Headlines

Raigad Mumbai Rain Red Alert IMD Warning Raigad Next Three Hours Heavy Rrainfall; अंबा नदीने धारण केलं रौद्ररुप! रायगडमध्ये पावसाचा कहर, नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा; हवामान खात्याकडून पावसाचा रेड अलर्ट


Raigad Rain Update News Red Alert : या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी संबंधित ठिकाणी तातडीने पूल उभारण्यात यावा तसेच रस्त्याच्या दुतर्फा मजबूत गटारे बांधून पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा करण्यात यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी शासनाकडे केली आहे. प्रशासनाने घटनास्थळी पाहणी करून त्वरित उपाययोजना कराव्यात, अन्यथा भविष्यात रस्ता पूर्णपणे खचण्याची आणि शेतीचे आणखी मोठे नुकसान होण्याची भीती स्थानिकांनी व्यक्त केली आहे. ग्रामस्थांनी लोकप्रतिनिधी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने कार्यवाही करावी, अशी जोरदार मागणी केली आहे.

Raigad Rain Update News Red Alert
रायगड पाऊस अपडेट्स रेड अलर्ट(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अमुलकुमार जैन, रायगड : रायगड जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत केलं आहे. आज रविवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत झालेल्या पावसात जिल्ह्याची सरासरी २१५.४५ मिमी, तर एकूण ३४४७.२० मिमी पर्जन्यवृष्टी नोंदविण्यात आली. माथेरानमध्ये तब्बल ४०८ मिमी पाऊस पडल्याने ते जिल्ह्यात सर्वाधिक पावसाचे केंद्र ठरले. त्यापाठोपाठ कर्जतमध्ये २९१ मिमी, पनवेलमध्ये २८२.२ मिमी, खालापूरमध्ये २७४ मिमी, पेणमध्ये २६५ मिमी आणि मुरूडमध्ये २५८ मिमी पावसाची नोंद झाली. सुधागडमध्ये २२२ मिमी, म्हसळा २१८ मिमी, अलिबाग १९६ मिमी, तळा १९२ मिमी, माणगाव १८८ मिमी, रोहा १७१ मिमी, उरण १४८ मिमी, महाड १२१ मिमी, पोलादपूर १११ मिमी आणि श्रीवर्धन १०२ मिमी पाऊस झाला.

नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा

सततच्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील प्रमुख नद्यांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. ठाणे पाटबंधारे मंडळाच्या आज रविवारी सकाळी ८ वाजताच्या अहवालानुसार नागोठणे येथील अंबा नदी आणि कोलाड परिसरातील कुंडलिका नदीने धोका पातळी ओलांडली, तर लोहप येथील पाताळगंगा नदी इशारा पातळीच्या पुढे गेली आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तर हवामान खात्याकडून रेड अलर्ट देण्यात आला असून पुढील तीन तास अतिमुसळधार पाऊस होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.
Maharashtra TimesPune Rain News : राज्यात पावसाचं थैमान! पुणेकरांनो घराबाहेर निघताना जपून, शहरात पावसाची जोरदार हजेरी; हवामान विभागाचं इशाऱ्यासह मोठं आवाहन
नागोठणे येथील अंबा नदीची पाणीपातळी ९.३० मीटर इतकी नोंदविण्यात आली असून ती ९.०० मीटरच्या धोका पातळीपेक्षा अधिक आहे. या परिसरात १५२ मिमी पावसाची नोंद झाली असून एकूण पर्जन्यमान ५७० मिमीवर पोहोचले आहे. तर कोलाडजवळील डोलवहाल येथील कुंडलिका नदीची पाणीपातळी २४.०० मीटर झाली असून तिने २३.९५ मीटरची धोका पातळी ओलांडली आहे. येथे १३० मिमी पाऊस पडला असून एकूण पर्जन्यमान ७०८ मिमी इतके नोंदविण्यात आले आहे.

पाणीपातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता

लोहप येथील पाताळगंगा नदीची पाणीपातळी २१.४० मीटर इतकी असून ती २०.५० मीटरच्या इशारा पातळीपेक्षा वर आहे. या परिसरात २५० मिमी पाऊस पडल्याने प्रशासनाने विशेष लक्ष ठेवले आहे. महाड येथील सावित्री नदीची पाणीपातळी सध्या ४.६० मीटर असून ती इशारा पातळीच्या खाली असली, तरी वरच्या भागातील मुसळधार पावसामुळे तिच्या पाणीपातळीत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
Maharashtra TimesPune Police Raid: पुणे पोलीस आणि FDA कडून भेसळखोरांचं मोठं रॅकेट उघड, १३ जणांना बेड्या; १ हजार लिटर दुधात ५०० लिटर शाम्पू-केमिकलचे दूध!
दरम्यान, अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचणे, ओढे-नाले दुथडी भरून वाहणे आणि काही रस्त्यांवर पाणी आल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. जिल्हा प्रशासन, महसूल विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा पूर्णपणे सतर्क असून नदीकाठच्या नागरिकांनी नदीपात्रात जाणे टाळावे, अफवांवर विश्वास ठेवू नये आणि प्रशासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच एखादी नदी इशारा किंवा धोका पातळी ओलांडल्यानंतर तिच्या पाणीपातळीचा अहवाल प्रत्येक तासाला प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती ठाणे पाटबंधारे मंडळाने दिली आहे.

सहानगोठीतील रस्ता पुन्हा धोक्यात

अलिबाग तालुक्यातील सहानगोठी येथे झालेल्या मुसळधार पावसामुळे रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहून गेल्याने रस्त्याच्या कडेला असलेली साईडपट्टी खचली आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून वाहतुकीसह शेतीच्या कामांनाही अडथळा निर्माण झाला आहे. पावसाळ्यात ही समस्या वारंवार उद्भवत असल्याने ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
Maharashtra TimesRaj Thackeray: तुम्ही काहीच बोलत नाही, तुमच्या मौनामुळे ते अधिकच बेफाम होतायत; राज ठाकरे मुख्यमंत्र्यांवर बरसले!
स्थानिक शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, डोंगरावरील माती, दगड आणि झाडाझुडपांचा कचरा पावसाच्या पाण्यासोबत खाली येऊन रस्त्यावर साचतो. त्यामुळे पाण्याचा नैसर्गिक प्रवाह अडतो आणि संपूर्ण पाणी रस्त्यावरून वाहू लागते. यामुळे रस्त्याची साईडपट्टी खचून रस्ता धोकादायक बनला आहे. या परिस्थितीचा फटका शेतीला बसत असून अनेक शेतांमध्ये गाळ आणि माती साचल्याने पिकांचे नुकसान होत आहे. विशेष म्हणजे, या रस्त्याचे काम नुकतेच पूर्ण करण्यात आले असतानाही पाण्याचा योग्य निचरा होईल, अशी कोणतीही कायमस्वरूपी व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे प्रत्येक पावसाळ्यात हीच समस्या निर्माण होत असून शेतकऱ्यांना आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा