Pravin Goyal on Siya Goyal Ketan Agarwal Wedding Expenses in Udaipur after Groom Dies in Pune Lohagad Trek Crime News; ना 17 करोडचा महाल, ना दोन चार्टड विमानं बूक; माझी ऐपत 4 कोटींची, वऱ्हाडींवर पर कपल 81 हजार खर्च, सियाच्या बाबांचा हिशोब
Pravin Goyal on Siya Goyal Ketan Agarwal Wedding Expenses in Udaipur after Groom Dies in Pune Lohagad Trek Crime News; ना 17 करोडचा महाल, ना दोन चार्टड विमानं बूक; माझी ऐपत 4 कोटींची, वऱ्हाडींवर पर कपल 81 हजार खर्च, सियाच्या बाबांचा हिशोब
Pravin Goyal on Siya Ketan Wedding Expense : केतन-सियाच्या लग्नासाठी राजस्थानमध्ये १७ कोटींचा महाल निवडला असून, दोन चार्टर्ड विमानं बूक झाल्याच्या चर्चेत अजिबात तथ्य नसून माझी जास्तीत जास्त ५ कोटींपर्यंत खर्च करण्याची ऐपत होती, असं सियाचे पिता प्रवीण गोयल म्हणाले
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
पुणे : केतन अग्रवाल आणि सिया गोयल यांच्या विवाहासाठी राजस्थानमध्ये १७ कोटींचा महाल निवडला असून, दोन चार्टर्ड विमानं बूक झाल्याचं वृत्त समोर आलं होतं. परंतु यात अजिबात तथ्य नसून माझी जास्तीत जास्त ५ कोटींपर्यंत खर्च करण्याची ऐपत होती, असं सियाचे पिता प्रवीण गोयल यांनी म्हटलं आहे. सियाला अटक झाल्यानंतर प्रवीण गोयल उच्च रक्तदाबाच्या त्रासाने रुग्णालयात दाखल आहेत. तिथेच त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना हा दावा केला.
विमानाचं बूकिंग जुलै-ऑगस्टमध्ये करण्याचं आम्ही ठरवलं होतं. आम्हाला ट्रॅव्हल एजंटनी काही पर्याय दिले होते. पण त्यातला मुंबई-उदयपूरचा ऑप्शन जमला नाही. कारण आम्हाला पुण्याहून रात्री दोन-अडीच वाजता निघावं लागलं असतं. आमची पाहुणे मंडळी थकली असती. दुसरा पर्याय होता पुणे-उदयपूरचा, पण त्याचा खर्च जास्त होता. माझ्या ऐपतीबाहेर जात होता, कारण मला कमी बजेटमध्ये करायचं होतं, असं गोयल म्हणाले.
पंकजाताईंवर गरळ ओकणारे नेते नको; माजलगावात येऊन प्रीतम मुंडेंचा प्रकाश सोळंकेंवर निशाणा
तिसरा पर्याय होता, पुणे-अहमदाबाद विमान. तिथून कारमध्ये दोन दोन जोडपी बसवून उदयपूरच्या अनंत रिसॉर्टला रवाना करायची होती. ३-४ तासांचा रस्ता होता. कुठलंही चार्टर्ड विमान बूक झालेलं नाही. मी स्वस्त किमती पाहून २०-२५ तिकिटं काढणार होतो. मी जास्तीत जास्त ४ कोटी खर्च करु शकतो. माझ्या बहिणीने सांगितलं की मुलगी चांगल्या घरात जात आहे, खुश राहील, ५-२५ बघू नकोस. मग मी म्हटलं ठीक आहे, ५-५० बघत नाही, पण ५ कोटीपर्यंत खर्च करायचं ठरवलं, असं स्पष्टीकरण प्रवीण गोयल यांनी दिलं.
लेखकाबद्दलअनिश बेंद्रेअनिश बेंद्रे हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये सहाय्यक वृत्त संपादक या पदावर कार्यरत आहेत. ते मटा ऑनलाईनमध्ये २०२२ पासून कार्यरत आहेत. टीव्ही आणि डिजिटल अशा दोन्ही माध्यमांचा एकत्रित १३ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्यांना राजकारण, समाजकारण यासोबतच मनोरंजन, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचे लेखन करण्याचा अनुभव आहे.
पत्रकारितेतील अनुभव
अनिश बेंद्रे यांनी टीव्ही माध्यमातून पत्रकारितेला सुरुवात केली. एबीपी माझा वृत्तवाहिनीत सर्वप्रथम त्यांना प्रॉडक्शन आणि टिकर विभागात काम करण्याची संधी मिळाली. मराठी भाषेवरील प्रभुत्वामुळे त्यांनी लिहिलेल्या आकर्षक हेडलाईन्स सहकाऱ्यांसह प्रेक्षकांची वाहवा मिळवून गेल्या. त्यानंतर २०१५ मध्ये एबीपी माझा वृत्तवाहिनीच्याच वेब टीमसोबत त्यांनी डिजिटल विश्वात कामाचा श्रीगणेशा केला. डिजिटल माध्यमासाठी लेखन करण्याचं आव्हान पेलताना त्यांनी लक्षवेधी मथळे लिहिण्याचं कसब आत्मसात केलं. एबीपी समुहासोबत जवळपास ६ वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी विविध जबाबदाऱ्या पार पाडल्या. ट्रेनी, असिस्टंट प्रोड्युसर पदापासून प्रोड्युसरपर्यंत संधी मिळवली. मराठी भाषा दिवस, आंतरराष्ट्रीय पुरुष दिन, विवाहबाह्य संबंधावरील सुप्रीम कोर्टाचा निर्णय, वर्ल्ड टीव्ही डे यासारख्या विषयांवर त्यांनी केलेल्या डॉक्युमेंट्रीही विशेष गाजल्या.
पुढे टीव्ही९ मराठी वृत्तवाहिनीच्या वेबसाईटसोबत त्यांनी चार वर्ष काम केलं. यावेळी त्यांच्यातील नेतृत्व गुणांना वाव मिळाला. मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना बातमी लेखनाचं तंत्र शिकवण्यासोबतच त्यांनी सहकाऱ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन केले. टीमसोबत समन्वय राखणे, प्रत्येकातील गुण हेरुन त्यानुसार कामाची विभागणी करणे यामध्ये त्यांचा हातखंडा आहे. कारकिर्दीच्या १३ वर्षांपैकी दहाहून अधिक वर्ष त्यांनी डिजिटल विश्वात काम केलं आहे. या काळात लोकसभा-विधानसभा-महापालिका यासारख्या विविध निवडणुकांचा त्यांनी बारकाईने अभ्यास केला आहे.
अनिश बेंद्रे २०२२ पासून महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनसोबत काम करत आहेत. सुरुवातीपासूनच मॉर्निंग शिफ्ट इन्चार्ज म्हणून काम करताना त्यांनी सहाय्यक वृत्त संपादक पदापर्यंत उन्नती मिळवली आहे. बातम्यांच्या सखोल विश्लेषणासोबतच बातमीमागील बातमी जाणून घेण्यात त्यांना रस आहे. बातमीचे विविध पैलू जाणून घेत सोप्या भाषेत ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. मानसशास्त्र विषयातील अभ्यासामुळे गुन्हेगारी बातम्या उलगडून सांगण्यात त्यांना मदत होते. याशिवाय मटा मॉर्निंग बुलेटिनच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी त्यांनी स्वीकारली होती. तसंच मटा पत्रकार परिषद या निवडणूक विषयक कार्यक्रमाची संकल्पना-संयोजन आणि सूत्रसंचालनही त्यांनी केले होते. निवडणुकांच्या निमित्ताने त्यांनी विविध मान्यवरांच्या मुलाखती घेतल्या, सखोल राजकीय विश्लेषण केले, तसेच सामान्य नागरिकांशी संवाद साधणारे काही कार्यक्रमही व्हिडिओ टीमसोबत केले.
शैक्षणिक पात्रता
अनिश बेंद्रे यांनी २०१२ मध्ये रुपारेल महाविद्यालयातून मानसशास्त्र विषयात पदवी संपादन केली. त्यानंतर झेवियर्स महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले. मराठीसोबतच हिंदी, इंग्रजी, संस्कृत आणि जपानी भाषेचाही त्यांनी अभ्यास केला आहे.… आणखी वाचा