Pune car plunged 60 feet into a valley while taking photos in Missing Link area; मिसिंग लिंक परिसराचं सौंदर्य कॅमेऱ्यात कैद करायला गेला अन् कार थेट ६० फूट दरीत कोसळली
Pune car plunged 60 feet into a valley while taking photos in Missing Link area; मिसिंग लिंक परिसराचं सौंदर्य कॅमेऱ्यात कैद करायला गेला अन् कार थेट ६० फूट दरीत कोसळली
म .टा. प्रतिनिधी लोणावळा: खंडाळा घाट माथा परिसरातील निसर्ग सौंदर्याची आणि नुकताच प्रकाशझोतात आलेल्या आशिया खंडातील सर्वात लांब मिसिंग लिंकची (कनेक्टिंग लिंक) सर्वांना भुरळ पडली आहे. याच मिसिंग लिंक व परिसरातील सौंदर्याचे नयनरम्य दृष्य आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद करण्याचा मोह हरीयाणातील एका पर्यटकाला आवरला नाही. मिसिंग लिंक आणि परिसरातील सौंदर्य टिपण्यासाठी या उतावीळवीराने आपली आलिशान कार या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा रस्ता नसताना येथील उंच डोंगर, टेकड्यांच्या तीव्र उतारावरून दऱ्यातून नेताना त्याचे कारवरील नियंत्रण सुटले अन् कार थेट मिसिंग लिंक बोगद्याच्या वर असलेल्या उंच डोंगरावरील दरीत सुमारे ५० ते ६० फूट खोल दरीत कोसळली. सुदैवाने ती कार दरीतील एका मोठ्या झाडाला अडकल्याने अनर्थ टळला. अन्यथा ही कार थेट मिसिंग लिंकच्या मार्गावर कोसळून मोठी दुर्घटना घडली असती. बोरघाट (दस्तुरी) मार्ग पोलिसांच्या सतर्कतेमुळे दरीत कोसळलेल्या कारमधील कारचालक पर्यटकाचा जीव वाचला आहे. मोहित स्वरूप भटनागर (वय- ५९, सध्या रा. वांद्रे, मुंबई, मूळ रा. गुरुग्राम, हरियाणा) असे कारचालक पर्यटकाचे नाव आहे.
बोरघाट (दस्तुरी) महामार्गाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, हरीयाणातील मोहित भटनागर हा पर्यटक त्याच्या स्कोडा कारने (क्रमांक – एमएच -०४/एफआर-७१४३) लोणावळा खंडाळा परिसरात फिरायला मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाने येत होते. यावेळी त्यांना खंडाळा घाट माथा परिसरातील निसर्ग सौंदर्य आणि मिसिंग लिंकची भुरळ पडली. मिसिंग लिंकच्या बोगद्यावर असलेल्या निसर्ग सौंदर्याचा आनंद लुटण्याचा आणि येथील नयनरम्य सौंदर्य आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद करण्याचा मोह त्यांना आवरला नाही. यासाठी त्यांनी खंडाळा घाटातून मार्ग काढत थेट गारमाळ परिसर गाठला. यावेळी त्याने कार गारमाळ रस्त्यावर उभी करण्याऐवजी ती येथील उंच डोंगर टेकड्या व दऱ्यातील तीव्र उतारावरून धोकादायकरित्या नेण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्याचे कारवरील नियंत्रण सुटले अन् कार चार-पाच पलट्या खात थेट ५० ते ६० फूट खोल दरीत कोसळली. सुदैवाने ती कार दरीतील एका मोठ्या झाडाला अडकली.
दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच बोरघाट दस्तुरी महामार्गाचे सहायक पोलीस निरीक्षक स्वप्निल पाटील, पोलीस कर्मचारी संदीप पवार, किरण शिंदे, भरत पावरा, गणेश खाडे आणि संतोष गुजरवार आणि गोडसे यांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची पाहणी केली. दरीत उतरणे धोकादायक असतानाही पोलिसांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून स्थानिकांच्या मदतीने दरीत उतरून कारमध्ये अडकलेल्या चालकाला बाहेर काढले. त्यानंतर तातडीने रुग्णवाहिकेतून उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले.
या अपघातात कारचालक किरकोळ जखमी झाला असला तरी, घटनेचे गांभीर्य मोठे होते. काही क्षणांचा उशीर झाला असता तर मोठी जीवितहानी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. महामार्ग पोलिसांनी दाखविलेली प्रसंगावधानता, धाडस आणि तत्परता यामुळे एका व्यक्तीचा जीव वाचला असून, या बचावकार्यासाठी महामार्ग पोलीस दलाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा