Prathamesh Shirish Chaudhary has been Elected as the Deputy Mayor of Nandurbar Municipality; अमेरिकेत MBA ते आता थेट उपनगराध्यक्षपदी निवड, वडिलांची दुसऱ्या तालुक्यात सत्ता स्थापन; इकडं पोरानं जन्मभूमीमध्ये झेंडा रोवला
Prathamesh Shirish Chaudhary has been Elected as the Deputy Mayor of Nandurbar Municipality; अमेरिकेत MBA ते आता थेट उपनगराध्यक्षपदी निवड, वडिलांची दुसऱ्या तालुक्यात सत्ता स्थापन; इकडं पोरानं जन्मभूमीमध्ये झेंडा रोवला
Nandurbar Prathamesh Chaudhary : नंदुरबार नगरपालिकेमध्ये माजी आमदार शिरीष हिरालाल चौधरी यांचे सुपुत्र प्रथमेश हिरालाल चौधरी हे उपनगराध्यक्षपदी विराजमान झाले आहेत.
नंदुरबार प्रथमेश चौधरी उपनगराध्यक्ष(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
महेश पाटील, नंदुरबार : नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एकीकडे अमळनेर नगरपरिषदेत शिंदे शिवसेनेचे माजी आमदार शिरीष हिरालाल चौधरी यांच्या पॅनेलनं विजय मिळवत नगरपरिषदेवर सत्ता स्थापन केली, आणि तिथे डॉ. परीक्षित बाविस्कर हे नगराध्यक्षपदाच्या खुर्चीवर विराजमान झाले. तर दुसरीकडे चौधरी यांचे सुपुत्र प्रथमेश शिरीष चौधरी नंदुरबार नगरपालिकेत उपनगराध्यक्ष म्हणून विजयी झाले आहेत. उच्चशिक्षित असलेले उमेदवार प्रथमेश चौधरी यांनी काका बापूसाहेब हिरालाल चौधरी आणि वडिलांच्या पावलांवर पाऊल ठेवत आपल्या जन्मभूमीत झेंडा रोवत धुरंधर ठरले आहेत.
नगराध्यक्षपदी रत्ना रघुवंशी विजयी
नंदुरबारचे सुपुत्र माजी आ.शिरीष चौधरी यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर शिंदेच्या सेनेत प्रवेश केला. अमळनेर नगपरिषद निवडणुकीत त्यांच्या नेतृत्वात झालेल्या निवडणुकीत नगराध्यक्षसह 12 नगरसेवक निवडून आणले. तर दुसरीकडे त्यांचे सुपुत्र प्रथमेश शिरीष चौधरी हे नंदुरबार नगरपालिकेमधून शिंदे शिवसेनेच्या तिकिटावर विजयी झाले होते. नंदुरबार पालिकेत नगराध्यक्षपदी शिंदे शिवसेनेच्या रत्ना रघुवंशी या विजयी झाल्या. तर 41 जागांपैकी 29 शिंदे शिवसेना, 8 भाजपा व 4 जागांवर एमआयएमने विजय मिळवला होता. नंदुरबार पालिकेच्या उपनगराध्यक्ष तसेच स्वीकृत पदांसाठी आज विशेष सभेचे आयोजन पालिका सभागृहात करण्यात आलं होतं. BMC Election : लोकसभा-विधानसभेला पराभव, महापालिकेत विजयाची वाट सोपी की बिकट? यामिनी जाधवांबाबत मटा ऑनलाईन पोलमध्ये 75 टक्के युजर्स म्हणतात…
अमेरिकेतून MBA पर्यंतचं शिक्षण
उपनगराध्यक्ष पदासाठी शिंदे शिवसेनेतर्फे प्रथमेश चौधरी यांचा तर भाजपातर्फे नीता सतीश मराठे यांनी उमेदवारी दाखल केली होती. उपनगराध्यक्ष पदासाठी निवडणूक घेण्यात आली. यात प्रथमेश चौधरी यांना 30 तर नीता मराठे यांना आठ मते मिळाली. या निवडणुकीत एमआयएम तटस्थ राहिला. पीठासन अधिकारी यांनी प्रथमेश चौधरी यांना विजयी जाहीर केले. चौधरी कुटुंबातील तिसऱ्या पिढीने राजकारणात प्रवेश करत उपनगराध्यक्षपदी विराजमान झाले आहे. प्रथमेश चौधरी यांनी अमेरिकेतून MBA पर्यंतचं शिक्षण घेतलं आहे. निवडीनंतर डीजे तसेच ढोल ताशांच्या गजरात एकच जल्लोष करण्यात आला.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा