Headlines

Property Rights: पतीने आईच्या नावावर केलेली मालमत्ता खरंच घटस्फोटित पत्नीला मिळत नाही? परिस्थितीत हिस्सा मिळू शकतो समजून घ्या – divorce property rights in india husband transferred assets before divorce what law says wife can do


Wife Property Rights India: अनेक वर्षांचे नातेसंबंध, महिन्याभराची न्यायालयीन कार्यवाही आणि त्यानंतर असा निर्णय, जो तुमच्या पायाखालची जमीन हादरवून टाकेल. आपल्या देशात कायदेशीर चौकट तयार केल्या गेल्या आहेत ज्या पत्नीला महत्त्वपूर्ण संरक्षण प्रदान करतात, ज्यामुळे घटस्फोटाच्या वादादरम्यान पती गुपचूप मालमत्ता हस्तांतरण करू शकत नाही.

फसवणुकीने होणारे मालमत्ता हस्तांतरण किंवा न्याय्य हक्कांना बगल देण्याच्या उद्देशाने जॉईंट अकाउंट रिकामी करण्याचे प्रयत्न रोखण्यासाठी न्यायालयांना हस्तक्षेप करण्याचा अधिकार आहे. सामान्यतः पतींची त्यांच्या मालमत्तेवर मालकी असली तरी, जेव्हा पोटगीचा प्रश्न येतो तेव्हा विशेषाधिकार मर्यादित होतो. घटस्फोटाच्या प्रकरणातील सर्वात महत्त्वाच्या प्रश्नांपैकी एक म्हणजे की नवरा मालमत्ता आपल्या आईच्या नावावर हस्तांतरित करून खरोखरच कायद्याला बगल देऊ शकतो का? भारतीय दंड संहिता, BNS, आणि हिंदू विवाह कायदा पत्नीला रिकाम्या हाती वाऱ्यावर सोडू शकतो का? तुम्हालाही वाटत असेल की कागदपत्रांच्या गोंधळात न्याय मिळणार नाही, तर थांबा, कारण कायद्यातील गुंतागुंत वेगळंच चित्र दाखवते.

Maharashtra TimesWomen’s Property Rights: पत्नीला माहेरून मिळालेल्या संपत्तीवर पती अन् सासरच्यांचा किती हक्क? जाणून घ्या नियम, नाहीतर अडचणीत याल

घटस्फोट आणि मालमत्ता हस्तांतरण

1. हिंदू विवाह कायदा, 1955

एखादा जोडीदार घटस्फोट प्रक्रियेदरम्यान किंवा अगदी आधी जाणीवपूर्वक मालमत्ता हस्तांतरित करतो, तेव्हा कायद्यानुसार त्याला दुष्ट हेतू मानले जाते. हिंदू विवाह कायदा, 1955 च्या कलम 24 आणि 25 नुसार पत्नीला पोटगीचा (अंतरिम आणि कायमस्वरूपी पोटगी) अधिकार दिला गेला आहे.

घटस्फोटाच्या प्रक्रियेदरम्यान ‘सगळं दान केल्यामुळे किंवा विकल्यामुळे आपल्याकडे काहीही शिल्लक नाही’, असा पती दावा करत असल्यास न्यायालय त्याची जीवनशैली आणि मागील आर्थिक नोंदीचा तपास करण्याचे आदेश देऊ शकतो.

Maharashtra TimesDMart New Business Strategy: झेप्टो, ब्लिंकिटमुळे स्वस्ताई काम करेना! डिमार्टची नवीन शक्कल बदलणार का डिलिव्हरी ॲपचा गेम
मालमत्तेचे हस्तांतरण केवळ पत्नीला कायदेशीर हक्कांपासून वंचित ठेवण्याच्या उद्देशाने केले गेले होते का? याची न्यायालय खातरजमा करू शकतो. अशा परिस्थितीत हस्तांतरण झाले असले किंवा नसले तरी, न्यायालय पतीच्या कमाईची क्षमता आणि काल्पनिक उत्पन्नाच्या आधारावर पोटगी निश्चित करू शकते. पत्नीला मिळणारी पोटगी केवळ मालमत्तेवरच नव्हे तर पतीची क्षमता आणि वास्तविक आर्थिक स्थितीवरही अवलंबून असते.

भारतीय न्यायिक संहिता (बीएनएस) आणि फसवणूक

कलम 316 (विश्वासघात) : संयुक्त मालकीची मालमत्ता असेल किंवा त्यात पत्नीचा हितसंबंध असेल आणि पतीने फसव्या पद्धतीने संपत्ती हडप केली तर, हे प्रकरण फौजदारी विश्वासघात ठरू शकते.

· कलम 318 (फसवणूक): कायदेशीर प्रक्रियेपासून संरक्षण करण्याच्या उद्देशाने मालमत्ता हेतुपुरस्सर लपवली गेली किंवा दुसऱ्याच्या नवे हस्तांतरित केली गेली, तर याला फसवणूक मानले जाईल. लक्षात घ्या की घटस्फोटाच्या प्रक्रियेदरम्यान मालमत्तेचे हस्तांतरण करणे पतीच्या विरोधात जाणारे कायदेशीर धोक्याचे चिन्ह आहे.

