Pune Baramati Zilla Parishad Member Mangesh Jagtap has Filed Case Against Victim Girl Police Received New Information; ‘लग्न ठरलेलं, महाबळेश्वरमध्ये रिसॉर्ट बुक, शारीरिक संबंध’; पुणे जिल्हा परिषद सदस्याच्या प्रेमप्रकरणात मोठी अपडेट
Pune Baramati Zilla Parishad Member Mangesh Jagtap has Filed Case Against Victim Girl Police Received New Information; ‘लग्न ठरलेलं, महाबळेश्वरमध्ये रिसॉर्ट बुक, शारीरिक संबंध’; पुणे जिल्हा परिषद सदस्याच्या प्रेमप्रकरणात मोठी अपडेट
Baramati Crime news : मंगेश जगताप याच्यावर थेट गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत बारामतीचे उपविभागीय पोलिस अधिकारी चैतन्य कदम यांनी माहिती दिली आहे.
जिल्हा परिषद सदस्य मंगेश जगताप(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
दीपक पडकर, पुणे (बारामती) : बारामती तालुक्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांचे पदाधिकारी मंगेश जगताप यांच्याविरुद्ध एका तरुणीच्या तक्रारीवरून गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकं काय घडलंय?
बारामती तालुक्यासह पुणे जिल्ह्यातील राजकीय वातावरण ढवळून काढणाऱ्या घडामोडीत, पुणे जिल्हा परिषद सदस्य मंगेश जगताप यांच्याविरुद्ध एका तरुणीच्या तक्रारीवरून बलात्कार, फसवणूक आणि लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक शोषण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाची सध्या माळेगाव पोलीस ठाण्यामार्फत चौकशी सुरू असून, तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक कुलदीप संकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. Rain Alert: पुढील २४ तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता; विदर्भाला झोडपणार, IMD चा ताजा अंदाज तक्रारदार तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार, दीर्घकाळ लग्नाचं आश्वासन देत तिच्याशी संबंध ठेवण्यात आले. विश्वास संपादन करून तिची फसवणूक करण्यात आली तसेच तिच्यावर वारंवार अत्याचार झाल्याचा आरोप तिने केला आहे. सुरुवातीला हा गुन्हा पुण्यातील बंड गार्डन पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला होता. पुढील तपासासाठी संबंधित अधिकारक्षेत्र असल्याने प्रकरण माळेगाव पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.
अन्यायाला कंटाळून आत्मदहनाचा प्रयत्न
या प्रकरणापूर्वी दोन दिवस संबंधित तरुणीने कथित अन्यायाला कंटाळून आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना घडली होती. त्यानंतर तिने पोलिसांकडे धाव घेत अधिकृत तक्रार दाखल केली. तक्रारीनंतर पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा नोंदवत तपासाला वेग दिला आहे. मंगेश जगताप हे बारामती तालुक्याचे प्रतिनिधित्व करणारे पुणे जिल्हा परिषद सदस्य असून ते राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्याशी संबंधित आहेत. त्यामुळे या गुन्ह्याची नोंद झाल्यानंतर बारामतीसह संपूर्ण पुणे जिल्ह्यात राजकीय चर्चांना उधाण आले आहे. या प्रकरणातील पुढील तपास आणि पोलिसांच्या कारवाईकडे आता सर्वांचे लक्ष लागलं आहे. Sangli Crime : महावितरणच्या सबस्टेशनमध्ये दुचाकी चार्जिंग करण्यास विरोध, वॉचमनच्या मुलाच्या डोक्यात सणक गेली; ऑनड्युटी ऑपरेटरला संपवलं
पीडित तरुणीचे अत्यंत गंभीर आरोप
पीडित तरुणीने प्रसारमाध्यमांशी बोलताना मंगेश जगताप यांच्या कुटुंबावर आणि मित्रांवरही गंभीर आरोप केले आहेत. ‘या संपूर्ण प्रकरणात मंगेश यांचे कुटुंब, त्यांची पोलीस असलेली मेव्हणी आणि दोन मित्र (अमर जगताप व रणजीत तांबडे) सामील आहेत. आमचं लग्न ठरलं होतं, महाबळेश्वरमध्ये रिसॉर्ट बुकिंग झालं होतं आणि 29-30 तारीखही ठरली होती; याचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत. गेले तीन महिने मंगेश मला दिसला की पळून जातोय. त्याने 21 वर्षे माझ्या आयुष्याशी खेळ का केला?,’ असा सवाल पीडितेने उपस्थित केला होता.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा