीत सगळं अनुभवलं आहे. म्हणूनच मी इतक्या वर्षांत राजशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला नाही.’

तेजश्री कुलये

लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.

तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.

तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.

पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.आणखी वाचा