Headlines

Pune Water Cut: पुणेकरांनो, पाणी जपून वापरा! गुरुवारी शहरात पाणीपुरवठा राहणार बंद; कोणत्या भागांत फटका? पाहा लिस्ट – pune water supply will be suspended in some areas on thursday 30 july 2026


म.टा.प्रतिनिधी, पुणे: महापालिकेच्या लष्कर जलशुद्धीकरण केंद्र व पंपिंग स्टेशन येथे विद्युत आणि यांत्रिकी विभागाकडून तातडीची देखभाल-दुरुस्तीची कामे केली जाणार आहेत. त्यामुळे येत्या गुरुवारी, ३० जुलै रोजी या केंद्राच्या अखत्यारीतील परिसरांचा पाणीपुरवठा दिवसभर बंद राहणार आहे.

शुक्रवारी, ३१ जुलै रोजी सकाळी उशिरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे, अशी माहिती पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप यांनी दिली.
Maharashtra TimesPune Accident : भरधाव कंटेनरची दुचाकीला धडक, भीषण अपघातात माय-लेकाचा जागीच करुण अंत
येथे पाणी बंद
रामटेकडी टाकी परिसर :
काळेपडळ, गाडीतळ, गोंधळेनगर, सातववाडी, हडपसर गावठाण अंशतः, महंमदवाडी गावठाण, वाडकर मळा, कृष्णानगर, राजीव गांधीनगर, रामटेकडी एसआरपीएफ, वैदूवाडी, भीमनगर, ससाणेनगर, मुंढवा, मगरपट्टा सिटी, केशवनगर, हांडेवाडी रोड आदी.

वानवडी व बकरी हिल टाकी परिसर : वानवडी गावठाण, कोंढवा गावठाण, शिवनेरीनगर, मिठानगर, कौसरबाग, साळुंखे विहार, एनआयबीएम रोड, उंड्री रोड, आझादनगर, केदारीनगर, शिंदे छत्री परिसर, संविधान चौक ते गंगा सॅटेलाइट चौक आदी.

हाय सर्व्हिस, सेंट्रल कॅम्प व रेसकोर्स टाकी परिसर : बी. टी. कवडे रोड, घोरपडी अंशतः, भारत फोर्ज परिसर, सेंट पॅट्रिक टाउन, संपूर्ण पुणे कँटोन्मेंट, कॅम्प परिसर, कमांड हॉस्पिटल, ईस्ट स्ट्रीट, पासपोर्ट कार्यालय परिसर, कोरेगाव पार्क ब्रिज आदी.
Maharashtra TimesYugendra Pawar: दादांच्या अपघाताचा रिपोर्ट नाही, मालकावर कारवाई नाही, आमचा संयम संपतोय; युगेंद्र पवार संतापले!
ठाकरसी टाकी परिसर
: येरवडा गावठाण, इराणी मार्केट, गुंजन, साळवे भाजी मार्केट, गवळीवाडा, जिजामातानगर, मदर तेरेसानगर, कल्याणीनगर, संगमवाडी, शास्त्रीनगर आणि नगर रस्ता परिसर.

लष्कर ते खराडी पंपिंग क्लोजर परिसर : खराडी गावठाण, ईऑन आयटी पार्क परिसर, चौधरी वस्ती, सातव वस्ती, चंदननगर, सुनीतानगर, सोमनाथनगर, गणेशनगर, आनंद पार्क, महावीरनगर आणि मुन्नुरवार सोसायटी.

‘खडकवासला’त ९० टक्के पाणी
खडकवासला साखळी प्रकल्पातील चारही धरणांत पावसाचे प्रमाण कमी असले, तरी पाऊस मात्र कायम आहे. प्रकल्पातील धरणे ही ९० टक्के भरली असून, धरणांत गेल्या वर्षीपेक्षा थोडासा जास्त पाणीसाठा जमा झाला आहे. सद्यस्थिती धरणात २६.२६ अब्ज घनफूट (टीएमसी) इतका पाणीसाठा जमा झाला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास एक दोन दिवसांत प्रकल्प १०० टक्के भरण्याची शक्यता आहे. खडकवासला धरणाच्या क्षेत्रात आतापर्यंत ५६१ मिलिमीटर, पानशेतमध्ये १५८३ मिमी, वरसगावमध्ये १५०७ मिमी इतका पाऊस झाला आहे. टेमघरमध्ये सर्वाधिक २१५९ मिमी इतका पाऊस झाला आहे.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत