Headlines

Pune News: निवृत्त शिक्षकाने चौराई डोंगरावर फुलवले नंदनवन; हजारो देशी झाडांच्या लागवडीने परिसर हिरवागार – chinchwad retired teacher creates paradise on chaurai hill turns lush green with planting of thousands of native trees


म.टा.प्रतिनधी, चिंचवड: निवृत्त शिक्षक असलेले पंढरीनाथ आगळे यांनी आपल्या ग्रामदेवतेचा डोंगर आणखी हरित व्हावा यासाठी प्रयत्न केला. करोनानंतर रिकाम्या जागेत फळांच्या बिया आणि लहान रोपे नागरिकांच्या साह्याने आणून येथे लावली आहेत. वय वर्षे ७४ असूनही आगळे यांनी पर्यावरणसंवर्धनाचा घेतलेला हा वसा कोणाही तरुणाला लाजवणारा आहे.

सोमाटणे गावचे ग्रामदैवत ही डोंगरावरील चौराईमाता आहे. शिक्षक म्हणून निवृत्त झाल्यानंतर ग्रामदैवत असलेल्या चौराईमातेच्या दर्शनासाठी आगळे जाऊ लागले. या दरम्यान या परिसरात देशी झाडांचे रोपण करावे, अशी कल्पना सुचली. डोंगरावर काही परिसर रिकामा असून, याठिकाणी झाडांचे रोपण शक्य होते. सन २०१८नंतर या कामाला त्यांनी सुरुवात केली. कोण सोबत येईल की नाही असा विचार न करता प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. रोपे पायध्यापासून आणणे आणि इच्छित ठिकाणी रोपण करण्यापर्यंत सर्व कामे ते मनापासून करतात. ग्रामस्थदेखील काही वेळा या कामात मदतीला येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Maharashtra TimesPune Crime: पुण्यात पेठेतील तरुणीच्या प्रेमात पडला, पण वाद होताच प्रियकराने क्रूरपणे संपवलं; आता कोर्टाचा दणका, आयुष्यभराचा धडा!
कुठेही बाहेर गेल्यानंतर झाडांच्या बिया जमवणे, रोप जमवणे हे आगळे यांचे आवडीचे काम. या झाडांचे रोपण करताना आगळे यांनी पैसे खर्च केले नाहीत, तर जिथून शक्य आहे तिथून बिया, रोपे जमवून डोंगरावर रोपण केली. झाडांसाठी आळी बनवणे, खत घालणे, पाण्याची सोय करणे ही सगळी कामे ते एकटे करतात.

२०१८-२५ दरम्यान केलेले वृक्षारोपण
फळे ७८९
देशी ३०६
फुले २०२६
२०२५-२६ मध्ये रोपण केलेली झाडे
बिया रोपण ७३१६
रोपे ८०

Maharashtra TimesSunetra Pawar : खपवून घेणार नाही, काँग्रेसने माफी मागावी, प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे संतापलेदेशी झाडांची लागवड

आंबा, फणस, जांभूळ, नारळ, चिंच, वड, पिंपळ, लिंबू, आवळा, पिंपळ, उंबर, बेल, आपटा, गुलमोहोर, पानफुटी अशी विविध झाडे त्यांनी लावली आहेत. मोगरा, जास्वंद, चाफा अशी फुलझाडेही त्यांनी लावली आहेत.

शाळेतून निवृत्त झाल्यानंतर आपला वेळ चांगल्या वेळी ग्रामदैवत असलेल्या चौराई डोंगरावर झाडांचे रोपण आवश्यक असल्याचे समजले. त्यानुसार श्रमदान करून वृक्षारोपण केले. दररोज चौराई डोंगरावर जाऊन झाडांना वेळ देतो. यामुळे आत्मिक समाधान मिळते. यात ग्रामस्थदेखील प्रोत्साहन देतात. – पंढरीनाथ आगळे, निवृत्त शिक्षक

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत