Headlines

Pune Sadashiv Peth High Speed Police Van Damaged Seven Vehicles Video Viral; रक्षकच जेव्हा भक्षक बनतात! पोलीस व्हॅन दामटवली, सदाशिव पेठेत एकामागून एक 7 वाहनांना धडक; पुण्याच्या मध्यवस्तीत थरार


Pune Sadashiv Peth Police Van Accident CCTV Video : अपघातात अनेक कार आणि दुचाकींचं मोठं नुकसान झालंय. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा गंभीर दुखापत झाली नाही. अपघाताचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट असून पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.

Pune Sadashiv Peth Police Van Accident CCTV Video
सदाशिव पेठ पोलीस व्हॅन वाहनांना धडक व्हिडिओ(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे : विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्याच्या मध्यभागात, विशेषतः नेहमीच माणसांच्या आणि वाहनांच्या गर्दीने गजबजलेल्या सदाशिव पेठेत एक अत्यंत धक्कादायक आणि अंगावर काटा आणणारी घटना घडली आहे. कायदा आणि सुव्यवस्थेचं रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या पोलिसांच्याच एका भरधाव व्हॅननं रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या गाड्यांना अक्षरशः उडवून दिलं आहे. या भीषण अपघातात एकामागून एक तब्बल सात वाहनांना या व्हॅननं जोरदार धडक दिली. या संपूर्ण थराराचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलं असून, समाजमाध्यमांवर हा व्हिडीओ वाऱ्यासारखा पसरत आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, नेहमीप्रमाणे सदाशिव पेठ परिसरात नागरिकांची मोठी वर्दळ होती. त्याचवेळी तेथून जाणाऱ्या एका पोलीस व्हॅनवरील चालकाचे गाडीवरील नियंत्रण अचानक सुटले. गाडीचा वेग इतका प्रचंड होता की, रस्त्याच्या कडेला अतिशय शिस्तीत पार्क केलेल्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांना या व्हॅनने जोरदार धडक दिली. दोन-चार नव्हे तर तब्बल सात गाड्यांचे या अपघातात मोठं नुकसान झालं आहे. गाड्या एकमेकांवर आदळल्याचा भयंकर मोठा आवाज ऐकून परिसरातील व्यावसायिक, पादचारी आणि स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी तत्काळ रस्त्याकडे धाव घेतली.

Maharashtra TimesPune Crime : आधी ‘सोडियम नायट्रेट’ मागवलं, नंतर ऑनलाईन माहिती घेतली, पिल्लाई कुटुंबाने स्वत:ची अखेर केली, घरात चिठ्ठी सापडली

गाड्यांचं मोठं आर्थिक नुकसान

या घटनेतील सर्वात मोठी दिलासादायक बाब म्हणजे, एवढा भीषण अपघात होऊनही सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही. गाड्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं असलं तरी, त्या वाहनांवर किंवा आजूबाजूला कोणीही नागरिक उभा नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला. कोणालाही गंभीर दुखापत न झाल्यानं सर्वांनीच सुटकेचा निश्वास सोडला. व्हिडीओमध्ये पोलीस व्हॅन अतिशय वेगाने येऊन वाहनांना धडकत असल्याचं स्पष्टपणे दिसत आहे. मात्र, ही दुर्घटना नेमकी घडली कशी? हा प्रश्न सध्या सर्वांनाच पडला आहे. पोलीस व्हॅनचे अचानक ब्रेक फेल झाले होते, की चालकाच्या हलगर्जीपणामुळे हा अपघात झाला? याचे ठोस उत्तर अद्याप मिळू शकलेलं नाही.
Maharashtra TimesPune News : अंत्यसंस्कारावेळीच ग्रामस्थांची धावाधाव, बॉडी खाली ठेवत सगळेच पळाले; पुण्यातील आंबेगावमध्ये असं काय घडलं?

रक्षकच जेव्हा भक्षक बनतात, तेव्हा…

विशेष म्हणजे, प्रत्यक्ष घटना दोन दिवसांपूर्वी घडली होती. मात्र त्याचा सीसीटीव्ही व्हिडीओ आता समोर आल्यानंतर या प्रकरणाला वाचा फुटली आहे. या गंभीर प्रकरणात खुद्द पोलिसांचीच गाडी सामील असल्यानं, पोलीस प्रशासनाकडून यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यास टाळाटाळ केली जात असल्याची जोरदार चर्चा सध्या पुणेकरांमध्ये रंगली आहे. रक्षकच जेव्हा भक्षक बनतात, तेव्हा दाद कुणाकडे मागायची? असा संतप्त सवाल आता नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.

प्रशांत पाटील

लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.

प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.

‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.आणखी वाचा