अशा परिस्थितीत, न्यायप्रक्रियेत अडथळा आणणारे कोणतेही विक्रीपत्र किंवा दानपत्र अवैध घोषित करणारी कार्यवाही सुरू करण्याचे निर्देश देण्याचा कौटुंबिक न्यायालयाला अधिकार आहे.

Maharashtra TimesSEBI New Rule: सेबीने बदलले म्युच्युअल फंडचे नियम, गुंतवणूकदारांना कसा मिळेल फायदा? व्यक्तीच्या मृत्यूनंतर पैसे काढण्याची प्रोसेस बदलली

पोटगी आणि सर्वोच्च न्यायालयाची भूमिका

पतीने घटस्फोटापूर्वी किंवा दरम्यान मालमत्ता आपल्या आई किंवा इतर कोणत्याही नातेवाईकाच्या नावावर हस्तांतरित केली तरी, पत्नीचे हक्क पूर्णपणे संपुष्टात येत नाही. केवळ पोटगी आणि भत्ता न देण्याच्या उद्देशाने मालमत्ता फसवणुकीने हस्तांतरित केली गेली असेल, तर न्यायालय त्या व्यवहाराची चौकशी करू शकते. 2020 मधील रजनीश विरुद्ध नेहा या प्रकरणातील ऐतिहासिक खटल्यामध्ये ‘पती आणि पत्नी दोघांनाही त्यांच्या मालमत्ता आणि उत्पन्नाचे तपशीलवार प्रतिज्ञापत्र’ देण्याचे सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिलेले. यानुसार पतीने खोटं सांगितले की मालमत्ता आईच्या नावावर दाखवली, तर तो शपथभंगाचा दोषी ठरेल.

बेनामी व्यवहार आणि गिफ्ट डीडच्या वेळेची आता न्यायालयांकडून बारकाईने तपास करतात. वैवाहिक वाद सुरू होण्याच्या सुमारास हस्तांतरण झाले असेल, तर संशयास्पद मानले जाईल.

प्रियांका वर्तक

लेखकाबद्दलप्रियांका वर्तकप्रियांका वसंत वर्तक या 2023 पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये डिजिटल कन्टेन्ट प्रोड्युसर पदावर काम करत आहेत. 2015 पासून डिजिटल मीडियामध्ये विविध वेबपोर्टलसाठी काम केले असून क्रीडा आणि बिझनेस यासारख्या विषयांवरील बातम्यांचं लेखन आणि कव्हरेज करायचा दहा वर्षाचा अनुभव आहे.

मुंबई विद्यापीठातून बीएमएम आणि मग मास्टर्सच शिक्षण घेतल्यावर त्यांनी एनडीटीव्हीमध्ये या अग्रगण्य वृत्तवाहिनीमध्ये इंटर्नशीप केली. मग एनबीटी या वृत्तपत्रात शिक्षण आणि मनोरंजन डेस्कवर काम केले. इथे काम करताना त्यांनी शिक्षण व मनोरंजनाशी संबंधित मुलाखती घेतल्या. त्यानंतर 2016 मध्ये फ्री प्रेस जर्नल या इंग्रजी वृत्तपत्रातील ऑनलाईन डिपार्टमेंटमध्ये तीन वर्ष केले जिथे त्यांनी मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडींचे कव्हरेज सुरु करून तीन वर्षाचा अनुभव घेतला.

पत्रकारिता क्षेत्रात 15 वर्षांचा अनुभव
2019 मध्ये लेट्सली या मराठी वेबसाईटसाठी क्रीडा क्षेत्रात न्यूज रायटर म्हणून काम केले. मे 2023 मध्ये महाराष्ट्र टाइम्समध्ये सर्वप्रथम कन्सल्टंट म्हणून तीन महिन्यांचा अनुभव घेतला. या दरम्यान बिझनेस आणि क्रीडा क्षेत्रातील घडामोडी जसे की आयपीएल आणि वेगवेगळ्या क्रीडा मालिका तसेच बिझनेसमध्ये वेतन आयोगासह आंतरराष्ट्रीय घडामोडी कव्हर केल्या.

2023 मध्ये फुल-टाइम्स बिझनेस कव्हरेज सुरु केले. व्यापार कार्यक्षेत्रातील बातमी आणि विश्लेषण लेखांना प्राधान्य दिलं. आंतराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय शेअर मार्केट, रिअल इस्टेट आणि व्यापार उद्योगाशी संबंधित घडामोडी आदी विषयांवर लेख मालिका लिहिले. केंद्रीय अर्थसंकल्प, अमेरिकेसोबत ट्रेड डील आणि त्यांचा जनसामान्यांसोबत भारतीय अर्थव्यवस्थेवर होणार परिणाम यांचे विश्लेषण केले.

शैक्षणिक पात्रता
​प्रियांका वर्तक यांनी 2014 मध्ये विद्याविहार येथील एस.के. सोमैया महाविद्यालयातून मीडिया व जर्नालिसममधून पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले. महाविद्यालयीन काळात बॅडमिंटन आणि क्रिकेट यासारख्या खेळात भाग घेऊन पारितोषिके जिंकली. खेळ, चित्रपट, संगीत, पर्यटन यामध्ये प्रियांका यांना रुची आहे.आणखी वाचा



Source link

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत