Ketan Agarwal Killed Case : केतनचा खून करणाऱ्या आरोपींना कठोर शिक्षा देण्याच्या मागणीसाठी गहुंजे येथील लोढा सोसायटी परिसरात अग्रवाल समाजाच्या वतीने मूक मेणबत्ती मोर्चा काढण्यात आला.

समोरासमोर बसवून चौकशी
केतन अग्रवाल याचा १८ जून रोजी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास लोहगड किल्ल्यावरील हत्ती तलावाजवळील दरीत ढकलून खून करण्यात आला. या प्रकरणात सिया गोयल आणि चेतन चौधरी यांना अटक केली असून, लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून आरोपींची समोरासमोर बसवून चौकशी सुरू आहे.
Nashik News : ‘क्लास 1’ अधिकाऱ्याने माणुसकी जपली! जिना चढताना आजी-आजोबांना धाप लागली, नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी दाम्पत्याचं काम झाडाच्या पारावर बसून केलं
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिया आणि चेतनची पहिली भेट गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये दिवाळी पार्टीत झाली होती. या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. याच दरम्यान, सियाच्या लग्नासाठी घरातून स्थळे पाहणे सुरू झाले. परदेशातून उच्च शिक्षण घेऊन परतलेला आणि एका नामांकित कंपनीत संचालक असलेल्या केतनचे स्थळ सियासाठी आले. प्रतिष्ठित कुटुंब असल्याने सियाने घरच्यांच्या दबावामुळे या लग्नाला होकार दिला आणि त्यांचा साखरपुडाही झाला. चेतनसमवेत प्रेमसंबंधांमुळे सियाला केतनशी लग्न करायचे नव्हते. मात्र, ती उघडपणे विरोध करू शकत नव्हती. अखेरीस केतनला वाटेतून हटवण्याचा कट या दोघांनी आखला.
किल्ल्यावरील जागांचे लोकेशन चेतनला व्हॉट्सॲपवर
सिया आणि केतन ३१ मे रोजी लोहगडावर गेले होते. तिथेच सियाच्या डोक्यात केतनला दरीतून ढकलून अपघाताचा बनाव रचण्याची कल्पना आली. त्यानंतर सियाने किल्ल्यावरील जागांचे लोकेशन चेतनला व्हॉट्सॲपवर पाठवले. दोघेही संभाषणानंतर चॅट डिलीट करीत असत. केतनला दरीत ढकलताना कोणती पद्धत वापरायची, याचा त्यांनी सराव केला. त्यानंतर १४ जून रोजी केतनला किल्ल्यावरून ढकलण्याचा पहिला प्रयत्न केला. मात्र, त्या वेळी प्रयत्न अयशस्वी ठरला. त्यानंतर १८ जूनला चेतन आपला फोन दुकानातच ठेवून, दुसऱ्याचा फोन घेऊन लोहगडावर पोहोचला. त्याने अंगावर हुडी घालून चेहरा झाकला होता. किल्ल्यावर पोहोचल्यानंतर त्याने हुडी काढून पिशवीत ठेवली. खून केल्यानंतर चेतनने पुन्हा हुडी परिधान केली आणि किल्ल्यावरून खाली उतरल्याचे तपासात समोर आले आहे.
Pune News: शिवरायांच्या गड-किल्ल्यांची सफर घरबसल्या करता येणार; ऐतिहासिक जागांची माहितीही मिळणार, काय आहे नवा उपक्रम?
सिया गोयलच्या आई-वडिलांची चौकशी
केतन अग्रवाल खून प्रकरणातील आरोपी सिया गोयलच्या भावाची लोणावळा ग्रामीण पोलिसांनी शुक्रवारी तब्बल दहा तास चौकशी केली होती. त्यानंतर शनिवारी सिया गोयलच्या आई-वडिलांचीही पाच तासांहून अधिक काळ कसून चौकशी करण्यात आली. सिया, तिचा प्रियकर चेतन चौधरी आणि कुटुंबीयांना या कटाची पूर्वकल्पना होती का; तसेच खूनाच्या कटाशी संबंधित इतर बाबींबाबत माहिती घेण्यात आल्याचे समजते.
Airoli-Katai Naka Project: ठाणे-डोंबिवली ते नवी मुंबई प्रवास सुस्साट! ४५ मिनिटं वाचणार; ऐरोली-काटई उन्नत मार्ग लवकरच वाहतुकीसाठी खुला
आईला पहिला फोन
केतन दरीत कोसळताच सियाने आधी चेतनला तिथून सुखरूप रवाना केले. त्यानंतर तिने पहिला फोन स्वतःच्या आईला केला. काही वेळानंतर तिने रडण्याचा आणि ओरडण्याचा बनाव केला.

