Pooja Bedi On Marriage : पूजा बेदीनं नुकत्याच एका मुलाखतीमध्ये लग्नाबद्दल आणि तिच्या साखरपुड्याबद्दल भाष्य केलं आहे.
(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
मुंबई – पूजा बेदीनं नुकत्याच एका मुलाखतीमध्ये तिच्या लग्नाबद्दल आणि रिलेशनशिपबद्दल भाष्य केलं आहे. अभिनेत्रीनं तिचा बॉयफ्रेंड माणेकसोबतच्या साखरपुड्याबद्दलही भाष्य केलं.
पूजा बेदी लग्नाबद्दल काय म्हणाली?
पूजा बेदीनं विकी लालवानीला दिलेल्या मुलाखतीमध्ये लग्नाबद्दल म्हणाली की, लग्न तिच्या स्वप्नांचा भाग नाही. ती स्वतःला विवाहित मानते. पूजा म्हणाली, गेल्या काही वर्षांत, लग्नाबद्दलचे माझे विचार खूप बदलले आहेत. मानेक कॉन्ट्रॅक्टरसोबत साखरपुडा होऊन आठ वर्षे झाली असली तरी, माझ्या लग्नाची कोणतीही योजना नाही. माझ्यासाठी साखरपुडा पुरेसा आहे. माझ्यासाठी लग्न गरजेचं नाही. लग्न केल्यानंतर दोन लोकांमध्ये सरकारची इन्व्हॉलमेंट होते. कागदपत्र बनवली जातात. मला ते सगळं नकोय.
Kshama Deshpande : सावित्रीबाई फुलेंची भूमिका मॅनिफेस्ट केलेली, अमोल कोल्हेंचा फोन, क्षमाची निवड
‘अधिकृतपणे लग्न न करताही मी स्वतःला विवाहित मानते’
पूजा पुढे म्हणाली, ‘माझं लग्न झालं होतं, माझा घटस्फोट झाला आणि मला दोन मुलं आहेत. माणेकचंही लग्न झालं, घटस्फोट झाला आणि त्याला मुलं आहेत. मालमत्तेसारख्या लहानसहान बाबींमध्येही सर्व काही खूप सोपं आहे. माझी मालमत्ता माझ्या मुलांना मिळेल आणि त्याची मालमत्ता त्याच्या मुलांना मिळेल. मी कमावते, तो कमावतो आणि आम्ही दोघेही स्वतंत्र आहोत. मला सुरक्षेसाठी त्याची गरज नाही. त्यालाही आर्थिक सुरक्षेसाठी माझी गरज नाही. पण आम्ही खूप आनंदी आहोत.’
Mehmood Son Lucky Ali : मेहमूद यांचा मुलगा, मीना कुमारींचा भाचा, ३ लग्न अन् घटस्फोट, नाही मिळालं खरं प्रेम; स्वतःच्या गाण्यानं चाहत्यांना लावतोय वेड याच मुलाखतीदरम्यान अभिनेत्रीला आदित्य पांचोलीसोबतच्या अफेअरबद्दल विचारलं असता, पूजानं त्यावर उघडपणे बोलण्यास नकार दिला. अभिनेत्रीनं सांगितलं की, आदित्यला दोन मोठी मुलं आहेत आणि त्यांच्या वडिलांच्या भूतकाळातील जुन्या गोष्टी वारंवार उकरून काढणं तिला योग्य वाटत नाही. पूजा म्हणाली की, जर कोणाला त्यांच्या नात्याबद्दल जाणून घ्यायचं असेल, तर ते इंटरनेटवर वाचू शकतात, परंतु सार्वजनिक ठिकाणी जुन्या गोष्टी वारंवार उकरून काढणं मुलांसाठी चांगलं नाही. अभिनेत्रीनं सांगितलं की, त्या नात्यातून ती एक धडा शिकली आहे. आयुष्यातील प्रत्येक गोष्ट एक आठवण आणि अनुभव बनते. लोक या अनुभवांमधून शिकतात आणि काळासोबत अधिक कणखर व शहाणे बनतात.
