Pune Kharadi River Newborn Girl Body Found Police begin Investigation; जन्मताच चिमुकलीच्या नशिबी मरण! खराडीच्या नदीपात्रात नवजात मुलीची बॉडी, पुण्यातील घटनेचं गूढ वाढलं
Pune Kharadi River Newborn Girl Body Found Police begin Investigation; जन्मताच चिमुकलीच्या नशिबी मरण! खराडीच्या नदीपात्रात नवजात मुलीची बॉडी, पुण्यातील घटनेचं गूढ वाढलं
Pune Crime News : पुण्यातून एक हृदयद्रावक तथा संतापजनक घटना समोर आली आहे. खराडीजवळील नदीपात्रात नवजात चिमुकलीचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे संपूर्ण पुण्यात हळहळ व्यक्त होत आहे.
खराडी नदीत नवजात मुलीचा मृतदेह
अभिजित दराडे, पुणे : पुण्याच्या खराडी परिसरामध्ये एक अत्यंत सुन्न करणारी घटना उघडकीस आली आहे. शुक्रवारी दुपारच्या सुमारास नदीपात्रात एका नवजात मुलीचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. जन्मानंतर लगेचच या निष्पाप बालिकेला अज्ञातांनी नदीत फेकून दिले असावे, असा प्राथमिक संशय पोलीस प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
मृतदेह सुखरूप पाण्याबाहेर काढला
नदीपात्रात अर्भक असल्याची माहिती मिळताच वाघोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील पथकाने पाहणी केली असता, पाण्यात मृतदेह असल्याची खात्री झाली. त्यानंतर ‘शहीद भगतसिंग जीवन रक्षक फाउंडेशन’चे सदस्य आणि जीवरक्षक बच्चूसिंग टाक यांच्या मदतीने बोटीचा वापर करून हा मृतदेह सुखरूप पाण्याबाहेर काढण्यात आला.
पोलिसांनी तातडीने घटनास्थळाचा पंचनामा केला असून, मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणी आणि शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. या निर्घृण कृत्यामागे नेमके कोण आहे आणि कोणत्या परिस्थितीत या बालिकेला तिथे टाकण्यात आले, याचा वाघोली पोलिसांकडून तपास सुरू आहे. बालिकेला जिवंतपणी पाण्यात फेकले गेले की मृत्यूनंतर, हे केवळ शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होऊ शकेल, त्यामुळे या तपासात वैद्यकीय अहवाल महत्वाचा ठरणार आहे.
सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचं काम सुरु
आरोपींचा माग काढण्यासाठी पोलीस अनेक पातळ्यांवर तपास करत आहेत. घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्याचे काम सुरू असून, आवश्यक ते तांत्रिक पुरावे गोळा केले जात आहेत. तसेच परिसरातील रुग्णालये आणि क्लिनिक्समधून अलीकडेच प्रसूती झालेल्या महिलांची माहिती संकलित केली जात आहे. या अमानुष घटनेमुळे खराडीसह संपूर्ण पुणे शहरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.
अशा प्रकारे एका नवजात जिवाला वाऱ्यावर सोडून देणाऱ्या गुन्हेगारांचा तातडीने शोध घेऊन त्यांच्यावर कडकडीत कारवाई करावी, अशी आक्रमक मागणी स्थानिकांकडून होत आहे. सध्यातरी या प्रकरणात कोणत्याही व्यक्तीला आरोपी म्हणून घोषित करण्यात आलेले नाही. पोलीस तपास आणि वैद्यकीय अहवाल प्राप्त झाल्यानंतरच या प्रकरणाचा पूर्ण उलगडा होईल, असे पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा