Headlines

Property Rights Husband Acquiring Home in Wife’s Name; पतीच्या उत्पन्नातून पत्नीच्या नावावर खरेदी केलेल्या मालमत्तेवर नेमका कोणाचा हक्क? इतरांना वाटा मिळतो का? मालकी हक्क कसा ठरतो, पाहा


Property Rights: आपली पत्नी किंवा आईच्या नावावर मालमत्ता खरेदीचा ट्रेंड भारतात नवीन नाही. बहुतेक भारतीय जेव्हा नवीन मालमत्ता खरेदी करतात, तेव्हा त्यांच्या आई किंवा पत्नीच्या नावावर करतात. पण यामुळे भविष्यात मालमत्तेच्या मालकी हक्क आणि विभागणीबाबत अनेकदा वाद निर्माण होतात.

महिलांनी मालमत्ता खरेदी केल्यास मुद्रांक शुल्कात सूट आणि इतर फायदे मिळतात म्हणून मालमत्ता खरेदी करताना बरेच लोक त्यांच्या पत्नीच्या नावावर नोंदणी करतात. मात्र, मालमत्तेची कायदेशीर मालकी कोणाकडे असू शकते, याबद्दल बऱ्याच लोकांना माहिती नसते. अनेक राज्यांमध्ये महिलेच्या नावावर खरेदी केलेल्या मालमत्तेवर मुद्रांक शुल्कात सूट देण्यासारखे लाभ मिळतात. पण पतीकर्ज काढून किंवा पूर्ण पेमेंट करून केवळ पत्नीच्या नावावर मालमत्तेची नोंदणी केल्याने मालमत्ता खरंच पत्नीची होते का?

Maharashtra TimesHousing Society Land Allotment: 2010 पासून रखडलेले जमीन वाटप पुन्हा सुरू होणार, ‘आदर्श’ घोटाळ्यानंतरची बंदी उठणार; हाऊसिंग सोसायट्यांसाठी शासनाचा मोठा निर्णय

पतीने पत्नीच्या नावे घेतलेल्या मालमत्तेचा मालक कोण?

15 फेब्रुवारी 2024 रोजी सौरभ गुप्ता विरुद्ध श्रीमती अर्चना गुप्ता या खटल्याच्या सुनावणीत अलाहाबाद उच्च न्यायालयाने या मुद्द्यावर एक महत्त्वपूर्ण मत व्यक्त केले. या खटल्यात वडिलांनी त्यांच्या पत्नी, म्हणजेच याचिकाकर्त्याच्या आईच्या नावावर खरेदी केलेल्या मालमत्तेचा समावेश होता. आई एक गृहिणी होती आणि त्यांचं स्वतःच कोणतंही स्वतंत्र उत्पन्न नव्हतं. मुलगा, सौरभ गुप्ताने मालमत्तेत एक चतुर्थांश हिश्श्यावर दावा केला होता.

Maharashtra TimesGold-Silver Rate Today : सोने-चांदीत दरवाढीचे संकेत? सणासुदीच्या तोंडावर सराफा बाजारातील दरांचा यु-टर्न, FOMC मिनट्सचा परिणामउच्च न्यायालयाने म्हटले आहे की, एखाद्या हिंदू पतीने गृहिणी पत्नीच्या नावे मालमत्ता खरेदी केली असेल आणि पत्नीचे कोणतेही स्वतंत्र उत्पन्न नसल्यास ती मालमत्ता पतीच्या कमाईतून खरेदी केली गेली होती आणि कुटुंबाच्या फायद्यासाठी मिळवली गेली, असे न्यायालय गृहीत धरू शकते.

तसेच भारतीय पुरावा कायद्याच्या कलम 114 चा हवाला देत न्यायालयाने पुढे सांगितले की, अशा परिस्थितीत मालमत्ता कौटुंबिक मालमत्ता मानली जाऊ शकते. मात्र, पत्नीच्या नावे खरेदी केलेली प्रत्येक मालमत्ता आपोआप कौटुंबिक मालमत्ता बनते असं गरजेचं नाही. प्रकरणातील तथ्ये आणि उपलब्ध पुरावे यांचाही विचार केला जाईल.

Maharashtra TimesSBI BSBD Withdrawal Charges: SBI खात्यातून कॅश विड्रॉवलचे नवीन नियम; चारपेक्षा जास्‍त वेळा व्‍यवहार केल्‍यास ग्राहकांना भुर्दंड, फ्री लिमिटनंतर शुल्क लागणार

पत्नीच्या स्वतःच्या कमाईतून खरेदी केली असेल तर

त्याचवेळी मालमत्ता पत्नीच्या स्वतःच्या उत्पन्नातून खरेदी केली असल्याचे सिद्ध केल्यास परिस्थिती वेगळी असेल, असेही न्यायालयाच्या निर्णयामधून स्पष्ट होते. अशा मालमत्तेवर पत्नीचा वैयक्तिक हक्कांबाबत दावा अधिक मजबूत होईल, तर पती आपल्या पत्नीसाठी मालमत्ता खरेदी करून भेट देऊ शकतो, ज्यामुळे पत्नी मालमत्तेची पूर्ण मालक बनते न्यायालयाने असेही म्हटले. पण, संबंधित तथ्ये आणि पुरावे न्यायालयासमोर सादर करणे अनिवार्य आहे.

पतीच्या मालमत्तेत पत्नीला हिस्सा मिळतो का?

दुसरीकडे, अशा प्रकरणातील आणखी एक महत्त्वाचा फरक समजून घेतला पाहिजे. पतीच्या स्वतःच्या कमाईतून खरेदी केलेली मालमत्ता आणि वडिलोपार्जित किंवा संयुक्त कुटुंबाची मालमत्ता यांच्याबाबत नियम वेगवेगळे असू शकतो. पतीच्या मृत्यूनंतर वारसा हक्काचे नियम लागू होतात, पत्नी आणि इतर कायदेशीर वारसांचे हक्क, त्यावेळी मृत्युपत्र आहे की नाही आणि मालमत्तेचे स्वरूप, यावर अवलंबून असतात.

त्यामुळे, पत्नीच्या नावावर खरेदी केलेली प्रत्येक मालमत्ता केवळ पत्नीचीच असेल किंवा सर्व स्थितीत संपूर्ण कुटुंबाची असेल, असे म्हणणे योग्य ठरणार नाही. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या निर्णयात गृहिणी पत्नीने पतीच्या कमाईतून खरेदी केलेली मालमत्ता काही विशिष्ट परिस्थितीत कौटुंबिक मालमत्ता म्हणून मानण्याच्या शक्यतेवर भाष्य केले आहे.