Headlines

PM Modi: PM मोदींनी घेतली 194 वर्षांच्या ‘जोनाथन’ची भेट; सेशेल्स दौरा चर्चेत


PM Modi: पंतप्रधान मोदी सेशेल्सला पोहोचले आहेत. २०१५ नंतर मोदी प्रथमच सेशेल्स दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात मोदींनी १९४ वर्षांच्या जोनाथनची भेट घेतली. मोदींचा दौरा तीन दिवसांचा असणार आहे.

pm modi jonathan
(फोटोमहाराष्ट्र टाइम्स.कॉम)
व्हिक्टोरिया: पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी सेशेल्सच्या तीन दिवसांच्या दौऱ्यासाठी रवाना झाले आहेत. हिंदी महासागरात असलेल्या असलेल्या सेशेल्सला स्वातंत्र्य मिळून ५० वर्षे होत आहेत. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान मोदी प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी होतील. मोदींच्या दौऱ्यामुळे दोन्ही देशांचे अधिक बळकट होतील. मोदींच्या दौऱ्यात होणाऱ्या एका भेटीची बरीच चर्चा होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सेशेल्स दौऱ्यात जगातील सर्वाधिक वृद्ध सजीव अशी ओळख असलेल्या ‘ जोनाथन ‘ची भेट घेतली. जोनाथन एल्डाब्रा जायंट कासव आहे. त्याचं वय १९४ वर्षे इतकं आहे. जोनाथन सध्या सेशेल्सच्या राजधानीतील जेम्सटाऊन येथील नॅशनल बोटॅनिकल गार्डनमध्ये वास्तव्यास आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सनुसार, जोनाथन जगातील सर्वात वयाचा जमिनीवर राहणारा सजीव आहे. जोनाथनच्या प्रजातीची कासवं सरासरी १५० वर्षे जगतात. पण जोनाथन त्यापेक्षा अधिक जगला आहे.
Maharashtra TimesGaza Israel Conflict: गाझात 20 हजार मुलांना संपवलं; सैनिकांनी ‘गेम’ खेळून पोरांना अपंग केलं; इस्रायलचा क्रूर चेहरा
पंतप्रधान मोदी यांनी सेशेल्स दौऱ्यादरम्यान नॅशनल बोटॅनिकल गार्डनला भेट दिली. तिथे त्यांनी जोनाथनची भेट घेतली. त्याला झाडाची पानं घाऊ घातली. पर्यावरण संरक्षणाच्या संदेश देण्यासाठी मोदींनी बोटॅनिकल गार्डनला भेट दिली. हिंदी महासागर क्षेत्रात येणाऱ्या भारत आणि सेशेल्स यांच्यामधील जैवविविधता संरक्षणाच्या दृष्टीनं ही भूमिका महत्त्वाची आहे. हिंदी महासागरातील सेशेल्स देशाला २९ जून १९७६ रोजी स्वातंत्र्य मिळालं. त्याआधी हा देश ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली होता. सेशेल्सच्या स्वातंत्र्याला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदींनी खास पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आलं आहे.
Maharashtra TimesChina Plane Crash: चीनमध्ये वर्ल्ड ट्रेड सेंटरसारखी घटना; बीजिंगच्या सर्वात उंच इमारतीवर विमान आदळलं; परिसरात खळबळ
या दौऱ्यात पंतप्रधान मोदी सेशेल्सचे राष्ट्रपती डॉ. पॅट्रिक हर्मिनी यांच्या सोबत चर्चा करतील. दोन्ही नेते सागरी सुरक्षा, वातावरण बदल आणि संरक्षण सहकार्य यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करतील. याआधी पंतप्रधान मोदी यांनी २०१५ मध्ये सेशेल्सचा दौरा केला होता. मोदी यांच्याआधी केवळ एका भारतीय पंतप्रधानांनी सेशेल्सला भेट दिली होती. इंदिरा गांधी १९७६ आणि १९८१ मध्ये सेशेल्सला गेल्या होत्या. त्यानंतर एकाही भारतीय पंतप्रधानानं सेशेल्सचा दौरा केला नाही.

