Pune Railway News : पुणे -नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प रद्द करण्यासाठी रविवारी पुणे नाशिक महामार्गावर मोर्चा काढण्यात आला. नाशिक जिल्ह्यात सिन्नरमध्येही रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले
आंदोलनादरम्यान तांबे यांनी व्यासपीठावरूनच मंत्री गिरीश महाजन यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून काकोडकर समितीला मुदतवाढ न देण्याची; तसेच समितीला जनसुनावणी घेण्यासंदर्भात आदेश देण्याची मागणी केली. त्यावर महाजन यांनी मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले.
चक्काजाम आंदोलन करण्यात आले.
पुणे-नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात आज,रविवारी पुणे-नाशिक महामार्गावरील चाकण (ता. खेड), मंचर (ता. आंबेगाव) आणि आळेफाटा, पिंपळवंडी, नारायणगाव (ता. जुन्नर) येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आले. पुणे-नाशिक रेल्वे जुन्या मार्गानेच नेण्याची एकमुखी मागणी या वेळी करण्यात आली. नाशिक जिल्ह्यात सिन्नरमध्येही रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
आंदोलनकर्त्यांची आग्रही भूमिका
पुणे-नाशिक दरम्यानचा प्रस्तावित रेल्वेमार्ग चाकण, राजगुरूनगर, मंचर, नारायणगाव, आळेफाटा, संगमनेर आणि सिन्नर या पारंपरिक मार्गानेच नेण्यात यावा, अशी आग्रही भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली. या मार्गामुळे उत्तर पुणे जिल्ह्यातील अनेक गावांना, तसेच औद्योगिक पट्ट्याला थेट रेल्वे जोडणी मिळणार असल्याने प्रकल्पात कोणताही बदल करण्याऐवजी तांत्रिक अडचणींवर उपाय शोधण्याची मागणी करण्यात आली.
रास्ता रोको आंदोलन करण्यात आले
चक्काजाम आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर चाकण पोलिसांकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जुन्नरचे आमदार शरद सोनवणे, माजी आमदार अतुल बेनके, विघ्नहर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर आदींच्या नेतृत्वात नारायणगाव येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
Nagpur News:पावसाची उसंत आणि मूर्तिकारांना दिलासा ; गणेश मूर्तिंची काम शेवटच्या टप्प्यात
विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे हा लढा बुलंद
मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर सर्वपक्षीय, सर्वसामाजिक संघटना व रेल्वे कृती समिती, आंबेगाव तालुका यांच्या वतीने चक्काजाम करण्यात आले. आमदार दिलीप वळसे-पाटील, विविध पक्षांचे पदाधिकारी, सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, शेतकरी, व्यापारी, उद्योजक, विद्यार्थ्यांच्या सहभागामुळे हा लढा बुलंद झाला

