Pune Women Serious Allegations Against Baramati Zilla Parishad Member; लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक, महिलेचा सभेत स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न, जि.प. सदस्यावर गंभीर आरोप; पुण्यात काय घडलं?
Pune Women Serious Allegations Against Baramati Zilla Parishad Member; लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक, महिलेचा सभेत स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न, जि.प. सदस्यावर गंभीर आरोप; पुण्यात काय घडलं?
Pune Women Allegations Against Mangesh Jagtap : राष्ट्रवादी काँग्रेसचे बारामतीचे जिल्हा परिषद सदस्य मंगेश जगताप यांच्यावर लग्नाचं आमिष दाखवून फसवणूक केल्याचा आरोप आहे.
मंगेश जगताप यांच्यावर महिलेचा गंभीर आरोप(फोटो– महाराष्ट्र टाइम्स)
म. टा. प्रतिनिधी, पुणे : पुणे जिल्हा परिषदेच्या सभागृहात सर्वसाधारण सभा सुरू असताना एका महिलेने चक्क पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याचा प्रकार २७ जुलै रोजी सोमवारी दुपारी घडला. यामुळे सभागृहातील सदस्यांसह पदाधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली.
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभा दोन ते तीन महिन्यानंतर असतात. जिल्हा परिषदेच्या २०२६-२७ पुरवणी मागण्यांबाबत चर्चा करण्यासाठी सभा बोलविण्यात आली होती. ‘नीट’ परीक्षेत देशात पहिली आलेली दौंड तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थिनी श्रावणी कुदळे हिचा सत्कार करण्यात आला. सर्वसाधारण सभा सुरू असताना अचानकपणे एक महिला सभागृहात आली. तिने आरडाओरडा करण्यास सुरूवात केली. अचानकपणे झालेल्या या प्रकारामुळे सर्व जण अवाक झाले. तातडीने या महिलेस ताब्यात घेऊन तिची रवानगी हिरकणी कक्षात करण्यात आली.
‘जिल्हा परिषदेतील बैठकीदरम्यान एका महिलेने स्वतःसोबत आणलेले पेट्रोल अंगावर ओतून घेतल्याची घटना घडली. मात्र, तेथे उपस्थित सुरक्षारक्षक आणि पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून तिला ताब्यात घेतले. महिलेची प्रकृती बिघडल्याने तिला प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. आवश्यक ती कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे’, असं बंडगार्डन पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक संतोष पांढरे यांनी म्हटलं आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा