Pune Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. त्यातच पुण्यात तर गुन्हेगारीने चरणसीमा गाठलीय. आई-वडिलांनी संतापात आपल्याच पोटच्या मुलाची निर्घृण हत्या केली आहे.
वारजे माळवाडी मटणामुळे मुलाची हत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अभिजित दराडे, पुणे : पुण्यातील वारजे-माळवाडी भागात नात्याला काळीमा फासणारी तथा एक सुन्न करणारी घटना समोर आली आहे. श्रावण महिन्यात दारूच्या नशेत मांसाहाराचा हट्ट धरणाऱ्या पोटच्याच मुलाला बापानेच बेदम मारहाण करून ठार केलं. हत्येनंतर आई-वडिलांनी या गुन्ह्यावर पांघरूण घालण्याचा प्रयत्न केला खरा, पण शवविच्छेदन अहवालानं संपूर्ण कट उघडकीस आणला.
नेमकं काय घडलं?
वारजे-माळवाडी येथील रामनगर भागात राहणारा 30 वर्षीय महेश भागवत गायकवाड प्रचंड दारूच्या आहारी गेला होता. कामाधंद्याशिवाय दिवस काढणाऱ्या महेशला व्यसनामुळेच 10 वर्षांपूर्वी पत्नीही सोडून गेली होती. 24 ऑगस्टच्या रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास तो नेहमीप्रमाणे दारू पिऊन घरी परतला. सध्या श्रावण महिना सुरू असताना त्याने घरात जेवणात मटण खाण्याचा हट्ट धरला. यावरून घरात आई-वडील आणि त्याच्यात मोठा वाद झाला. वादाचं रूपांतर हाणामारीत झालं आणि रागाच्या भरात 64 वर्षीय वडील भागवत गायकवाड यांनी महेशला मारहाण केली. डोक्यावर, नाकावर आणि तोंडावर वर्मी घाव बसल्यानं महेश जागेवरच कोसळला आणि त्याचा श्वास थांबला.
महेशचा जागीच मृत्यू झाल्याचं समजल्यानंतरही आई पार्वती गायकवाड (वय 60) आणि वडिलांनी पोलिसांना किंवा शेजाऱ्यांना कोणतीही माहिती दिली नाही. अनेक तास मृतदेह घरातच तसाच ठेवला. पहाटे साडेचारच्या सुमारास आईने आपला मोठा मुलगा गणेश याला उठवून, ‘महेश काहीच बोलत नाहीये, त्याचं अंग थंड पडलंय, बघ जरा काय झालंय,’ असा कांगावा केला.
मात्र, गणेशने भावाच्या चेहऱ्यावर आणि डोक्यावर ताज्या जखमांच्या खुणा पाहिल्या. संशय बळावल्यानं नातेवाइकांच्या मदतीने तत्काळ पोलिसांना बोलावण्यात आलं. ससून रुग्णालयातील शवविच्छेदन अहवालात महेशचा मृत्यू नैसर्गिक नसून डोक्यातील गंभीर दुखापती आणि गुदमरल्यामुळे झाल्याचं निष्पन्न झालं. पोलिसांनी आई-वडिलांची पोलिसी खाक्या दाखवत कसून चौकशी केली असता, त्यांनी मुलाचा जीव घेतल्याची आणि पुरावा लपवल्याची कबुली दिली. वारजे-माळवाडी पोलिसांनी भागवत गायकवाड आणि पार्वती गायकवाड या दोघांनाही अटक केली असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश दंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील कारवाई सुरू आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा