Headlines

Pooja Bhatt : बॉयफ्रेंडमुळे नाकारला गाजलेला सिनेमा, इंडस्ट्री सोडण्याचा घेतलेला निर्णय, वडिलांनी बोलणं टाकलं; पूजा भट्टने सांगितला किस्सा


Pooja Bhatt : पूजा भट्टने बॉलिवूडचा गाजलेला सिनेमा नाकारला होता. त्यामुळे तिच्या वडिलांनी तिच्याशी बोलणं बंद केलं होतं. याबद्दल अभिनेत्रीनं एका मुलाखतीमध्ये सांगितलं आहे.

Pooja Bhatt
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – अभिनेत्री पूजा भट्टने नुकत्याच एका मुलाखतीमध्ये सांगितलं की, तिचा पहिला चित्रपट ‘डॅडी’ तिला इंडस्ट्रीमध्ये लाँच करण्यासाठी बनवला नव्हता. पूजानं सांगितलं की, तिच्या पहिल्या चित्रपटानंतर तिनं चित्रपटांमध्ये करिअर न करण्याचा निर्णय घेतला होता. म्हणूनच, जेव्हा तिच्या कुटुंबानं तिला ‘आशिकी’ मधील भूमिकेची ऑफर दिली, तेव्हा तिनं स्पष्टपणे नकार दिला.

‘सायरस सेज’ या यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये पूजा भट्ट म्हणाली, ‘माझा पहिला चित्रपट मला लाँच करण्यासाठी बनवला नव्हता. माझ्या वडिलांनी मला सांगितलं की त्यांच्याकडे एका १७ वर्षांच्या मुलीची कथा आहे आणि त्यावेळी मी सुद्धा १७ वर्षांची होते. ते म्हणाले की, तू त्या भूमिकेसाठी अगदी योग्य आहे आणि मला ती करायला आवडेल का असं विचारलं. मी त्यांना सांगितलं की, मला विचार करू द्या.’

Maharashtra TimesReva Kaurase : 3 दिवस ऑडिशन, निर्मात्याची घाणेरडी मागणी, खचलेली ‘बिग बॉस मराठी’ फेम अभिनेत्री; सांगितला प्रसंग
पूजाने सांगितलं की, चित्रपटसृष्टी हे सोपं क्षेत्र नाही हे तिला सुरुवातीपासूनच माहीत होतं. तिनं काही काळासाठी आर्किटेक्ट होण्याचा विचार केला होता आणि अंतराळवीर होण्याचं स्वप्नही पाहिलं होतं.

महेश भट्ट यांनी पूजा भट्टला निर्णय घेण्यासाठी २४ तास दिले

महेश भट्ट यांनी पूजा भट्टला ‘डॅडी’ चित्रपट करण्याबद्दल विचार करण्यासाठी फक्त २४ तास दिले होते. २४ तासांनंतर जेव्हा ते पूजाशी पुन्हा बोलले, तेव्हा त्यांनी तिला सांगितलं की, जर तिला हा चित्रपट करायचा नसेल, तर ते त्या भूमिकेसाठी डिंपल कपाडिया यांची मुलगी, ट्विंकल खन्नाला संपर्क साधू शकतात. हे ऐकून पूजाने लगेचच चित्रपट करण्यास होकार दिला. या घटनेची आठवण सांगताना पूजा म्हणाली, ‘ते मला म्हणाले, ‘म्हणजे तुला अभिनय करायचा नाहीये, पण ही भूमिका दुसऱ्या कोणाला मिळावी असंही तुला वाटत नाही. तू याच इंडस्ट्रीसाठी बनली आहेस.’ त्यानंतर मी चित्रपट करायचा ठरवला.’

Maharashtra TimesGeeta Kapoor : पोटच्या लेकाकडून छळ, जेवणाचेही केले हाल, घर विकून पसार; मुलाच्या आठवणीत सुप्रसिद्ध अभिनेत्री झालेली बेहाल, अखेर दुर्दैवी अंत

पूजाने तिच्या बॉयफ्रेंडमुळे ‘आशिकी’ सिनेमाला नकार दिला

पूजाने सांगितलं की, ‘डॅडी’ सिनेमानंतर तिला ‘आशिकी’मध्ये मुख्य भूमिकेची ऑफर आली होती. तिचे काका, मुकेश भट्ट, साइनिंग अमाऊंट घेऊन तिच्या घरी आले होते, पण तिनं तो चित्रपट करण्यास नकार दिला.

Maharashtra TimesKamlesh Sawant : ‘माझे ७० लाख बुडाले आहेत’, मराठी अभिनेते कमलेश सावंत यांचा दावा, सांगितला किस्सा
पूजा त्यावेळी एका मुलासोबत रिलेशनशिपमध्ये होती आणि तिला वाटलं की, त्याच्या गर्लफ्रेंडनं अभिनेत्री व्हावं असं त्याला वाटत नाही. त्यामुळे, तिनं चित्रपटांपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला. पण, पूजाच्या बॉयफ्रेंडनं कधीही तिला इंडस्ट्री सोडण्याचा सल्ला दिला नाही. जेव्हा पूजाने ‘आशिकी’ सिनेमाला नकार दिला, तेव्हा मुकेश भट्ट यांनी महेश भट्ट यांना फोन करून सांगितलं, ‘मुलगी वेडी झाली आहे, ती चित्रपट नाकारत आहे.’ पूजा म्हणाली, जेव्हा ती महेश भट्ट यांच्याशी बोलली, तेव्हा काही वेळ फोनवर फक्त त्यांच्या दीर्घ श्वासाचा आवाज येत होता. ते खूप संतापले होते. ते म्हणाले, ‘तू तुझ्या आयुष्यातली सर्वात मोठी चूक करत आहेस.’

Onkar Raut Celebrity Corner : टाइमपास ते महाराष्ट्राची हास्यजत्रा…ओंकार राऊतसोबत खास गप्पा

इतकंच नाही, तर महेश भट्ट जवळपास दोन आठवडे पूजाशी बोललेही नाहीत. नंतर, जेव्हा पूजा ‘आशिकी’च्या सेटवर आली, तेव्हा तिनं आपला विचार बदलला. त्यानंतर तिनं चित्रपटांमध्ये परतण्याचा निर्णय घेतला आणि ‘दिल है की मानता नहीं’ मध्ये आमिर खानसोबत काम केलं.

तेजश्री कुलये

लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.

तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.

तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.

पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.आणखी वाचा