Headlines

Pune crime: सोशल मीडियावरील मैत्री महागात; पुण्यातल्या शिक्षिकेचं घर मित्रानेच केलं साफ, सोन्याच्या दागिन्यांसह रक्कमही पळवली! – friend steals jwellery and cash worth rs 14 lakh from girlfriend house in pune kondhwa


Pune Crime: पासपोर्टसंदर्भातील कामासाठी तो बडोदा येथे आला असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने चोरीची कबुली दिली. त्याच्याकडून चोरीतील १६ तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

pune crime
पुणे क्राईम बातम्या(फोटोमहाराष्ट्र टाइम्स)
म.टा.प्रतिनिधी, पुणे: शिक्षिका असलेल्या तरुणीच्या घरी पाहुणा म्हणून आल्यानंतर २४ हजारांची रोकड आणि सोन्याचे दागिने असा १४ लाख ६३ हजार रुपयांचा ऐवज चोरी करून पसार झालेल्या तरुणाला कोंढवा पोलिसांनी गुजरातमधील बडोदा येथून अटक केली. आरोपीकडून चोरीतील १४ लाख ३९ हजार रुपये किमतीचे १६ तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

यश कैलास भुलचंदानी (वय २४, रा. मोहाडी, जि. मेहसाणा, गुजरात) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुणी पेशाने शिक्षिका असून अविवाहित आहे. सुमारे दीड ते दोन वर्षांपूर्वी समाजमाध्यमातून तिची आरोपी यश याच्याशी ओळख झाली होती. MBA शिक्षण घेतलेल्या यशने यापूर्वी केनियामध्ये नोकरी केली होती. काही दिवसांपूर्वी तो पुण्यात आला असून, एका टुरिस्ट कंपनीत काम करत होता.

Maharashtra TimesSunetra Pawar: पुणे जिल्ह्यात 62 हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची माहिती
यश हा २५ जूनला कोंढवा खुर्द येथील तरुणीच्या घरी भेटण्यासाठी आला होता. त्या वेळी तरुणी त्याच सोसायटीत राहणाऱ्या मावशीकडे जेवणाचा डबा देण्यासाठी गेली होती. घरात एकटाच असलेल्या यशने बेडरूममधील कपाट उघडून त्यातील २४ हजारांची रोकड आणि सोन्याचे दागिने चोरले. घरातून निघताना ‘माझी तब्येत ठीक नाही, त्यामुळे मी निघतो,’ असे सांगून त्याने तेथून काढता पाय घेतला. तरुणी घरी परतल्यानंतर चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर कोंढवा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.

तपासादरम्यान आरोपी तरुणीच्या संपर्कात केवळ ‘स्नॅपचॅट’द्वारे असल्याचे समोर आले. त्याचा मोबाइल क्रमांकही उपलब्ध नव्हता. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे कोंढवा पोलिसांनी आरोपीचा माग काढला. पोलिस कर्मचारी केशव हिरवे यांना आरोपी बडोदा येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांचे पथक चार दिवस त्याच्यावर पाळत ठेवून होते.

Maharashtra TimesChandrakant Patil : आंबा चोरला म्हणून फाशी नसते, ‘नीट’ पेपरफुटीवर चंद्रकांत पाटलांचं वक्तव्य; मूल गमावलेल्या आईला लेकरु कुठल्या बाजारातून आणाल? काँग्रेसची टीका
वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष खेतमाळस आणि गुन्हे निरीक्षक प्रशांत मंडले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक रवींद्र गावडे तसेच पोलिस कर्मचारी रवींद्र चिप्पा, विशाल मेमाणे, राहुल शितोळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

किशोरी तेलकर

लेखकाबद्दलकिशोरी तेलकर किशोरी तेलकर

किशोरी तेलकर महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये कन्सल्टंट या पदावर कार्यरत आहेत. किशोरी या २०२२पासून मटा ऑनलाइन सोबत जोडलेल्या आहेत. राजकारण, हायपर लोकल स्टोरी, क्राईम बातम्या, महिलांविषयक समस्या, गाव खेड्यातल्या बातम्या करण्याचा त्यांचा अनुभव आहे.

पत्रकारितेतील अनुभव
किशोरी यांना वृत्तपत्र, टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमधील ६ वर्षांचा अनुभव आहे. किशोरी यांनी सकाळ वृत्तपत्रातून पत्रकारितेला सुरुवात केली. सकाळ वृत्तपत्रात काम करतांना त्यांनी प्रिंट मीडियासोबतच सोशल मीडिया हॅंडलिंग, वेबसाईटचेही काम केलं आहे. सध्या चार वर्षांपासून त्या महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कार्यरत आहेत. लेखन कौशल्याच्या जोरावर सामाजिक समस्या, शाळा- कॉलेज विद्यार्थी समस्या, आरोग्य टिप्स, महिलांविषयक प्रश्न, फॅशन, लाइफस्टाइल या विविध विषयांवर त्यांनी बातम्या केल्या आहेत.

शैक्षणिक पात्रता
किशोरी तेलकर यांनी कै. बिंदू रामराव देशमुख कला व वाणिज्य महिला महाविद्यालय, नाशिकरोड येथून एम.कॉम पदवी संपादन केली. त्यानंतर गोखले एज्युकेशन सोसायटीचे एच.पी.टी आर्ट्स अँड आर.वाय.के सायन्स कॉलेजमधून कम्युनिकेशन अँड जर्नलिझम विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. जर्नलिझमचे शिक्षण घेत असतानाच किशोरी यांनी देशदूत, दिव्यमराठी सारख्या वृत्तपत्रात इंटर्नशिप केलेली आहे. मराठी भाषेवर प्रभुत्व असून हिंदी, इंग्रजी भाषाही त्यांना अवगत आहेत.आणखी वाचा