त्याचबरोबर, आपल्या देशातील कौटुंबिक संरचनांमध्येही बदल होत आहेत, विशेषतः शहरी भागात एकच अपत्य असलेल्या कुटुंबाची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीत, अपत्य, मुलगी असली तरीही, वृद्ध पालकांच्या भावनिक आणि आर्थिक कल्याणाच्या बाबतीत सक्रियपणे भूमिका बजावते. अनेक कुटुंबांमध्ये मुली केवळ पालकांचा संभाळच करत नाही तर, त्यांच्यासाठी आर्थिक आधाराचा मुख्य स्रोतही बनल्या आहेत.
Property Rights: नातेवाईक, भाऊ-बहीण जमीन वाटपास तयार नाही; खरच संमतीशिवाय जमिनीतला हिस्सा तुम्हाला मिळतो का?
अशा परिस्थितीत, सध्याच्या बदलत्या सामाजिक वास्तवाच्या पार्श्वभूमीवर आपल्या देशातील हिंदू वारसाहक्क कायदा , 1956 च्या कलम 15 कडे अधिक बारकाईने लक्ष दिले पाहिजे.
वारसाहक्क कायद्यातील कलम 15 काय
आपल्या देशातील हिंदू वारसाहक्क कायद्यातील कलम 15 मृत्युपत्र न करता मरण पावलेल्या हिंदू महिलेच्या मालमत्तेचे वारसाहक्क स्पष्ट करते. या तरतुदीनुसार वारसाहक्काचा क्रम खालीलप्रमाणे निश्चित केला आहे:
- मुलगे आणि मुली (आधीच निधन झालेल्या कोणत्याही मुलगा/मुलीच्या अपत्यांचाही समावेश होतो) आणि पती
- पतीचे वारस
- आई आणि वडील
- वडिलांचे वारस आणि त्यानंतर, आईचे वारस.
Robert Kiyosaki: तुमचे पैसे बुडणार? ‘इतिहासातील सर्वात मोठं मार्केट क्रॅश होणार’; म्युच्युअल फंड, ETF गुंतवणूकदारांना कियोसाकीचा इशारा
अशा परिस्थितीत, एखादा हिंदू पुरुष मृत्युपत्र न करता मरण पावतो, तेव्हाची कायदेशीर स्थिती यापेक्षा अगदी वेगळी आहे. एखादा हिंदू पुरुष मृत्युपत्र न करता मरण पावला तर, त्याची मालमत्ता Claas-1 मधील वारसांकडे हस्तांतरित होते. या वारसांमध्ये त्याची विधवा पत्नी आणि मुलांबरोबरच पुरुषाच्या आईचाही समावेश होतो. त्यामुळे कायदा त्या पुरुषाचे मूळ कुटुंबासोबत नातं मान्य करून प्राधान्य देतो. याउलट पत्नीच्या कुटुंबाला पुरुषाच्या नातेवाईकांपेक्षा जास्त प्राधान्य देण्याची कोणत्याही तरतूद आपल्या कायद्यात नाही.
कलम 15 मधील हीच असमानता भारतीय विधी आयोगाने 2008 मध्ये प्रकाशित आपल्या 207 व्या अहवालात विशेषत्वाने अधोरेखित केली होती आणि पतीच्या वारसांऐवजी महिलेच्या माहेरकडील वारसांना प्राधान्य देण्याची शिफारस केली होती. पण जवळपास दोन दशके उलटल्यानंतरही त्यासंबंधी कायदेशीर तरतूद अद्यापही ‘जैसे थे’ राहिली आहे.
Chabahar Port: होर्मुझ, खार्ग बेटानंतर अमेरिकेने चाबहार पोर्टकडे मोर्चा वळवला; भारताचे टेन्शन का वाढले? चीन-पाकिस्तानशी थेट कनेक्शन
ही परिस्थितीत टाळायला महिलांनी काय करायचे
त्यामुळे आपल्या पश्चात ही परिस्थिती उद्भवू नये म्हणून या समस्येवरील सामान्य उपाय म्हणून महिलांनी आपली मालमत्ता आपल्या इच्छेनुसार हस्तांतरित करण्यासाठी मृत्युपत्र तयार केले पाहिजे. विशेषतः आधुनिक कौटुंबिक व्यवस्थांच्या संदर्भात, मालमत्तेचे नियोजन करण्याबाबत एक महत्त्वाची महत्त्वाची सुरक्षात्मक बाब आहे.
वडिलांच्या मालमत्तेत हिंदू वारसा हक्क कायद्याने मुलींना समान सह-वारसदार म्हणजे coparceners म्हणून मान्यता दिली आहे, पण या कायद्यात एक विषमता आहे ती म्हणजे की एखाद्या मुलीला पती किंवा अपत्य नसेल आणि मृत्युपत्र केले न करता मरण पावली तर, महिलेच्या स्वतःच्या कमाईतून मिळवलेल्या मालमत्तेबाबत तिच्याच पालकांच्या हक्कांना दुय्यम स्थान दिले जाते.
अशा स्थितीत, आता वारसाहक्क कायद्यांमध्ये बदल होऊन आधुनिक कौटुंबिक रचनांमधील वास्तव प्रतिबिंबित करण्याची आणि महिलेच्या वारसाहक्क क्रमात पालकांना प्रथम मान्यता देण्याची वेळ आली आहे.
(Disclaimer: वरील तपशील केवळ माहितीसाठी आहे, यामध्ये चुका असू शकतात. मालमत्तेशी संबंधित प्रकरणांमध्ये आर्थिक सल्ला घेण्यासाठी एखाद्या वकील किंवा कायदे तज्ज्ञाशी चर्चा करा.)

