Prajakta Kulkarni : मराठी अभिनेत्री प्राजक्ता कुलकर्णी यांनी ‘दामिनी’ सिनेमातील शुटिंगचा अनुभव सांगितला आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – ‘ ठरलं तर मग ‘ फेम प्राजक्ता कुलकर्णी यांनी आजवर अनेक मालिकांमध्ये आणि सिनेमांमध्ये काम केलं आहे. प्राजक्ता यांनी हिंदी सिनेमामध्येही भूमिका साकारल्या आहेत. १९९३ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘दामिनी’ या सिनेमामध्ये प्राजक्ता यांनी उर्मीची भूमिका साकारलेली. या सिनेमात दामिनीचा दीर उर्मीवर अत्याचार करतो, असा सीन आहे. नुकत्याच एका मुलाखतीमध्ये प्राजक्ता यांनी या सीनच्या शुटिंगचा अनुभव सांगितला आहे.
प्राजक्ता कुलकर्णी यांनी सांगितला अनुभव
नुकत्याच एका मुलाखतीमध्ये प्राजक्ता यांना ‘दामिनी’ सिनेमाच्या शुटिंगचा अनुभव विचारण्यात आला. त्यावर प्राजक्ता म्हणाल्या की, ‘बापरे! माझ्यावर खरंच खूप प्रेशर होतं. राकेश त्या मुलीवर अतिप्रसंग करतो असा तो सीन होता आणि ती भूमिका अभिनेता अश्विन कौशल साकारत होता. हा सीन खरंतर आम्ही फार नंतर शूट केला. त्याआधी त्याचं माझ्या मागे लागणं वगैरे सुरू होतं. ते दिग्दर्शकाच्या लक्षात आलं होतं की, हा जरा माझ्या मागे लाळ गाळतोय. ते मला म्हणाले होते, बघ प्राजक्ता तुला जराही घाबरायचं नाहीये. तो जरा काही जास्त करेल तर, मी इथेच आहे, त्याला बरोबर बघतो. याशिवाय त्यांनी अश्विनला आधीच सांगून ठेवलं होतं, जेवढं पाहिजे तेवढं करायचं, उगाच जास्तीचं काही सीनमध्ये करायचं नाही.’
‘खरं सांगू का, तो सीन शूट करणं वेगळं. पण, आपण आजकाल जे ऐकतोय की, अतिप्रसंगाच्या बातम्या वाचतो, हे सगळं पाहून अस्वस्थ व्हायला होतं. हेल्पलेस होणं म्हणजे काय असतं, तो अनुभव मी त्या सीनचं शूटिंग करताना घेतला. आताही हे सांगताना अंगावर काटा येतोय. खरंच त्या सगळ्या मुलींना न्याय मिळाला पाहिजे. कधीतरी कायदाही खूप सौम्य आहे असं वाटतं. या अशा आरोपींनी तिथल्या तिथे शिक्षा दिली पाहिजे.’ असं प्राजक्ता यांनी सांगितलं. ‘अभिजात मराठी’ला दिलेल्या मुलाखतीमध्ये प्राजक्ता बोलत होत्या. Naseem Mukri : वडिलांच्या अंत्यसंस्काराला आले नाहीत, विचारपूसही नाही, इंडस्ट्रीतील मैत्री अशीच; बिग बींवर सुप्रसिद्ध अभिनेत्याच्या लेकीची नाराजी दरम्यान, ‘दामिनी’ या सिनेमाबद्दल सांगायचं तर या सिनेमात मिनाक्षी शेषाद्री, सनी देओल, अमरीश पुरी, ऋषी कपूर, परेश रावल, टिनू आनंद यांसारख्या कलाकारांच्या मुख्य भूमिका होत्या.
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा