Poladpur Mahabaleshwar Ambenali Ghat Accident 8 Youths Die Scorpio first Photo After Accident; स्कॉर्पिओचा अक्षरश: चक्काचूर झाला, 1000 फूट दरीत तरुण बेवारस पडलेले; आंबेनळी घाटातील भयावह दृश्य समोर
Poladpur Mahabaleshwar Ambenali Ghat Accident 8 Youths Die Scorpio first Photo After Accident; स्कॉर्पिओचा अक्षरश: चक्काचूर झाला, 1000 फूट दरीत तरुण बेवारस पडलेले; आंबेनळी घाटातील भयावह दृश्य समोर
Raigad Ambenali Ghat Scorpio Accident : साताऱ्यातील आसगाव येथील तरूणांच्या स्कॉर्पिओ गाडीचा पोलादपूर आणि महाबळेश्वर दरम्यान असलेल्या आंबेनळी घाटात भीषण अपघात झाला.
आंबेनळी घाट स्कॉर्पिओ अपघात(फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)
रायगड : साताऱ्यातील आसगाव येथील तरूणांच्या स्कॉर्पिओ गाडीचा रायगडमधील पोलादपूर आणि महाबळेश्वर दरम्यान असलेल्या आंबेनळी घाटात भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये 8 तरुणांचा जागीच मृत्यू झाला. स्कॉर्पिओ सुमारे 1000 फुट खोल दरीत कोसळली. आसगावमधील हे तरूण कोकणात दापोली येथील हर्णे बीच येथे फिरायला गेले होते. मजामस्ती करुन ते परतीच्या प्रवासाला लागले होते, पण आंबेनळी घाटात दबा धरुन बसलेल्या मृत्यूने झडप घातली आणि आज पहाटे हा अपघात झाला.
5 फुटांच्या अंतरावर 4 बॉडीज
तरुणांच्या स्कॉर्पिओ गाडीचा भीषण अपघात काल रविवारी रात्री झाला. सातारा जिल्ह्यातील आसगाव येथील तरुण या स्कॉर्पिओ प्रवास करत होते. आंबेनळी घाटातील एका तीव्र आणि धोकादायक वळणावर चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि गाडी थेट दरीत कोसळली. घाटातील अंधार आणि दरीची खोली जास्त असल्यानं अपघाताची भीषणता प्रचंड होती. याचदरम्यान, अपघात झालेल्या स्कॉर्पिओ गाडीचा पहिला फोटोही आता समोर आला आहे. पूर्णपणे स्कॉर्पिओचा चक्काचूर झाल्याचं दिसून येत आहे. तसेच संपूर्ण स्कॉर्पिओ काळीकुट्ट झाली असून स्कॉर्पिओच्या 5 फुटांच्या अंतरावर 4 बॉडीड पडल्या होत्या. आज सकाळी 10 वाजेपर्यंत दोन जणांच्या बॉडीज बाहेर काढण्यात आल्या आहेत.
सर्व तरुण फिरण्यासाठी दापोली तालुक्यातील हर्णे बीच परिसरात गेले होते. मात्र रात्री परतीच्या दिशेने निघत असताना सातारा आणि रायगड जिल्ह्यांना जोडणाऱ्या आंबेनळी घाटात दाभिळ गावाजवळ एका मुख्य वळणावर चालकाचं नियंत्रण सुटलं आणि स्कॉर्पिओ थेट खोल दरीत कोसळली. जेव्हा ही बातमी साताऱ्यात कळली तेव्हा संपूर्ण शहरात एकच शोककळा पसरली.
लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन'(TIL) या आघाडीच्या डिजिटल माध्यम समूहात सीनियर डिजिटल कंन्टेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. पुणे जिल्ह्यातील नामांकित ‘थोडक्यात’ न्यूज वेब पोर्टल, हैदराबादमधील ‘आधान शॉर्ट न्यूज अॅप’, ‘सकाळ मिडिया ग्रुप’ आणि आता ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’, असा जवळपास पाच ते साडेपाच वर्षांपेक्षा अधिक काळ ते कार्यरत आहेत. प्रशांत पाटील यांना महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील सर्व गुन्हेगारी, अपघात, शेतकरी विषयक बातम्या, ग्रामीण भागात यश संपादन केलेल्या तरुणी किंवा तरुणांच्या सक्सेस स्टोरीज् आणि महाराष्ट्र हायपर लोकल अशा विविध विषयांची आवड आहे. ऑगस्ट (2026) पासून ‘महाराष्ट्र टाईम्स ऑनलाईन’साठी (TIL) काम करत आहेत. या दरम्यान, राज्यातील विधानसभा, लोकसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकींच्या बातम्यांवर विशेष लक्ष ठेवतात. याआधीही त्यांनी याच माध्यम समूहासोबत तीन वर्ष काम केलं आहे.
प्रशांत पाटील यांनी पुण्यातील नामांकित आबासाहेब गरवारे महाविद्यालयातून मास कम्युनिकेशन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलं आहे. शिक्षण घेत असतानाच त्यांनी ‘थोडक्यात’ या न्यूज वेब पोर्टलला काम केलं. तिथे डिजिटल माध्यमासाठी लेखन करत असताना त्यांना डिजिटल क्षेत्रातलं कसं काम करतात? हे यश संपादन केलं. त्यानंतर त्यांना मुंबईत ‘महाराष्ट्र टाइम्य ऑनलाईन’ (TIL) या नामांकित माध्यम समूहामध्ये काम करण्याची संधी मिळाली. 28 मार्च 2022 रोजी ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ या मोठ्या ब्रँण्डसोबत पहिल्यांदा जोडले गेले. तिथे त्यांनी प्रदीर्घ काळ म्हणजे तीन वर्ष डिजिटल विभागात काम केलं. त्यांनतर त्यांनी फेब्रुवारी 2025 ला ‘सकाळ मिडिया ग्रुप’ला काम करण्याची संधी मिळाली. परंतु तिथे ते काम करत असताना त्यांना पुन्हा ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’ (TIL) या माध्यम समूहाने संधी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2026 पासून प्रशांत पाटील हे ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’सोबत (TIL) काम करताय.
‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन’मध्ये (TIL) काम करताना त्यांना खूप मोठमोठ्या संध्या मिळाल्या. जसे की, व्हिडिओ करणे, महाराष्ट्रातील संपूर्ण जिल्ह्यातील रिपोर्टर यांच्याशी समन्वय साधणे, जिल्हा प्रतिनिधींकडून वेळोवेळी काम करुन घेणे, विशेष आणि काही महत्वाच्या बातम्या मागवून घेणे, अशा बऱ्याच गोष्टींची त्यांना इथे मिळाली. प्रशांत पाटील हे सकाळच्या शिफ्टला काम करत असताना लाईव्ह ब्लॉग, रिपोर्टरशी बोलणे, ब्रेकिंग बातम्या, हायपर लोकल बातम्या, ग्रामीण भागातील सर्व घडामोडींकडे लक्ष देण्याचं काम ते करतात.… आणखी वाचा