Pune Lohagad Ketan Agarwal Death : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरुन प्रवास करत असताना सियाने चहासाठी एका ‘फूड मॉल’जवळ गाडी थांबवायला सांगितली. साधारण १० मिनिटांनंतर ती गाडीजवळ परत आली आणि तिने मला गाडीची डिक्की उघडण्यास सांगितले, असे टॅक्सी चालक वैभव जाधव म्हणाला

टॅक्सी चालक वैभव जाधव याने केतन-सियासह चौघांनी ६ जून रोजी पुण्याहून मुंबईला केलेल्या प्रवासाचा तपशील सांगितला. बाली येथे ‘प्री-वेडिंग शूट’ला जाण्यापूर्वी केतनचा पासपोर्ट गायब झाल्याप्रकरणी तपास सुरु असतानाच टॅक्सी चालकाच्या दाव्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.
टॅक्सी चालकाने काय सांगितले?
६ जूनला सकाळी १० वाजताच्या सुमारास पुण्यात बिबवेवाडीहून सिया-साहिल टॅक्सीत बसले. सुरुवातीला सियाने कॅबमध्ये बसण्यासच नकार दिला होता, परंतु तिचा भाऊ साहिल याने तिला बळजबरीने गाडीत बसवले. त्यांचे आई-बाबा म्हणाले सावकाश जा. आम्ही निघालो. साहिलने गाणी लावायला दिली आणि तो पुढे येऊन बसला. त्यानंतर ही कॅब रावेत येथे पोहोचली. साहिलने सांगितलं की १०-१५ मिनिटं थांबा आम्ही आलो. काही वेळाने सहा जण खाली आले. सिया-साहिलच्या सोबत केतन अग्रवाल आणि त्याची बहीण गाडीत येऊन बसले, असे वैभवने सांगितले.
Mumbai Muharram Poison Plot : पत्नी सोडून गेली, समाजाबद्दल द्वेष; फय्याज 15000 मुंबईकरांच्या जीवावर उठला, सलमानच्या सतर्कतेने अनर्थ टळला
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरुन प्रवास करत असताना सियाने चहासाठी एका ‘फूड मॉल’जवळ गाडी थांबवण्यास सांगितले. साधारण १० मिनिटांनंतर ती गाडीजवळ परत आली आणि तिने त्याला गाडीची डिक्की उघडण्यास सांगितले. तिने गाडीच्या डिक्कीत असलेल्या आपल्या पर्समधून काहीतरी बाहेर काढले. आणखी १५ ते २० मिनिटांनंतर सगळ्यांनी मला गाडीकडे परत बोलावले आणि मुंबई विमानतळाच्या दिशेने प्रवास पुन्हा सुरु झाला, असे वैभव म्हणाला.
मी सर्व प्रवाशांना मुंबई विमानतळावर सोडले. त्यानंतर साधारण दोन मिनिटांनी मला एक फोन आला, की टॅक्सीमध्ये एक लहान बॅग राहिली आहे. तो त्यावेळी सुमारे २०० मीटर अंतरावर होता आणि त्याने ती बॅग परत आणून दिली.
कट्टर मित्रांच्या राजकीय वाटा बदलल्या; ओमराजेंविरोधात कैलास पाटील मैदानात
केतनचा वैभवला व्हिडिओ कॉल
आणखी ५०० मीटर गाडी चालवल्यानंतर मला पुन्हा एक फोन आला, आता केतनचा पासपोर्ट कॅबमध्येच राहिल्याचे मला सांगण्यात आले. मी आधीच गाडी तपासली होती आणि पासपोर्ट आत नसल्याचे त्यांना कळवले होते. मात्र त्यांनी मला कॅबच्या आतील भाग दाखवण्यासाठी व्हिडिओ कॉल करण्यास सांगितले, तरीही पासपोर्ट सापडला नाही.
मला विमानतळावर परत येण्यास सांगण्यात आले, तिथे साहिल आणि केतन यांनी स्वतः कॅबची झडती घेतली. गाडीची तपासणी करुनही पासपोर्ट सापडला नाही. झडतीनंतर सगळेच विमानतळावरुन निघून गेले.
सिया-साहिलचा वाद
पुण्याहून रावेतला केतन बसेपर्यंत संपूर्ण वेळ सिया आणि तिचा भाऊ साहिल यांच्यात वाद सुरु होता. सियाने गाडीची डिक्की उघडायला सांगून त्यातून काहीतरी काढले होते; मात्र ती वस्तू नेमकी काय होती, हे आपल्याला माहित नसल्याचे वैभवने नमूद केले.
केतन अग्रवाल याच्या मृत्यूच्या काही आठवडे आधी बालीची नियोजित ‘प्री-वेडिंग’ ट्रीप रद्द करण्यास भाग पाडणारा ‘हरवलेला पासपोर्ट’ आता तपास अधिकारी या हत्येच्या कटातील अत्यंत महत्त्वाची कडी मानत आहेत.
Mayank Lohar : मयंकचा जीव धोक्यात, बाकीच्या प्रवाशांनी रोशनला धरलं का नाही? सर्वांच्या मनातील प्रश्नाचं उत्तर प्रत्यक्षदर्शीने दिलं; डब्यात एकच गोंधळ उडाला
यापूर्वीच, पुणे ग्रामीण पोलिसांनी असेही म्हटले होते की, सिया गोयल हिने केतनचा पासपोर्ट चोरुन नष्ट केला होता, त्यामुळे सर्वांना परदेशात जाण्यापासून परावृत्त व्हावे लागले. ही काही केवळ एक स्वतंत्र घटना नव्हती, तर एका व्यापक कटाचा भाग होता, ज्याचा शेवट अखेरीस लोहगड किल्ल्यावरुन ढकल्यामुळे केतनचा मृत्यू होण्यात झाला.

