Police raid party in nagpur hotel arrest 3 youths red handed; तीन मित्रांचा प्लॅन, पण पोलिसांना मिळाली गुप्त माहिती; नामांकित हॉटेलमध्ये धाड टाकताच रंगेहाथ सापडले
Police raid party in nagpur hotel arrest 3 youths red handed; तीन मित्रांचा प्लॅन, पण पोलिसांना मिळाली गुप्त माहिती; नामांकित हॉटेलमध्ये धाड टाकताच रंगेहाथ सापडले
Nagpur Crime: गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करण्यात आली असून आरोपींकडून एमडी जप्त करण्यात आली आहे.
तीन मित्रांचा प्लॅन, पण पोलिसांना मिळाली गुप्त माहिती; नामांकित हॉटेलमध्ये धाड टाकताच रंगेहाथ सापडले(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
नागपूर : नागपूरच्या रामदासपेठ परिसरातील एका मोठ्या नामांकित हॉटेलमध्ये सुरू असलेल्या एमडी (मेफेड्रोन) ड्रग्ज पार्टीवर सीताबर्डी पोलिसांनी धाड टाकत गोंदिया येथील तीन तरुणांना रंगेहात अटक केली. आरोपींकडून १.६४० ग्रॅम एमडी पावडर जप्त करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाने तिन्ही आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली असून नागपुरातील एमडी पुरवठा साखळीचा तपास आता वेगाने सुरू आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मयंक महेश अग्रवाल (३०), पराग सुरेश अग्रवाल (३१) आणि कुणाल किशोर नखाते (२३) यांचा समावेश आहे. हे तिघेही गोंदिया येथील रहिवासी असून ड्रग्जचे सेवन करण्यासाठी नागपुरातील हॉटेलमध्ये थांबले होते.
सीताबर्डी पोलिसांना गुप्त माहिती मिळाली होती की, रामदासपेठेतील एका मोठ्या हॉटेलच्या खोलीत काही युवक एमडी ड्रग्जचे सेवन करत आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी हॉटेलवर अचानक छापा टाकला. खोलीची तपासणी केली असता तिन्ही आरोपी एमडीचे सेवन करताना आढळून आले. दरम्यान पोलिसांनी आरोपींकडून १.६४० ग्रॅम एमडी पावडर जप्त केली. प्राथमिक चौकशीत आरोपींनी सुमारे २.५ ग्रॅम एमडी खरेदी केल्याची कबुली दिली असून त्यातील काही प्रमाण त्यांनी सेवन केल्याचे समोर आले आहे. उर्वरित ड्रग्ज पोलिसांनी जप्त केले. आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. तसेच त्यांच्या रक्त आणि लघवीचे नमुने फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. वैज्ञानिक अहवालानंतर ड्रग्ज सेवनाबाबत अधिकृत पुष्टी होणार आहे.
सीताबर्डी पोलिसांनी आरोपींविरुद्ध एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करून त्यांना न्यायालयात हजर केले. सुनावणीनंतर न्यायालयाने तिन्ही आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली. या काळात आरोपींकडून सखोल चौकशी करून एमडीचा पुरवठादार, पुरवठ्याचा मार्ग आणि या अमली पदार्थांच्या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या इतर व्यक्तींचा शोध घेतला जाणार आहे.
दरम्यान, या कारवाईबाबत माहिती देताना पोलिस निरीक्षक सुहास राऊत यांनी सांगितले की, आरोपींनी नागपुरातील हॉटेलमध्ये अमली पदार्थांचे सेवन करण्यासाठी एमडीची व्यवस्था केली होती.
लेखकाबद्दलअक्षय शितोळेअक्षय शितोळे हे २०१८ पासून डिजिटल मीडियात कार्यरत असून सध्या मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. राज्यभरातील रिपोर्टर्ससोबत समन्वय साधत महाराष्ट्रातील गावगाड्यापासून मोठ्या शहरांमधील दैनंदिन घडामोडी मटा ऑनलाइनसाठी वेगवान आणि अचूक पद्धतीने मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. राजकीय बातम्यांमध्ये विशेष रस, बातम्यांमागची बातमी अर्थात घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेण्याचा सातत्याने प्रयत्न असतो. शेती आणि ग्रामीण जीवन हे जिव्हाळ्याचे विषय आहेत.
पत्रकारितेतील अनुभव
अक्षय शितोळे यांनी २०१८ मध्ये आपल्या पत्रकारितेतील प्रवासाचा प्रारंभ केला. सुरुवातीला न्यूज १८ लोकमत या वेबसाईटसाठी काम करताना ट्रेनी, सब एडिटर असा त्यांचा प्रवास राहिला. या कार्यकाळात प्रामुख्याने राजकीय बातम्यांसह स्थानिक पातळीवरील विविध घडामोडी कव्हर करण्याचे काम त्यांनी केले. २०१९ च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध राजकीय घडामोडींचा विश्लेषणात्मक आढावा घेतला. पुढे २०२१ मटा ऑनलाइनमध्ये डिजिटल कंटेट प्रोड्युसर म्हणून जॉइन झाले. यावेळी राजकीय बातम्यांसह विविध जिल्ह्यांतील प्रतिनिधींशी समन्वय ठेवत वेबसाईटसाठी वेगवान आणि अचूक बातम्या मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. तसंच मटा ऑनलाइनला २५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी महाराष्ट्राच्या दोन दशकांच्या सामाजिक वाटचालीचा आढावा घेणारा विशेष लेख लिहिला होता. “आरक्षणाचे लढे आणि तिढे, टोकदार जातीय अस्मिता ; २५ वर्षांत कसं ढवळून निघालं महाराष्ट्राचं समाजमन?” शीर्षकाखाली लिहिलेल्या या लेखाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मागील २५ वर्षांत जी सामाजिक स्थित्यंतरे झाली, ज्या घटनांनी महाराष्ट्राच्या सामाजिक रचनेवर परिणाम केला, अशा घडामोडींचा सविस्तर आढावा घेतला होता. २०२३ मध्ये त्यांनी लोकमत ऑनलाइनसोबतही काम केले असून ते २०२५ पासून पुन्हा मटा ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिलट कंटेंट प्रोड्युसर म्हणून रुजू झाले. विविध जिल्ह्यांतील रिपोर्टर्ससोबत संवाद साधत स्थानिक घडामोडींसह राज्यभरात महत्त्वाच्या बातम्या कव्हर करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. तसंच विश्लेषणात्मक व्हिडिओच्या माध्यमातून राजकीय घटनांचे अन्वयार्थ प्रेक्षकांसमोर उलगडण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. महाराष्ट्रात २०२५-२६ साली झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीदरम्यान त्यांनी विविध विश्लेषणात्मक व्हिडिओंच्या माध्यमातून राजकीय घडामोडींचं सोप्या शब्दांत विश्लेषण केले. तसंच महानगरपालिका निवडणूक निकालानंतर राजकीय विश्लेषकांची मुलाखत घेत या निवडणूक निकालाचा वेध घेण्याचा प्रयत्न केला.
मुलाखतीची लिंक: Uddhav Thackeray यांचा BMC मध्ये का झाला पराभव? सविस्तर विश्लेषण – https://youtu.be/8UeV9w1vwxQ?si=2sMWoovyx07EpjVU
शैक्षणिक पात्रता
अक्षय शितोळे यांनी १२ वी पर्यंतचे शिक्षण आपल्या मूळ गावी घेतले असून नंतर त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या रुईया महाविद्यालयातून पत्रकारितेतील पदवी (Bachelor of mass media) चे शिक्षण पूर्ण केले.… आणखी वाचा