Pune Pimpalwandi Village Nine Year Old Minor Girl Assault and Killed Accused Police Custody; पुण्यात नसरापूरची पुनरावृत्ती! 9 वर्षीय मुलीवर अत्याचार, नंतर जीव घेऊन बॉडी फेकली, आमदार शरद सोनवणेंच्या गावातच संतापजनक कृत्य
Pune Pimpalwandi Village Nine Year Old Minor Girl Assault and Killed Accused Police Custody; पुण्यात नसरापूरची पुनरावृत्ती! 9 वर्षीय मुलीवर अत्याचार, नंतर जीव घेऊन बॉडी फेकली, आमदार शरद सोनवणेंच्या गावातच संतापजनक कृत्य
Pune Junnar Crime News : पुणे जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार आणि त्यानंतर हत्या करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे. जुन्नर तालुक्यातील पिंपळवंडी गावात ही धक्कादायक घटना काल मंगळवारी दुपारी साडेतीन ते चार वाजण्याच्या दरम्यान घडली.
पिंपळवंडी अल्पवयीन मुलगी अत्याचार आणि हत्या(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
अभिजीत दराडे, पुणे : पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. पिंपळवंडी गावात एका नऊ वर्षीय बालिकेवर लैंगिक अत्याचार करून तिचा गळा आवळून खून करण्यात आला. या धक्कादायक कृत्यामुळे संपूर्ण परिसरात तीव्र संताप व्यक्त होत असून, पोलिसांनी संशयित आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, काल मंगळवारी दुपारी साडेतीन ते चारच्या सुमारास ही घटना घडली. पीडित मुलगी अचानक बेपत्ता झाल्यानं तिच्या कुटुंबीयांनी शोध सुरू केला आणि पोलिसांत तक्रार दाखल केली. तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, पीडितेच्या घराशेजारी राहणाऱ्या एका तरुणानं ओळखीचा गैरफायदा घेतला. त्यानेबालिकेला सायकलवरून जवळच असलेल्या उसाच्या शेतात नेले. तिथे तिच्यावर अत्याचार करून तिचा गळा दाबून निर्घृणपणे जीव घेतला.
स्थानिक आमदाराचं गाव असलेल्या पिंपळवंडीत ही घटना घडल्यानं सर्वत्र खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच पुणे जिल्ह्याच्या पोलीस अधीक्षकांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन तपासाची सूत्रे हाती घेतली. स्थानिक तपास यंत्रणांच्या मदतीने पोलिसांनी संशयिताला तात्काळ ताब्यात घेतलं आहे. या अमानुष घटनेमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थ व नातेवाईकांनी आरोपीला फाशी देण्याची मागणी केली आहे. तर हे प्रकरण फास्ट ट्रक न्यायालयात चालवून पीडितेला तातडीने न्याय देण्याची मागणी पोलीस प्रशासनाकडे केली आहे. जुन्नरचे आमदार शरद सोनवणेंच्या गावातच ही धक्कादायक घटना घडली असल्याची माहिती समोर आली आहे.
गेटजवळ विवाहितेचा संशयास्पद मृत्यू
कंपनीच्या कामानिमित्त मित्रासोबत वाडीवऱ्हे परिसरात गेलेल्या सिडकोतील ३४ वर्षीय महिलेचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. संबंधित महिला मित्रासोबत एका रिसॉर्टमध्ये जेवण केल्यानंतर बाहेर पडत असताना, तिच्या मित्राचे नियंत्रण सुटल्याने कार प्रवेशद्वाराला धडकली. या अपघातात गंभीर जखमी झाल्याने संबंधित महिलेचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र, हा अपघात आहे, की घातपात याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे.
रुपाली नीलेश पाटील (वय ३४, रा. शिवनारायण अपार्टमेंट, एकदंतनगर, अंबड, नाशिक) असे मृत महिलेचे नाव आहे. रुपाली या सिडको परिसरातील एका डायग्नोस्टिक सेंटरमध्ये कार्यरत होत्या. मंगळवारी कंपनीच्या कामानिमित्त त्या एका मित्रासोबत वाडीवऱ्हे परिसरात गेल्या होत्या. तेथून दोघे एका रिसॉर्टमध्ये जेवणासाठी गेले.
नियंत्रण सुटून कार रिसॉर्टच्या प्रवेशद्वारावर धडकली
जेवण झाल्यानंतर रिसॉर्टमधून बाहेर पडत असताना, तिच्या मित्राचे कारवरील नियंत्रण सुटले. कार रिसॉर्टच्या प्रवेशद्वाराला धडकली. यामुळे रुपाली पाटील या गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. ही घटना घडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा