Headlines

Radhika Deshpande : ‘करकचून बांधलेली कंचुकी घातलीस, समोर बसलेल्या बॉयफ्रेंडचं नशीब उजळलं, जाहिरातीत त्याला भाऊ म्हटलं नाहीस’, क्रितीवर संतापली मराठी अभिनेत्री


Radhika Deshpande Post : मराठी अभिनेत्री राधिका देशपांडेनं क्रिती सेननच्या जाहिरातीवर संताप व्यक्त केला असून चांगलेच खडे बोल सुनावले आहेत.

Radhika Deshpande Post
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – ज्वेलरी ब्रँड ‘जिवा’नं बुधवारी अभिनेत्री क्रिती सेननची वादग्रस्त रक्षाबंधन जाहिरात हटवली. या जाहिरातीत अभिनेत्रीनं ब्रालेट-स्टाईल ब्लाउज, केप आणि ड्रेप्ड स्कर्ट परिधान केला होता. ती एका कुत्र्याला राखी बांधतानाही दिसली होती. अनेक लोकांनी या पोशाखावर आक्षेप घेतला होता. अभिनेत्री-खासदार कंगना रणौतनेही क्रितीच्या पोशाखावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. यावर क्रिती सेनननंही प्रतिक्रिया दिलेली. ‘स्त्रियांनी कसे कपडे परिधान करावेत हे सांगणं आपण कधी थांबवणार?’ असा प्रश्न क्रितीनं उपस्थित केलेला. अशातच आता मराठी अभिनेत्रीनं यावर प्रतिक्रिया दिली असून क्रिती सेननला चांगलंच सुनावलं आहे.

राधिका देशपांडेची पोस्ट

मराठी अभिनेत्री राधिका देशपांडेनं सोशल मीडियावर पोस्ट करत लिहिलं की, ‘डियर क्रीपी, येत्या २८ तारखेला ‘रक्षा बंधन’ आहे, ह्याची तू अनेकांना आठवण करून दिलीस, त्याबद्दल धन्यवाद. मात्र, हा दिवस तुला बरीच वर्षे लक्षात राहणार ह्याची सोय करून ठेवलीस, अभिनंदन. तुझी इन्स्टा स्टोरी वाचली म्हणून रक्षा बंधन हा सण का साजरा केला जातो, ह्याची आख्यायिका अनेकांनी वाचली, त्याबद्दल ही तुझे धन्यवाद. बरंच झालं. आतापर्यंत राहुल ‘भाऊ’मुळे अनेक लोक विषयाच्या खोलात शिरत होते. आता त्यांच्या ‘बहिणी’ही ते करण्याची संधी देत आहेत, हे चांगलंच आहे. म्हणजे भावा-बहिणींनी मिळून कितीही मंदिरं पाडली, तरी सनातन संस्कृती काय मरत नाही, हे परत सिद्ध होणार. कारण, राखी पौर्णिमेचा दिवस तुझ्यासारखा साजरा कोणी करत नाही गं…(अपवाद वगळता).’

Ayush Bhide Interview : कानफटात मारावीशी वाटते, आयुष भिडेला निगेटिव्ह रोलमुळे भन्नाट कमेंट्स

‘आता थोडं तुझ्या कृतीबद्दल बोलूया हं…तर तुझ्या इन्स्टा स्टोरी प्रमाणे

१. सणाचं महत्त्व त्या दिवशी घातलेल्या कपड्यांवरून नाही, तर हृदयात असलेल्या भावना आणि परंपरेवर आधारित असतं. अगदी बरोबर! म्हणूनच तर करकचून बांधलेली कंचुकी तू घातलीस. समोर बसलेल्या बॉयफ्रेंडचं नशीब उजळलं. इथे मी भाऊ म्हणणार नाही, कारण जाहिरातीत तू त्याला कुठेही भैय्या किंवा ब्रो म्हटलं नाहीस.

२. तू तुझ्या बहिणीला राखी बांधतेस, कुत्र्याला आधी बांधतेस. त्यामुळे २.० मध्ये आई-वडिलांना आणि नवऱ्यालाही बांधताना आम्हाला दिसलीस, तर आम्ही तुला समजून घेऊ. तसंच, गेली शंभर वर्षं भावाला राखी बांधायची, निर्जीव वस्तूंना, जसं की सायकल, कार, ह्यांना राखी बांधत आलो आहोतच. पण जे चाललं आहे ते चालू द्यायचं तर ते नाही, आता ते बोर झालं. काहीतरी करून भेसळ करायलाच हवी. विकृती आणून new normal करायलाच हवं. हो की नाही?’

Maharashtra TimesChinmayee Sumeet : ‘मराठी डाऊनमार्केट भाषा, असं जिममध्ये सांगितलेलं’, चिन्मयी सुमीत यांनी सांगितला अनुभव, मराठी भाषा सक्तीवर काय म्हणाल्या?
‘३. आणि कपड्यांबद्दल म्हणशील, तर पुरुष मंडळींचं ऐकायचं नसतं. त्यांची सांगण्याची पद्धत चुकते बहुतांश वेळा आणि तीच महत्त्वाची. त्यांच्या भावना थोडीच महत्त्वाच्या असतात! तो अधिकार आपण सर्वांनीच गमावला. आधुनिक आणि प्रगतिशील होण्याच्या ओघात भारतीयांनी चांगलं ते स्वीकारता स्वीकारता वाईटही आत्मसात केलं आणि तुमच्यासारखे गुळगुळीत आणि मुळमुळीत ‘भाऊ-बहिण’ इतरांच्या मेंदूचा सर्गोटा करण्याच्या मागे आहेतच, अजेंड्यामार्फत.

४. स्वास्थ्य, सुख आणि आयुष्यासाठी आपण प्रार्थना करतोच. मग ‘मेरा गिफ्ट?’ कशाला ते? हा.. जाहिरातीत मागावं लागणार. नाहीतर GIVAचा संस्कृती आणि परंपरा जपत खप कसा वाढेल, नाही का? आणि हा कुठला जीवा? ‘होता जिवा म्हणून वाचला शिवा’ एवढंच मला माहिती आहे. उद्या म्हणाल, हाच तो जिवा. उद्या तुम्ही काहीही म्हणाल, म्हणून आम्ही एक वेळ ऐकून घेऊ, पण काहीही कराल, म्हणून खपवून घेणार नाही. “No Bindi No Business.” Please maintain the protocol. आणि हो, क्षमा कर क्रीती, तुला मी सुरुवातीला क्रीपी म्हणून संबोधलं. पण मला खात्री आहे, तू समजून घेशील, कारण शेवटी भावना महत्त्वाच्या. संस्कृती, परंपरा हे निव्वळ पाळीव शब्द. सणासुदीला भुंकणारे.’ असं राधिकानं शेवटी म्हटलं आहे.

तेजश्री कुलये

लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.

तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.

तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.

पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.आणखी वाचा