कुणाल गवाणकर

लेखकाबद्दलकुणाल गवाणकरकुणाल गवाणकर हे महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनमध्ये प्रिन्सिपल डिजिटल कंटेट प्रोड्युसर पदावर कार्यरत आहेत. मे २०२२ पासून ते मटा ऑनलाईनमध्ये काम करत आहेत. प्रिंट, टीव्ही आणि डिजिटल अशा तिन्ही माध्यमांचा एकत्रित १४ वर्षांचा अनुभव त्यांच्या गाठिशी आहे. राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी यासारख्या विविध विषयांवरील बातम्यांचं लेखन करण्याचा अनुभव आहे. आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि त्यासंदर्भातील बातम्या यावरही त्यांचा हातखंडा आहे.

पत्रकारितेतील अनुभव
बीएमएमचं शिक्षण घेत असताना सकाळ वृत्तपत्रातून त्यांनी बातमीदारीला सुरुवात केली. वयाच्या १९ व्या वर्षी ते सकाळमध्ये अंशकालीन बातमीदार म्हणून रुजू झाले. शहरातील मुलभूत समस्या, लोकांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या अडचणी यावर त्यांनी वृत्तांकन केलं. त्यांनी केलेल्या बातम्यांमुळे काही समस्या सुटण्यास मदत झाली. मुंबईच्या दहिसर येथील गोदावरी ही मराठी माध्यमाची शाळा बंद होणार होती. त्यामुळे गरीब घरातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न निर्माण झाला. हा प्रश्न त्यांनी बातमीच्या माध्यमातून मांडला. त्यामुळे ही शाळा वाचली. त्याबद्दल तिथल्या शिक्षकांनी ‘सकाळ’चं कौतुक केलं होतं.

मालाडमधील एका खासगी संस्थेला दहिसरमध्ये नाममात्र दरात रुग्णालयासाठी दिलेली जागा, तिथे त्यांनी नियम मोडून खासगी वापरासाठी, श्रीमंत रुग्णांसाठी केलेली व्यवस्था, त्या रुग्णालयाचं दोन आमदारांनी केलेलं उद्घाटन, या सगळ्याबद्दल सखोल माहिती देणारी वृत्तमालिका विशेष गाजली. आमदारांनी सार्वजनिक निधीचा खासगी इमारतींमध्ये केलेला वापर, नियम धाब्यावर बसवून केलेली कामं या बातम्यांचीदेखील विशेष चर्चा झाली. जनतेचे प्रश्न मांडण्याचं काम त्यांनी सातत्यानं केलं.

‘जय महाराष्ट्र’ च्या माध्यमातून २०१३ मध्ये टीव्ही मीडियात पाऊल टाकलं. सुरुवातीला फास्ट न्यूजच्या बुलेटिनची जबाबदारी सांभाळली. त्यानंतर जनरल बुलेटिन प्रोड्युसर म्हणून काम केलं. ‘मोहीम’ या प्राईम टाईममधील विशेष कार्यक्रमासाठी प्रोड्युसर म्हणून काम पाहिलं, २०१४ च्या लोकसभा निवडणुकीशी संबंधित कार्यक्रमांचं संकलन केलं.

टीव्ही ९ मराठी वृत्तवाहिनीत स्पेशल पॅकेज लिहिण्याची जबाबदारी पार पडली. स्पेशल रिपोर्ट या प्राईम टाईम शोचा प्रोड्युसर म्हणून काम केलं. एकाच विषयाचे विविध पैलू प्रेक्षकांना उलगडून सांगण्याचं कौशल्य या शोमधून त्यांनी आत्मसात केलं.

लोकसत्ताच्या माध्यमातून त्यांनी २०१६ मध्ये ‘डिजिटल’ क्षेत्रात पदार्पण केलं. महाराष्ट्र, देश आणि आंतरराष्ट्रीय बातम्या करण्याची जबाबदारी त्यांना मिळाली. मुंबईसह महत्त्वाच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, त्यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांनी इथे मिळाली. डिजिटल माध्यमात पहिल्यांदाच न्यूजरुम बुलेटिनचा प्रयोग झाला. त्यात त्यांनी अनेकदा सूत्रसंचालनाची भूमिका बजावली. २०१७ मध्ये ‘लव्ह डायरीज’ नावाची प्रेमकथांना समर्पित असलेली मालिका सुरु करण्यात आली. त्यातील अनेक कथा त्यांनी लिहिल्या होत्या. या मालिकेतील बऱ्याचशा कथांचं कौतुक झालं.

लोकमत डिजिटलमध्ये त्यांनी २०१८ ते २०२२ अशी चार वर्षे काम केलं. लोकसभा, विधानसभा निवडणूक, प्रचारसभा, निकाल यांचं विश्लेषण करण्याची संधी त्यांना मिळाली. पाच राज्यांच्या निवडणुकांशी संबंधित बातम्या, निकालांचं विश्लेषण करण्याची, घडामोडींचे विविध कंगोरे उलगडून वाचकांपुढे ठेवण्याची जबाबदारी त्यांनी पार पाडली. जोक सेक्शनपासून ते अमेरिकेच्या व्हिसाशी संबंधित मालिकेपर्यंत सर्वदूर मुशाफिरी करण्याची संधी त्यांना इथे मिळाली. आकर्षक मथळ्यांमुळे त्यांच्या बातम्या वाचकांच्या पसंतीस उतरल्या.

२०२२ पासून महाराष्ट्र टाइम्ससाठी काम करताना त्यांनी राज्य ते राष्ट्रीय स्तरावरील राजकारण, समाजकारण, गुन्हेगारी, क्रीडा या क्षेत्रातील बातम्यांना प्राधान्य दिलं. बातमी मागील बातमी वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सातत्यानं केला. घडामोडींचं विश्लेषण करणारे लेख त्यांनी लिहिले. एकनाथ शिंदे यांचं बंड, राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट, त्यामुळे बदललेलं राजकारण या नाट्यमय घडामोडींवर त्यांनी विस्तृत लिखाण केलं. सखोल माहिती घेऊन घडामोडींचं विश्लेषण करण्याची जबाबदारी त्यांनी समर्थपणे पार पाडली. घटनांमागील रंजक घडामोडी, वर्तमानातील बातम्यांची पार्श्वभूमी, त्यांचे होणारे परिणाम, सत्ताकारणासाठी सुरु असलेले शह-काटशह यावर त्यांनी सविस्तर लिखाण केलं. भाजपचे माजी खासदार आणि वरिष्ठ नेते किरीट सोमय्या यांना भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन रोखठोक सवाल करणारा त्यांचा व्हिडीओ समाज माध्यमांवर विशेष गाजला.

शैक्षणिक पात्रता
कुणाल गवाणकर यांनी २०१३ मध्ये पाटकर महाविद्यालयातून बीएमएमची पदवी संपादन केली. शालेय आणि बारावीपर्यंतचं शिक्षण दहिसरमधील शैलेंद्र एज्युकेशन सोसायटीत झालं. विद्यार्थीदशेत असतानाच त्यांना लिखाणाची गोडी लागली. मराठी भाषेवर प्रभुत्व असल्यानं त्यांनी निबंध स्पर्धेत अनेक पारितोषिकं जिंकली. बारावीच्या बोर्ड परीक्षेमेध्ये मराठी विषयात कनिष्ठ महाविद्यालयातून सर्वाधिक गुणांनी उत्तीर्ण होण्याचा मान त्यांनी पटकावला. त्यानंतर त्यांनी पत्रकारिकेचं शिक्षण घेतलं. शिक्षण घेत असतानाचा त्यांनी या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली होती.आणखी वाचा