Headlines

Aamir Khan : ‘सत्तेसमोर ताठ मानेनं उभं राहणं सोपं नाही!’, RJD चा खासदार वांगचुक यांच्या पाठिशी; आमिर खानवर बरसले


Manoj Jha On Aamir Khan : आमिर खाननं सोनम वांगचुक यांच्याबद्दल भाष्य केलं, तसेच त्याच्या ‘३ इंडियट्स’ या सिनेमातील भूमिकेबद्दलही सांगितलं. आता अभिनेत्यावर खासदार मनोज झा यांनी टीका केली आहे.

Manoj Kumar Jha On Aamir Khan
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – ‘3 इडियट्स’ चित्रपटातील ‘फुंगसुक वांगडू’ या भूमिकेबद्दल आमिर खाननं दिलेल्या स्पष्टीकरणामुळे एक नवीन राजकीय चर्चा सुरू झाली आहे. विरोधी पक्षनेते, कार्यकर्ते आणि सोशल मीडिया युजर्सनी आमिर खानच्या प्रतिक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. सोनम वांगचुक यांच्यावरील आमिर खानच्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण तापलं आहे.

मनोज झा यांची प्रतिक्रिया

राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) चे खासदार मनोज झा आमिर खानच्या प्रतिक्रियेवर म्हणाले की, ‘आमिर खानला हे सांगण्यासाठी किती वर्षे लागली. मला नाही आठवत किती वर्षांपूर्वी हा सिनेमा आला होता. पण, आजवर तर असंच सांगितलं जात होतं, पोराबाळांना देखील हेच माहिती होतं आणि आज तुम्हाला लक्षात आलं की, हे बोलायला हवं? यातून एक लक्षात येतं की, सत्तेसमोर ताठ मानेनं उभं राहणं सोपं काम नाही.’
Maharashtra TimesMaharashtrachi Hasyajatra : लॉर्ड शार्दुल ठाकूरला ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ची भुरळ, क्रिकेटरनं केलं समीर चौघुलेंचं कौतुक
‘ज्या सरकारमधील संवेदना कमी झाली असेल, त्यांच्यापुढे उपोषणाचा पर्याय काम करत नाही’ असंही मनोज झा पीटीआयसोबत बोलताना म्हणाले.
Maharashtra TimesRaj Kiran : 32 वर्षांपासून गायब आहे बॉलिवूडचा सुप्रसिद्ध अभिनेता, पत्नीनंही केलं दुसरं लग्न, महेश भट्ट म्हणालेले, ‘तो मनोरुग्ण होता’

मनोज झा यांची सरकारवर टीका

पुढे, ‘आमरण उपोषण, उपोषण यासारखी आंदोलनं ज्या सरकारमध्ये संवेदना आहे त्यांच्यावर फरक पाडते. ज्या सरकारमधील संवेदना संपली असेल किंवा मेली असेल तिथं लोकशाहीचं हत्यारं काम करत नाहीत. लढाई मोठी आहे, प्रवास लांबचा आहे, त्यामुळे सध्या सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडावं.’ असं मनोज झा म्हणाले.
Maharashtra TimesUjjwal Nikam : ‘अलका याग्निक आणि अनुराधा पौडवाल यांच्यातील वादसुद्धा त्यांच्या मृत्यूचं कारण’, गुलशन कुमार मृत्यूप्रकरणी काय म्हणाले उज्ज्वल निकम?
आमिर खान म्हणाला की, ‘सिनेमा करत असताना सोनम वांगचुक यांच्याबद्दल माहिती नव्हतं. ओमीचा व्हिडिओ पाहिला पण त्यात तो चुकलाय, त्याला कदाचित वाटलं असेल पण, मला राजकुमार हिरानी किंवा लेखक अभिजीतला याबाबत माहिती नव्हतं. मला वाटतं की आम्हा सर्वांना त्यांच्या आरोग्याची खूप काळजी आहे. मी आशा करतो की, सर्व काही ठीक होईल. मला आशा आहे की ते त्यांचं उपोषण लवकर संपवतील आणि त्यांच्या आरोग्याची काळजी घेतील.’

Phulwa Khamkar : अनिल बर्वेंची लेक झाली खामकर मसालेवाल्यांची सून, मराठीसह ‘फुलवा’ बॉलिवूडमध्ये गाजली

दरम्यान, ‘३ इडियट्स’ हा सिनेमा २००९ मध्ये प्रदर्शित झालेला आणि आजही हा सिनेमा आवर्जून पाहिला जातो.