पूजा बेदीनं १९९४ मध्ये व्यावसायिक फरहान फर्निचरवालाशी लग्न केलं. या लग्नातून तिला आलिया आणि ओमर ही दोन मुलं आहेत. २००३ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर, फेब्रुवारी २०१९ मध्ये तिचा माणेक कॉन्ट्रॅक्टरसोबत साखरपुडा झाला. पूजा बेदीनं ‘जो जीता वोही सिकंदर’, ‘लुटेरे’, ‘आतंक ही आतंक’ आणि ‘फिर तेरी कहानी याद आयी’ यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.
लेखकाबद्दलतेजश्री कुलयेतेजश्री कुलये महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये गेल्या एक वर्षापासून ‘कन्सल्टन्ट’ या पदावर कार्यरत आहेत. डिजिटल पत्रकारितेची सुरुवात त्यांनी ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मधूनच केली. पत्रकारितेचा डिप्लोमा करत असताना त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये इंटर्नशिप करण्याची संधी मिळाली. इंटर्नशिप करताना बऱ्याच नव्या गोष्टी शिकायला मिळाल्या. वेब स्टोरी, फोटो गॅलरी करण्यात त्यांचा हातखंडा आहे. चार महिने इंटर्नशिप केल्यानंतर त्यांना महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्येच ‘कन्सल्टन्ट’ म्हणून नेमण्यात आलं.
तेजश्री यांना मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींसोबतच, चालू घडामोडी, क्राईम, राजकीय, फॅशन, या विषयांवर बातम्या लिहिण्याचा अनुभव आहे. वाचकांची दिशाभूल न करता, घडलेली घटना साध्या आणि सोप्या शब्दांत वाचकांपर्यंत कशी पोहोचेल, हाच कायम त्यांचा प्रयत्न असतो. मनोरंजन क्षेत्रातील नवनवीन बदल, गोष्टी जाणून घेण्यासाठी कायम त्यांची धडपड असते. अनेक कलाकारांच्या मुलाखती ऐकून त्याचा ‘सार’ वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा कायम प्रयत्न असतो. मालिकांची आवड असल्यामुळे त्यातील काही रंजक गोष्टी त्या सोप्या भाषेत वाचकांपर्यंत पोहोचवतात. एखादा सिनेमा किंवा वेब सीरिजवर वाद सुरू असेल तर तेजश्री स्वतः ती कलाकृती पाहून त्यानंतरच त्या विषयावर लेखन करतात.
तेजश्री यांना शाळा शिकत असतानाच मराठी भाषेची गोडी निर्माण झाली, त्यामुळे मराठी भाषेत काहीतरी करायचं, असं त्यांनी शालेय जीवनातच ठरवलं. म्हणूनच त्यांनी ‘मराठी साहित्य’ मध्ये पदवी (BA In Marathi Literature) घेण्याचा निर्णय घेतला. मराठी भाषेचा इतिहास, साहित्यशास्त्र, भाषाविज्ञान या विषयाचा गाढा अभ्यास त्यांनी केला. महाविद्यालयाच्या मासिकासाठी त्यांनी लेखन केलं आहे. ‘मराठी साहित्यात’ पदवी घेत असतानाच नाटक, कविता, कथा, कादंबरी, या कलाकृतींची गोडी अधिकच वाढली. तेजश्री यांनी वझे केळकर महाविद्यालयातून पदवी घेतली आहे. BA In Marathi Literature मध्ये त्यांनी दुसरा क्रमांक मिळवला आहे. पदवीनंतर तेजश्री यांनी CHM महाविद्यालयातून मराठी साहित्यातच पदव्युत्तर (MA In Marathi Literature) शिक्षण घेतलं. त्यावेळीही त्यांनी नाट्यशास्त्र, साहित्यशास्त्र या विषयांचा सखोल अभ्यास केला. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांचे क्लासेसही त्यांनी घेतले आहेत.
पदव्युत्तर शिक्षणानंतर तेजश्री यांनी मुंबई विद्यापीठाच्या गरवारे शिक्षण संस्थेतून मराठीमध्ये पत्रकारितेचा डिप्लोमा केला. पत्रकारितेच्या डिप्लोमामध्ये त्यांनी दुसरा क्रमांक पटकवला. पत्रकारितेच्या डिप्लोमानंतर तेजश्री यांचा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ मध्ये प्रवास सुरू झाला असून त्या रंजक आणि विश्वासार्ह माहिती वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करत आहेत.… आणखी वाचा