Headlines

PM Modi: PM मोदी पत्रकार परिषद का घेत नाहीत? न्यूझीलंडच्या पत्रकाराचा सवाल; भारतीय राजदूतांचं थेट उत्तर


PM Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या न्यूझीलंड दौऱ्यावर आहेत. तेथील एका पत्रकारानं पंतप्रधान मोदी कधीच पत्रकार परिषद का घेत नाहीत असा प्रश्न विचारला. त्या प्रश्नाला परराष्ट्र मंत्रालयाकडून उत्तर देण्यात आलं.

pm modi pc
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
वेलिंग्टन: इंडोनेशिया आणि ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी न्यूझीलंड दौऱ्यावर आहेत. इथे त्यांचं भव्य स्वागत करण्यात आलं. पंतप्रधान मोदी ंचा दौरा असल्यानं भारतीय परराष्ट्र मंत्रालयाकडून पत्रकार परिषद ेचं आयोजन करण्यात आलं. यावेळी न्यूझीलंडच्या एका पत्रकारानं पंतप्रधान मोदींशी संबंधित एक प्रश्न विचारला. पंतप्रधान मोदी पत्रकार परिषद का घेत नाहीत, असा थेट सवाल न्यूझीलंडच्या पत्रकाराकडून उपस्थित करण्यात आला. या प्रश्नाला भारतीय राजदूत रुद्रेंद्र टंडन यांनी उत्तर दिलं.

न्यूझीलंडच्या दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान मोदी यांच्या माध्यमांशी संवाद साधण्याच्या शैली संदर्भात एका स्थानिक पत्रकारानं प्रश्न केला. ऑकलंडमध्ये भारतीय राजदूतांशी संवाद साधताना पत्रकारानं पंतप्रधान नरेंद्र मोदी पत्रकार परिषद का घेत नाहीत, असा प्रश्न विचारला. या प्रश्नाला परराष्ट्र मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी रुद्रेंद्र टंडन यांनी उत्तर दिलं.
Maharashtra Times2029 मध्ये देशभरात एकाच वेळी निवडणूक? One Nation One Election ला जोर, अंतिम आराखड्यासाठी प्रयत्न
‘पंतप्रधानांच्या राजकीय कार्यशैलीवर टिप्पणी करणं एक सरकारी नोकर म्हणून माझ्या अधिकार क्षेत्रात येत नाही. पण पंतप्रधान नरेंद्र मोदी एक राजकीय नेते म्हणून जनतेशी थेट संवाद साधण्यास प्राधान्य देतात. भारताचे बहुतांश नेते आपल्या मतदारांशी थेट संपर्क राखणं पसंत करतात. ते मध्यस्थांच्या माध्यमातून बातचीत करण्याऐवजी सर्वसामान्य लोकांपर्यंत थेट पोहोचण्यास प्राधान्य देतात,’ असं रुद्रेंद्र टंडन यांनी म्हटलं.

भारतीय मतदारांशी थेट संवाद साधण्याची कला पंतप्रधान मोदींनी अतिशय प्रभावीपणे विकसित केली आहे. ते सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले आहेत. देशाचे सर्वाधिक काळ सेवा देणारे पंतप्रधान आहेत. यातून त्यांची शैली राजकीयदृष्ट्या यशस्वी असल्याचं स्पष्ट होतं, असं उत्तर टंडन यांनी न्यूझीलंडच्या पत्रकाराला दिलं.
Maharashtra TimesAnandiben Patel: IAS होण्याआधी एक्स्पर्ट आई व्हा! राज्यपाल आनंदीबेन पटेलांचा मुलींना सल्ला, वक्तव्य चर्चेत
पंतप्रधान मोदी यांचा पत्रकार परिषद न घेण्याचा मुद्दा याआधीही आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर चर्चेचा विषय ठरला आहे. मे महिन्यात मोदी नॉर्वेच्या दौऱ्यावर होते. त्यावेळी ओस्लो शहरात नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गाहर स्टोरे यांनी माध्यमांशी संवाद साधल्यानंतर तिथल्या एका महिला पत्रकारानं पंतप्रधान मोदींना तुम्ही पत्रकारांचे प्रश्न का घेत नाहीत, असा सवाल केला होता. त्यावेळी मोदी कोणतीही प्रतिक्रिया न देता तिथून निघून गेले होते.

कुणाल गवाणकर

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरकुणाल गवाणकर हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. मे २०२२ पासून ते मटा ऑनलाईनमध्ये काम करत आहेत. प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल अशा तिन्ही माध्यमांचा एकत्रित १४ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचं लेखन करण्याचा अनुभव आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि त्यासंदर्भातील बातम्या यावरही त्यांचा हातखंडा आहे.

पत्रकारितेतील अनुभव
बीएमएमचं शिक्षण घेत असताना सकाळ वृत्तपत्रातून त्यांनी बातमीदारीला सुरुवात केली. वयाच्या १९ व्या वर्षी ते सकाळमध्ये अंशकालीन बातमीदार म्हणून रुजू झाले. शहरातील मुलभूत समस्या, लोकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या अडचणी यावर त्यांनी वृत्तांकन केलं. त्यांनी केलेल्या बातम्यांमुळे काही समस्या सुटण्यास मदत झाली. मुंबईच्या दहिसर येथील गोदावरी ही मराठी माध्यमाची शाळा बंद होणार होती. त्यामुळे गरीब घरातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. हा प्रश्न त्यांनी बातमीच्या माध्यमातून मांडला. त्यामुळे ही शाळा वाचली. त्याबद्दल तिथल्या शिक्षकांनी ‘सकाळ’चं कौतुक केलं होतं.

मालाडमधील एका खासगी संस्थेला दहिसरमध्ये नाममात्र दरात रुग्णालयासाठी दिलेली जागा, तिथे त्यांनी नियम मोडून खासगी वापरासाठी, श्रीमंत रुग्णांसाठी केलेली व्यवस्था, त्या रुग्णालयाचं दोन आमदारांनी केलेलं उद्घाटन, या सगळ्याबद्दल सखोल माहिती देणारी वृत्तमालिका विशेष गाजली. आमदारांनी सार्वजनिक निधीचा खासगी इमारतींमध्ये केलेला वापर, नियम धाब्यावर बसवून केलेली कामं या बातम्यांचीदेखील विशेष चर्चा झाली. जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलं.

‘जय महाराष्ट्र’ च्या माध्यमातून २०१३ मध्ये टीव्ही मीडियात पाऊल टाकलं. सुरुवातीला फास्ट न्यूजच्या बुलेटिनची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर जनरल बुलेटिन प्रोड्युसर म्हणून काम केलं. ‘मोहीम’ या प्राईम टाईममधील विशेष कार्यक्रमासाठी प्रोड्युसर म्हणून काम पाहिलं, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित कार्यक्रमांचं संकलन केलं.

टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीत स्पेशल पॅकेज लिहिण्याची जबाबदारी पार पडली. स्पेशल रिपोर्ट या प्राईम टाईम शोचा प्रोड्युसर म्हणून काम केलं. एकाच विषयाचे विविध पैलू प्रेक्षकांना उलगडून सांगण्याचं कौशल्य या शोमधून त्यांनी आत्मसात केलं.

लोकसत्ताच्या माध्यमातून त्यांनी २०१६ मध्ये ‘डिजिटल’ क्षेत्रात पदार्पण केलं. महाराष्ट्र, देश आणि आंतरराष्ट्रीय बातम्या करण्याची जबाबदारी त्यांना मिळाली. मुंबईसह महत्त्वाच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, त्यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांनी इथे मिळाली. डिजिटल माध्यमात पहिल्यांदाच न्यूजरुम बुलेटिनचा प्रयोग झाला. त्यात त्यांनी अनेकदा सूत्रसंचालनाची भूमिका बजावली. २०१७ मध्ये ‘लव्ह डायरीज’ नावाची प्रेमकथांना समर्पित असलेली मालिका सुरु करण्यात आली. त्यातील अनेक कथा त्यांनी लिहिल्या होत्या. या मालिकेतील बऱ्याचशा कथांचं कौतुक झालं.

लोकमत डिजिटलमध्ये त्यांनी २०१८ ते २०२२ अशी चार वर्षे काम केलं. लोकसभा, विधानसभा निवडणूक, प्रचारसभा, निकाल यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांना मिळाली. पाच राज्यांच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, निकालांचं विश्लेषण करण्याची, घडामोडींचे विविध कंगोरे उलगडून वाचकांपुढे ठेवण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. जोक सेक्शनपासून ते अमेरिकेच्या व्हिसाशी संबंधित मालिकेपर्यंत सर्वदूर मुशाफिरी करण्याची संधी त्यांना इथे मिळाली. आकर्षक मथळ्यांमुळे त्यांच्या बातम्या वाचकांच्या पसंतीस उतरल्या.

२०२२ पासून महाराष्ट्र टाइम्ससाठी काम करताना त्यांनी राज्य ते राष्ट्रीय स्तरावरील राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, क्रीडा या क्षेत्रातील बातम्यांना प्राधान्य दिलं. बातमी मागील बातमी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सातत्यानं केला. घडामोडींचं विश्लेषण करणारे लेख त्यांनी लिहिले. एकनाथ शिंदे यांचं बंड, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, त्यामुळे बदललेलं राजकारण या नाट्यमय घडामोडींवर त्यांनी विस्तृत लिखाण केलं. सखोल माहिती घेऊन घडामोडींचं विश्लेषण करण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. घटनांमागील रंजक घडामोडी, वर्तमानातील बातम्यांची पार्श्वभूमी, त्यांचे होणारे परिणाम, सत्ताकारणासाठी सुरु असलेले शह-काटशह यावर त्यांनी सविस्तर लिखाण केलं. भाजपचे माजी खासदार आणि वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन रोखठोक सवाल करणारा त्यांचा व्हिडीओ समाज माध्यमांवर विशेष गाजला.

शैक्षणिक पात्रता
कुणाल गवाणकर यांनी २०१३ मध्ये पाटकर महाविद्यालयातून बीएमएमची पदवी संपादन केली. शालेय आणि बारावीपर्यंतचं शिक्षण दहिसरमधील शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीत झालं. विद्यार्थीदशेत असतानाच त्यांना लिखाणाची गोडी लागली. मराठी भाषेवर प्रभुत्व असल्यानं त्यांनी निबंध स्पर्धेत अनेक पारितोषिकं जिंकली. बारावीच्या बोर्ड परीक्षेमेध्ये मराठी विषयात कनिष्ठ महाविद्यालयातून सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होण्याचा मान त्यांनी पटकावला. त्यानंतर त्यांनी पत्रकारिकेचं शिक्षण घेतलं. शिक्षण घेत असतानाचा त्यांनी या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती.आणखी वाचा