Pune Ganeshotsav DJ Row: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपले पुण्यावरील प्रेम जाहीरपणे वारंवार व्यक्त केले आहे. त्यामुळे आज पुण्यात आल्यानंतर भाजपच्या नेमक्या कोणत्या पदाधिकाऱ्यांची भूमिका मुख्यमंत्री उचलून धरणार, डीजेबाबत काय भूमिका मांडणार, याकडे आता सामान्य पुणेकरांचे लक्ष लागले आहे.

रविवारी पुणेकरांनी रस्त्यावर उतरून ‘डीजे’ला विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर आज (सोमवारी) पुण्यात येणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावर काय भूमिका मांडणार याकडे लक्ष लागले आहे. भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक आज गणेश कला क्रीडा मंच येथे होणार आहे. या बैठकीला मुख्यमंत्री पूर्णवेळ उपस्थित राहतील. या बैठकीसोबतच ते स्थानिक पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार असून, ते नेमकी कोणाची भूमिका उचलून धरणार याबाबत उत्सुकता आहे.
Baramati News : पोलीस बनून समाजाला प्रेरणा दिली, स्वप्न साकार करणाऱ्या संगीता यांचं डोंबिवलीत टोकाचं पाऊल, बारामतीकर सुन्न‘पुण्यातील माझ्या गणेशोत्सव मंडळाच्या कार्यकर्त्याला कोणताही त्रास होणार नाही,’ असे महापौर मंजूषा नागपुरे यांचे म्हणणे आहे. त्यांनी अद्याप ‘डीजे’बाबत स्पष्ट भूमिका घेतलेली नाही. पुण्याचे खासदार व केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी नियमांच्या चौकटीतच गणेशोत्सव साजरा करा, ‘प्लाझ्मा’, ‘लेझर लाइट’ आणि ‘प्रेशर मीड’वर बंदी हवीच, अशी भूमिका घेतली आहे.
‘गणेशोत्सव म्हणजे डीजे, अशी भ्रामक कल्पना गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांच्या मनात नाही. गणेश मंडळांनी डीजे आणि लेझर बीमचा वापर टाळून कायद्याचे पालन करून उत्सव साजरा करावा,’असे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. खासदार प्रा. डॉ. मेधा कुलकर्णी यांनी ‘डीजे’मुक्त गणेशोत्सव करून पुण्याने राज्यासाठी आदर्श ‘पुणे पॅटर्न’ निर्माण करावा, अशी मागणी केली आहे.
अर्ध्या तासात प्रश्न वाचले, नंतर वॉशरुमला गेले, अवघ्या 30 मिनिटांत 90 प्रश्न अचूक, उमेदवारांचा डेटा पाहून अधिकारी शॉक; पुणे PMCच्या परीक्षेत हायटेक कॉपी‘उत्सव साजरा करताना अनावश्यक निर्बंधांचा बोजा मंडळांवर पडू नये. सार्वजनिक गणेशोत्सव अधिकाधिक निर्बंधमुक्त असावा. मी खंबीरपणे गणेशोत्सव मंडळांच्या पाठीशी आहे,’ असे भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी स्पष्ट केले आहे. भाजपच्या काही नगरसेवकांनी ‘डीजे’ वाजणारच अशी भूमिका घेतली आहे; तर सध्याचे वातावरण पाहता काहींनी स्पष्ट प्रतिक्रिया नोंदवली नसली तरी त्यांचा ‘डीजे’ला पाठिंबा आहे.
संयोजकांची माघार; पुणेकरांकडून विरोध
पुणे महापालिकेने गणेशोत्सवासंदर्भात आयोजित केलेल्या बैठकीत विद्यानंद बापट यांनी ‘डीजे’ला विरोध केल्यानंतर त्यांना हुसकावून बाहेर काढले गेले. त्यावर पुणेकरांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटल्या. रविवारी पुण्यात ‘डीजे’विरोधी सभेचेही आयोजन केले गेले. संयोजकांनी माघार घेतल्यानंतरही शेकडो पुणेकरांनी रस्त्यावर येऊन ‘डीजे’ला विरोध दर्शवला.

