Headlines

Pune News: पत्नीनं घरी बोलावलं, पण त्याने मित्राच्या शब्दाचा मान ठेवला अन् तिथेच घात झाला! क्षणात संसार उद्ध्वस्त


म. टा. प्रतिनिधी, पुणे: घरी पत्नीने आवडीची बिर्याणी बनवली होती. काम आटोपून जेवायला घरी जाण्याची तयारीही झाली होती. मात्र, ‘आज माझ्यासोबतच जेव’ असा मित्राचा आग्रह आला आणि सनी अशोक माने (वय ३६) जेवण्यासाठी थांबला. काही क्षणांतच कचऱ्याचा प्रचंड ढिगारा कोसळला आणि नियतीने त्याला कायमचे हिरावून नेले.

मोशी येथील कचरा डेपो परिसरात वाहनचालक म्हणून काम करणारा सनी माने हा मूळचा दिघी येथील रहिवासी. पत्नी कांचन, दोन लहान मुले आणि आई-वडील असा त्याचा परिवार आहे. कुटुंबाचा प्रमुख आधार असलेला सनी गेल्याने माने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

दुर्घटनेच्या दिवशी सनी घरी जेवायला जाणार होता. पत्नीने खास त्याच्यासाठी बिर्याणी तयार केली होती. मात्र, मित्राच्या आग्रहाखातर तो कँटीनमध्येच थांबला. हाच निर्णय त्याच्या आयुष्याचा अखेरचा ठरला. काही क्षणांतच भीषण दुर्घटना घडली आणि सनी कचऱ्याच्या ढिगाऱ्याखाली अडकला.

‘तो घरी आला असता, तर आज आमचे कुटुंब उद्ध्वस्त झाले नसते,’ अशी हळहळ व्यक्त करताना पत्नी कांचन यांच्या डोळ्यांतून अश्रू थांबत नव्हते. दोन निरागस मुलांच्या डोक्यावरचे वडिलांचे छत्र हरपले, तर वृद्ध आई-वडिलांनीही आपल्या मुलाला कायमचे गमावले.

“दोषींवर नक्की कारवाई होईल”

मोशी कचरा डेपो येथे झालेल्या भीषण दुर्घटनेच्या चार दिवसांनंतर शनिवारी (११ जुलै) उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन बचावकार्याचा आढावा घेतला; तसेच दोषींवर कडक कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले. विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, आमदार सुनील शेळके, माजी आमदार विलास लांडे आदी उपस्थित होते.

पवार म्हणाल्या, ‘बचावकार्यासाठी लष्कर आणि ‘एनडीआरएफ’ची मदत घेण्याच्या सूचना तातडीने देण्यात आल्या होत्या. मी व्हिडिओ कॉलद्वारे परिस्थितीचा आढावा घेत होते.’ पवारांनी परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर उपस्थित नातेवाइकांशी संवाद साधला. त्यानंतर तेथून जात असताना मुख्य प्रवेशद्वारापाशी त्यांची वाट पाहत काही नातेवाइक थांबले होते. मात्र, पवार यांचा ताफा तेथे न थांबल्याने काही नातेवाइकांनी दगडफेकीचा प्रयत्न केला.

लोणावळा : मावळ तालुक्यातील विसापूर किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पाटण गावात सहा जुलैच्या पहाटे झालेल्या अतिवृष्टीमुळे दरड कोसळून झालेल्या घटनेत तिघांचा मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर शनिवारी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पाटणला भेट देऊन मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. मृतांच्या वारसांना प्रत्येकी चार लाख रुपयांप्रमाणे एकूण १२ लाख रुपयांची मदत करण्यात आली.

अक्षय शितोळे

लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.

पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.

मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU

शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत